सिंगल चार्जवर 220km रेंज, होंडाची Two-Door इलेक्ट्रिक स्पोर्ट्स कार लाँचिंगसाठी सज्ज, जाणून घ्या फीचर्स

या कारमध्ये 35.5kWh बॅटरी पॅक दिला जाऊ शकतो. ज्याद्वारे यामधील मोटर 154hp पॉवर आणि 220 किमीपर्यंतची रेंज देईल.

सिंगल चार्जवर 220km रेंज, होंडाची Two-Door इलेक्ट्रिक स्पोर्ट्स कार लाँचिंगसाठी सज्ज, जाणून घ्या फीचर्स
Honda Ev
Follow us
| Updated on: Jun 06, 2021 | 11:08 PM

मुंबई : भविष्यात मोठ्या प्रमाणात इलेक्ट्रिक वाहने (Electric Vehicles) रस्त्यांवर धावताना दिसतील, असं म्हटलं जात होतं. परंतु आता तशी परिस्थिती राहिलेली नाही. जगभरातील लोकांनी आपला मोर्चा इलेक्ट्रिक वाहनांकडे वळवला आहे. प्रदूषण आणि पेट्रोल, डिझेल यांच्या वाढत्या किंमतींमुळे लोकांचा इलेक्ट्रिक वाहनांकडे (Electric Vehicle) कल वाढत चालला आहे. देशातील काही शहरांमध्ये पेट्रोलच्या किंमती शंभरी पार (Petrol Price hike) गेल्या आहेत, तर काही शहरांमध्ये पेट्रोलच्या किंमती 90 रुपयांच्या पुढे आहेत. त्यामुळे 2021 मध्ये अनेक दिग्गज वाहन कंपन्या इलेक्ट्रिक व्हीकल लाँच करण्याच्या तयारीत आहेत. (Honda Sports EV Concept Car S660s in under production, launch Soon)

पूर्वी इलेक्ट्रिक वाहनांच्या बजेटमुळे लोक चिंतेत असायचे, परंतु आता तसे चित्र राहिलेलं नाही. कार/मोटारसायकल कंपन्या कमीत कमी बजेटमध्ये जास्तीत जास्त फिचर्स देणाऱ्या इलेक्ट्रिक कार्स, बाईक आणि स्कूटर लाँच करत आहेत. दरम्यान, होंडा कंपनी एक स्पोर्ट्स ईव्ही (इलेक्ट्रिक व्हेईकल) लाँच करण्याच्या तयारीत आहे. ही कार अंडर डेव्हलपमेंट स्थितीत असून ही कार स्पोर्ट्स ईव्ही कॉन्सेप्टवर तयार केली आहे.

विविध कर आणि विमा लाभांमुळे जपानी कार मार्केट पूर्वी Kei वाहनांनी भरला होता. ही वाहने कमी क्षमतेचं इंजिन असलेली कॉम्पॅक्ट वाहने होती. परंतु या वर्षांत अनेक कर सुधारणांनंतर Kei कार मालकांना त्याचा फायदा होऊ लागला आहे. या कारमेकर्सपैकी जपानमध्ये बर्‍याच मायक्रो कार्स आहेत, ज्यामध्ये होंडाचादेखील समावेश आहे. होंडाच्या सर्वात प्रसिद्ध मॉडेलचे नाव होंडा S660 आहे, जी टू सीटर कन्व्हर्टेबल स्पोर्ट्सकार आहे.

अलीकडेच, होंडाने जाहीर केले होते की, कंपनी मार्च 2022 पासून S660s चे उत्पादन सुरू करणार आहे. विशेष म्हणजे ही एक इलेक्ट्रिक कार असेल. त्याच वेळी, या कारला एस 660 ची रिप्लेसमेंट म्हणून लॉन्च केले जाईल. सध्या ही SUV अंडर डेव्हलपमेंट स्थितीत आहे आणि ही कार स्पोर्ट्स ईव्ही कॉन्सेप्टवर तयार केली आहे. या कारची झलक सर्वात आधी 2017 टोकियो मोटर शोमध्ये पाहायला मिळाली होती. तसेच 2019 मध्येच होंडाने या कारचं डिझाईन पेटंट दाखल केलं होतं.

सिंगल चार्जवर 220km रेंज

नवीन स्पोर्ट्स ईव्ही ही बल्बस व्हील आर्च आणि क्लीन लाईन्ससह टू-डोर कूप असेल. होंडा ई – हॅचबॅकचे सर्क्युलर हेडलॅम्प्स आणि ब्लॅक-आउट एनक्लोज्ड ग्रील एरिया टीक होंडा ई हॅचबॅकप्रमाणेच असेल. ही कार अंडरपिनिंग्स आणि रियल व्हील ड्राइव्ह लेआउटलाही हॅचबॅकसह शेअर करु शकते. या कारमध्ये 35.5kWh बॅटरी पॅक दिला जाऊ शकतो. ज्याद्वारे यामधील मोटर 154hp पॉवर आणि 220 किमीपर्यंतची रेंज देईल.

भारतात कधी लाँच होणार?

होंडा खरोखरच ही टू-डोर इलेक्ट्रिक कार भारतात लाँच करेल की नाही, हे अद्याप निश्चित झालेले नाही. कारण ही बाब त्या कारची किंमत आणि भारतीय बाजारातील इलेक्ट्रिक वाहनांच्या मागणीवरुन निश्चित केली जाईल. परंतु भारतात इलेक्ट्रिक वाहनांची मागणी वाढल्यास किंवा इलेक्ट्रिक वाहनांसाठीचं इन्फ्रास्ट्रक्चर इथे उभं राहण्यास सुरुवात झाल्यानंतर कदाचित ही कार भारतीय बाजारात दाखल होऊ शकते.

इतर बातम्या

इलेक्ट्रिक कार-बाईक खरेदीवरील खर्च कमी होणार, नव्या सुविधा मिळणार, सरकारचा नवा नियम

सिंगल चार्जवर 95Km रेंज, ‘या’ इलेक्ट्रिक स्कूटरला देशात सर्वाधिक पसंती

सिंगल चार्जमध्ये 70 ते 100 किमी धावेल ही सायकल, जाणून घ्या याचे खास फिचर्स

(Honda Sports EV Concept Car S660s in under production, launch Soon)

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.