Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

नवी कार घेताय? Honda च्या गाड्यांवर शानदार डिस्काऊंट

तुम्ही जर सेकंड हँड कार घेण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी ही एक चांगली संधी आहे, तुम्ही Honda आणि इतर कंपन्यांचे तुमचे आवडते मॉडेल्स थेट Honda Cars मधून खरेदी करू शकता.

नवी कार घेताय? Honda च्या गाड्यांवर शानदार डिस्काऊंट
Honda Car (प्रातिनिधिक फोटो)
Follow us
| Updated on: Jan 09, 2022 | 1:13 PM

मुंबई : तुम्ही जर सेकंड हँड कार घेण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी ही एक चांगली संधी आहे, तुम्ही Honda आणि इतर कंपन्यांचे तुमचे आवडते मॉडेल्स थेट Honda Cars मधून खरेदी करू शकता. यासाठी कंपनी अनेक ऑफर्स देत आहे. या ऑफर अंतर्गत, तुम्हाला एक वर्ष किंवा 20000 किलोमीटरची वॉरंटी मिळेल. गाड्यांसाठी 350 क्वालिटी चेक पोस्ट इंस्पेक्शनदेखील असेल. कंपनी आपल्या ग्राहकांना आपल्या सेकंड हँड कार प्लॅटफॉर्म होंडा ऑटो टेरेसच्या माध्यमातून या ऑफर देत आहे. (Honda Giving offers on second hand cars buy Honda Auto Terrace platform)

मिळालेल्या माहितीनुसार, होंडाकडून सर्टिफाइड कार खरेदी करण्याची ही संधी असेल. याचा अर्थ असा की, एखादी व्यक्ती संपूर्ण इंस्पेशन, रिपेयर, चांगल्या देखभालीसह कार खरेदी करू शकता. होंडा कारमध्ये तुम्ही Honda Amaze, Honda City, Honda Jazz मॉडेल्स खरेदी करू शकता. याशिवाय इतर कार कंपन्यांच्या गाड्याही खरेदी करता येतील. या गाड्यांच्या किमती शहरानुसार बदलू शकतात. 2017 ते 2020 पर्यंतच्या होंडा सिटी कार खरेदीसाठी उपलब्ध असतील.

होंडाची ऑटो टेरेस एक्सचेंज सर्विस काय आहे?

ऑटो टेरेस ही Honda ची एक्स्चेंज आणि प्री-ओन्ड कार खरेदीसाठी वन-स्टॉप सुविधा आहे. ऑटो टेरेसचे ध्येय त्यांच्या ग्राहकांना अत्यंत सोयीस्कर, पारदर्शक आणि आनंददायक सेकंड हँड कार खरेदी आणि विक्रीची सेवा प्रदान करणे आहे. Honda Auto Terrace सुविधा Honda Cars India च्या नेटवर्कवर उपलब्ध आहे. कंपनी तुम्हाला तुमची विद्यमान कार (कोणत्याही मॉडेलची) नवीन Honda कारमध्ये बदलण्यात मदत करते.

किंमत काय असेल?

सेकंड हँड होंडा सिटी कार 2017 मॉडेल कमीत कमी 5 लाख रुपयांना खरेदी करता येईल. लेटेस्ट 2020 मॉडेल Honda City ची किंमत 14 ते 15 लाख रुपये असेल. Honda Amaze चे 2014 चे मॉडेल देखील 2.65 लाख रुपयांमध्ये खरेदी करता येईल.

इतर कंपन्यांच्या सेकंड हँड कार खरेदी करण्याचीही संधी

होंडा व्यतिरिक्त, मारुती सुझुकी, ह्युंडईसह इतर कंपन्यांच्या कार देखील होंडा ऑटो टेरेस प्लॅटफॉर्मवर खरेदी केल्या जाऊ शकतात. 2014 मॉडेल मारुती सुझुकी अल्टो 1.95 लाख रुपयांमध्ये उपलब्ध असेल. याशिवाय, 2012 मॉडेल मारुती सुझुकी डिझायर 2.27 लाख रुपयांमध्ये खरेदी करता येईल. तर 2009 मॉडेल Hyundai i10 Era केवळ 95,000 रुपयांमध्ये खरेदी करता येईल. 2013 मॉडेल Fiat Grande Punto 1.75 लाख रुपयांमध्ये उपलब्ध असेल.

इतर बातम्या

Maruti ते Hyundai, किफायतशीर किंमतीत ऑटोमॅटिक गियरवाल्या कार, पाहा यादी

सिंगल चार्जवर 95 किमी ड्रायव्हिंग रेंज, Bajaj Chetak Electric Scooter पुणे, बंगळुरुनंतर आता मुंबईतही उपलब्ध

i20 ते Cretaपर्यंत Hyundaiच्या कार महागल्या, इथे पाहा मॉडेल्स आणि त्याच्या किंमती

(Honda Giving offers on second hand cars buy Honda Auto Terrace platform)

वकील ओझा यांचे आदित्य ठाकरेंवर गंभीर आरोप, काय म्हणाले आदित्य ठाकरे?
वकील ओझा यांचे आदित्य ठाकरेंवर गंभीर आरोप, काय म्हणाले आदित्य ठाकरे?.
देवेंद्रजी, बात निकलेगी तो दूर तलक जायेगी; अंधारेंचं फडणवीसांना पत्र
देवेंद्रजी, बात निकलेगी तो दूर तलक जायेगी; अंधारेंचं फडणवीसांना पत्र.
मंत्री अदिती तटकरेंच्या जिल्ह्यात 15 हजार महिला अपात्र
मंत्री अदिती तटकरेंच्या जिल्ह्यात 15 हजार महिला अपात्र.
'हो, ते वक्तव्य बरोबर होतं, समजलं?', 'त्या' व्हिडिओवर अजितदादा संतापले
'हो, ते वक्तव्य बरोबर होतं, समजलं?', 'त्या' व्हिडिओवर अजितदादा संतापले.
कोरटकर प्रकरणावरून विरोधक सत्ताधारी भिडले
कोरटकर प्रकरणावरून विरोधक सत्ताधारी भिडले.
अजितदादांच्या 'त्या' व्हिडिओवर गुलाबराव पाटलांची मिश्किल टिपणी
अजितदादांच्या 'त्या' व्हिडिओवर गुलाबराव पाटलांची मिश्किल टिपणी.
'तसा एक नेपाळी महाराष्ट्रात फिरतोय', परबांची राणेंवर नाव न घेता टीका
'तसा एक नेपाळी महाराष्ट्रात फिरतोय', परबांची राणेंवर नाव न घेता टीका.
मराठी असल्याने डायमंड असोसिएशनने नाकारलं सभासदत्व
मराठी असल्याने डायमंड असोसिएशनने नाकारलं सभासदत्व.
माझ्या बाळाला फक्त..., शिंदेंनी मदतीचा हात पुढे करताच आईला अश्रू अनावर
माझ्या बाळाला फक्त..., शिंदेंनी मदतीचा हात पुढे करताच आईला अश्रू अनावर.
माझ्यावर कोणाचाही दबाव नाही; दिशाच्या वडिलांचं मोठं विधान
माझ्यावर कोणाचाही दबाव नाही; दिशाच्या वडिलांचं मोठं विधान.