हिरो होंडाची अनोखी टेक्नॉलॉजी, आता मोटारसायकलवर ड्रोनही स्वार होणार

हिरो होंडाची अनोखी टेक्नॉलॉजी, आता मोटारसायकलवर ड्रोनही स्वार होणार (Hero Honda's unique technology, now the drone will be riding on a motorcycle)

हिरो होंडाची अनोखी टेक्नॉलॉजी, आता मोटारसायकलवर ड्रोनही स्वार होणार
हिरो होंडाची अनोखी टेक्नॉलॉजी
Follow us
| Updated on: Feb 28, 2021 | 11:26 AM

मुंबई : आघाडीची हिरो होंडा कंपनी लवकरच ग्राहकांच्या सेवेत हटके मोटारसायकल दाखल करणार आहे. ही मोटारसायकल हटके टेक्नॉलॉजीने बनवलेली असून यावर ड्रोन स्वार झालेला असेल. हा ड्रोन एका कमांडवर हवेत उड्डाण करणार आहे. जपानच्या ऑटोमेकरने अलिकडेच एक पेमेंट अ‍ॅप्लिकेशन सादर केले आहे. या अ‍ॅप्लिकेशनमध्ये बाईक माऊंटेड ड्रोनचा खुलासा करण्यात आला आहे. उपलब्ध माहितीनुसार, मोटारसायकलवर सेट केलेला ड्रोन एका कमांडवर हवेत उड्डाण करणार आहे. हा ड्रोन परत बोलवायचा असेल तर तशी कमांड द्यावी लागेल. त्या कमांडवर हवेतला ड्रोन पुन्हा बाईकवर स्वार होणार आहे. ही नवीन टेक्नॉलॉजी ड्रोनच्या माध्यमातून नेमके काम काय करणार, याचे स्पष्टीकरण कंपनीकडून देण्यात आलेले नाही. अशा प्रकारची टेक्नॉलॉजी आपणाला अनेक ठिकाणी उपयोगी ठरू शकते, असा दावा मात्र कंपनीने केला आहे. (Hero Honda’s unique technology, now the drone will be riding on a motorcycle)

नेमके काय काम करेल?

अनोखा ड्रोन मोटारसायकलच्या मागच्या बाजूला असलेल्या बॉक्समध्ये सेट केलेला असेल. जर आपल्याला ड्रोनचा वापर करायचा नसेल, तर आपण बॉक्समधून ड्रोन बाजूला काढू शकतो. मोटारसायकलवरून प्रवास करीत असताना जर आपल्याला आसपासचा परिसर भावला व तेथील छायाचित्रे वा त्या परिसराचा व्हिडीओ बनवायचा असेल, तर अशावेळी आपल्याला ड्रोनची मोठी मदत होणार आहे. केवळ एका कमांडवर हा ड्रोन हवेत झेपावून आसपासच्या परिसराची छायाचित्रे क्लिक करू शकणार आहे. दुदैवाने छोटा-मोठा अपघात घडला, तर त्यामागचे नेमके कारणही या ड्रोनमुळे कळणार आहे. त्यापुढे जाऊन हा ड्रोन आपल्याला वाहतूक कोंडी, पुढचा रस्ता खराब असेल तर त्याची किंवा अन्य बाबींची माहिती देऊ शकणार आहे.

कंटेट क्रिएटर्स, फिल्ममेकर्स, युट्युबर्ससाठी वरदान

जर आपण इलेक्ट्रॉनिक मोटारसायकल वापरत असाल तर आपल्याला चार्ज बॅटरी पॅक्ससुद्धा डिलीव्हर करता येणार आहे. मात्र सध्यातरी बॅटरी पॅक्सचे वजन कमी असायला पाहिजे. या ड्रोनबाबत जाणकार काही प्रश्नही उपस्थित करताहेत. हा ड्रोन धावत्या मोटारसायकलवरून कशाप्रकारे उड्डाण करू शकतो. त्याचबरोबर तितक्याच स्पीडने मोटारसायकल धावत असताना पुन्हा हा ड्रोन मोटारसायकलवर कसा काय लॅण्ड होऊ शकेल व आधीसारखा बॉक्समध्ये सेट होऊ शकेल? कंपनीकडे याबाबत पेटेंटमध्ये अजून कुठलीही माहिती जाहीर केलेली नाही. एक मात्र निश्चित आहे की हा ड्रोन भविष्यात कंटेट क्रिएटर्स, फिल्ममेकर्स आणि युट्युबर्ससाठी वरदान ठरू शकतो. (Hero Honda’s unique technology, now the drone will be riding on a motorcycle)

इतर बातम्या

नवं वर्ष, नवं मिशन; ISROकडून 18 सॅटेलाइटचं यशस्वी लॉन्चिंग; भगवदगीता आणि मोदींचा फोटोही अंतराळात

6 शहरांमध्ये रंगणार आयपीएलच्या 14 व्या मोसमाचा थरार, मुंबईकर चाहत्यांसाठी निराशाजनक बातमी

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.