मध्यमवर्गीय ग्राहकांना झटका, होंडाची ‘ही’ बाईक वर्षभरात तिसऱ्यांदा महागली
होंडा मोटरसायकल आणि स्कूटर इंडियाने (Honda Motorcycle and Scooter India) पुन्हा एकदा आपल्या स्कूटर्सच्या किंमती वाढवल्या आहेत.
मुंबई : होंडा मोटरसायकल आणि स्कूटर इंडियाने (Honda Motorcycle and Scooter India) पुन्हा एकदा आपल्या स्कूटर्सच्या किंमती वाढवल्या आहेत, कंपनीने अॅक्टिव्हा रेंजच्या किंमती 1237 रुपयांनी वाढवल्या आहेत. अॅक्टिव्हा 6G आता 1237 रुपयांनी महाग झाली आहे, तर अॅक्टिव्हा 125 रेंज 964 रुपयांनी महाग झाली आहे. अॅक्टिव्हा 125 ड्रम ब्रेक व्हेरिएंटच्या किंमतीत 693 रुपयांची वाढ झाली आहे. सर्व किंमती एक्स शोरूम दिल्लीतल्या आहेत. किंमतवाढीव्यतिरिक्त, सर्व स्कूटर्सना समान स्पेक्स आणि इंजिन स्पेक्स मिळतात. (Honda Activa Range, SP 125 and Shine Gets A Price Hike Of Up To 1237 rupees)
होंडा मोटरसायकल आणि स्कूटर इंडियाने आपल्या सर्वाधिक विक्री होणार्या 125 सीसी मोटारसायकलींच्या किंमतीत वाढ केली आहे. यात होंडा शाईन आणि होंडा SP 125 या बाईक्सचा समावेश आहे. कंपनीने वाहनांच्या किंमती वाढवल्या आहेत कारण आता कंपन्यांना इनपुट कॉस्टमध्ये जास्त खर्च करावा लागतोय. दरम्यान, किंमती वाढल्यानंतर कोणत्याही मोटारसायकलींच्या फीचर्समध्ये कोणतेही बदल करण्यात आलेले नाहीत.
होंडा शाईन आणि होंडा SP125 या दोन्ही गाड्या 1200 रुपयांनी महाग झाल्या आहेत. या किंमती एक्स-शोरूम दिल्लील्या आहेत. शाइन आणि एसपी 125 दोन्ही व्हेरिेंट्समध्ये उपलब्ध आहेत. यात तुम्हाला फ्रंट ड्रम ब्रेक व्हर्जन आणि फ्रंट डिस्क ब्रेक मिळेल. होंडा शाईनच्या ड्रम ब्रेक व्हेरिएंटची किंमत 71.550 रुपयांवरून 72,787 रुपये इतकी करण्यात आली आहे, तर डिस्क ब्रेक व्हेरिएंटची किंमत 76,346 रुपयांवरून 77,582 रुपये इतकी करण्यात आली आहे.
स्कूटर्सच्या किंमती
अॅक्टिव्हा 6G STD ची पूर्वीची किंमत 67,843 रुपये इतकी होती आणि आता नवीन किंमत 69,080 रुपये इतकी आहे. दोन्ही किंमतीत 1237 रुपयांचा फरक आहे. तर अॅक्टिव्हा 6 जी डीएलएक्सची किंमत आधी 69,589 रुपये होती, परंतु आता ती 70,825 रुपये करण्यात आली आहे. दोन्ही किंमतीत 1236 रुपयांचा फरक आहे. अॅक्टिव्हा 6 जी च्या 20 व्या वर्धापनदिनी STD ची जुनी किंमत 69,343 रुपये इतकी होती आणि आता त्याची किंमत 70,580 रुपयांवर गेली आहे. या दोन्ही किंमतीतदेखील 1237 रुपयांचा फरक आहे. तर डीएलएक्स व्हेरिएंटची किंमतही वाढवून 72,325 रुपये करण्यात आली आहे.
अॅक्टिव्हाच्या 125 ड्रम एडिशनची किंमत पूर्वी 71,674 रुपये इतकी होती. आता ती किंमत 72,367 रुपये इतकी झाली आहे. अॅक्टिव्हा ड्रम अॅलोयची किंमत 76,206, तर अॅक्टिव्हा 125 डिस्कची किंमत 79,760 रुपये करण्यात आली आहे.
इतर बातम्या
वाहन उद्योग रुळावर, जून महिन्यात 2.38 लाख दुचाकींसह TVS Motors ची विक्रमी विक्री
आता 74,990 रुपयांऐवजी 47,990 रुपयांत खरेदी करा इलेक्ट्रिक स्कूटर; जाणून घ्या कंपनीने का केली दरकपात
बाईक रायडरसाठी चांगली बातमी, बजाज ऑटोने 16800 रुपयांनी कमी केली या सुपर बाईकची किंमत
(Honda Activa Range, SP 125 and Shine Gets A Price Hike Of Up To 1237 rupees)