मुंबई : हिरो लेक्ट्रो(Hero Lectro)नं माउंटन सायकल F2i आणि F3i या दोन इलेक्ट्रिक सायकल्स (Electric Cycle) सादर केल्या आहेत. हिरो लेक्ट्रो फर्म हिरो सायकलचा इलेक्ट्रिक विभाग (Hero Lectro E-Cycles) आहे. या सायकल्स खास आरामदायी प्रवासासाठी तयार करण्यात आल्या आहेत. शहरी आणि ग्रामीण भागात राहणाऱ्यांसाठी हे अतिशय उपयुक्त ठरेल. तसेच कंपनीला या उत्पादनांसह तरुणांना आकर्षित करायचंय.
किंमत काय?
या इलेक्ट्रिक सायकल्सच्या किंमतीबद्दल बोलायचं झालं, तर Hero F2iची किंमत रु. 39,999 आहे, तर F3iची किंमत रु. 40,999 आहे. या दोघांचे फिचर्स, टॉप स्पीड आणि चार्जिंग स्पीड याविषयीही जाणून घेऊया.
Hero F2i आणि Hero F3iची ड्रायव्हिंग रेंज
Hero F2i आणि Hero F3iच्या ड्रायव्हिंग रेंजबद्दल बोलायचं झालं तर, दोन्हीही एका चार्जवर 35 किलोमीटरची ड्रायव्हिंग रेंज देतात. यात 7 गीअर स्पीड आहे. या बाइक्समध्ये 100 मिमी सस्पेन्शन, 27.5 इंच आणि 29 इंच डबल अॅलॉय रिम्स आहेत. तसेच यामध्ये ड्युअल डिस्क ब्रेक देण्यात आले आहेत. यासोबतच राईडसाठी लागणाऱ्या इतर सर्व गोष्टींची विशेष काळजी घेण्यात आलीय.
Hero F2i आणि Hero F3i बॅटरी
दोन्ही माउंटन ई-बाइक्समध्ये उच्च क्षमतेची 6.4Ah बॅटरी आहे, ती IP67 रेटेड वॉटर रेझिस्टन्ससह येते. या बॅटरीच्या मदतीनं 250W मोटरला टॉर्क मिळतो. रायडर्सना चार राइडिंग मोड मिळतात, ज्यापैकी ते कोणताही एक निवडून त्यांचा प्रवास सुरू करू शकतात. पेडलिकला 35 किलोमीटरची रेंज मिळते, तर हॉटेलला 27 किलोमीटरची रेंज मिळते. याशिवाय क्रूझ आणि मॅन्युअल कंट्रोलची सुविधा आहे. स्मार्ट डिस्प्लेच्या मदतीनं हे मोड बदलले जाऊ शकतात.
What is life, if not a series of adrenaline rushes? Presenting India’s very first e-MTBs. Get ready to #RideTheThrill with the brand new Hero Lectro F2i and F3i. #HeroLectro #Hero #WantItFlauntIt #NewLaunch #RideTheThrill #HeroLectroF2i #HeroLectroF3i pic.twitter.com/Y5znK7NVnc
— Hero Lectro E-Cycles (@HeroLectro) December 19, 2021
Hero F2i आणि Hero F3i कुठे खरेदी करायची?
Lectroच्या नेटवर्क अंतर्गत 600 डीलर्सकडून Hero F2i आणि F3i इलेक्ट्रिक MTB सायकल खरेदी केल्या जाऊ शकतात. तसेच त्या ऑनलाइनदेखील खरेदी करता येतील. इलेक्ट्रिक स्कूटर आणि बाइक्सचा सेगमेंट भारतात झपाट्यानं वाढतोय. यापैकी चांगल्या श्रेणीच्या दुचाकींची किंमत सुमारे 1 लाख रुपये आहे. ज्यांना असं इलेक्ट्रिक वाहन हवंय, त्यांच्यासाठी ही सायकल एक चांगला पर्याय ठरू शकते.