Honda भारतीय बाजारात SUV लाँच करणार, जाणून घ्या कशी असेल नवी कार?

जपानी वाहन उत्पादक कंपनी होंडा भारतीय बाजारातील मोठ्या वाहनांकडे लोकांची वाढती आवड लक्षात घेऊन एसयूव्ही वाहन तयार करत आहे.

Honda भारतीय बाजारात SUV लाँच करणार, जाणून घ्या कशी असेल नवी कार?
Follow us
| Updated on: Aug 20, 2021 | 7:04 AM

मुंबई : जपानी वाहन उत्पादक कंपनी होंडा भारतीय बाजारातील मोठ्या वाहनांकडे लोकांची वाढती आवड लक्षात घेऊन एसयूव्ही वाहन तयार करत आहे. होंडा सध्या अमेझ, सिटी, जॅझ आणि WR-V सारखी वाहने भारतीय बाजारात विकत आहे. CR-V चे उत्पादन बंद केल्यानंतर, त्याच्याकडे SUV श्रेणीतील कोणतेही वाहन नाही. (Honda to launch new SUV in Indian market; know everything)

होंडा कार्स इंडिया लिमिटेडचे ​​अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी गाकू नाकानिशी यांनी पीटीआयला सांगितले की, “भारतीय बाजारात एसयूव्ही वाहने सादर करण्यासाठी आम्ही अभ्यास केला आहे. आता आम्ही याची पुष्टी करू शकतो की, आम्ही भारतीय बाजारात खास एसयूव्ही लाँच करण्याच्या पुढील टप्प्यात आहोत. तथापि, त्यांनी नवीन एसयूव्हीच्या आकार आणि लाँचिंग डेटबद्दल काहीही सांगण्यास नकार दिला.

गाकू नाकानिशी म्हणाले की अमेझ आणि सिटी वाहनांच्या विक्रीसह सेडान रेंजमध्ये कंपनीची चांगली उपस्थिती आहे, परंतु कंपनी आता त्यांच्या विद्यमान प्रोडक्ट लाइन-अपमधील अंतर भरण्यासाठी एसयूव्ही रेंजमध्ये एंट्री करेल. नाकानिशी म्हणाले की, कंपनीच्या अंदाजानुसार, प्रवासी वाहन श्रेणीमध्ये एसयूव्हीचे योगदान येत्या काळात 40 टक्क्यांच्या पुढे जाणार आहे. त्याच वेळी, ऑटो उद्योगाच्या मते, भारतीय बाजारात एकूण प्रवासी वाहन विक्रीमध्ये एसयूव्हीचा वाटा सध्या सुमारे 34 टक्के आहे.

सेडान सेगमेंटवरही फोकस कायम राहणार

तथापि, होंडा सेडान सेगमेंटवरही आपले लक्ष केंद्रित करेल. अलीकडच्या काळात विक्री कमी होत असताना, होंडाला असे वाटते की, भारतात अजूनही सेडानला मोठी मागणी आहे. होंडा कार्स इंडिया लिमिटेडचे ​​वरिष्ठ उपाध्यक्ष (सेल्स आणि मार्केटिंग) राजेश गोयल म्हणाले की, “भारतीय बाजारपेठेत आमच्याकडे अनेक सेगमेंट आहेत आणि प्रत्येक सेगमेंटचे एक स्थान आहे. म्हणूनच, असे ग्राहक कायम असतील ज्यांना सेडान आवडत राहील. गेल्या एक वर्षात लक्झरी कार निर्मात्या कंपनीने लाँच केलेल्या असंख्य सेडान हे पुरावे आहेत की अशा मॉडेल्सना मागणी आहे.

होंडाने अलीकडेच Honda N7X Concept SUV च्या रूपात नवीन 7 सीटर SUV कॉन्सेप्ट सादर केली. ही कॉन्सेप्ट एसयूव्ही दक्षिण आशियाई बाजारांसाठी होंडाची नवीन 7-सीटर एसयूव्ही असेल. रिपोर्ट्सनुसार, ही कार भारतात BR-V ची जागा घेऊ शकते.

इतर बातम्या

मारुती स्विफ्ट आणि डिझायरच्या सीएनजी मॉडेल्सची ही आहेत खास वैशिष्ट्ये; लॉन्चपूर्वीच झाला हा मोठा खुलासा

7-सीटर जीप कमांडर दहा दिवसात भारतीय बाजारात, जाणून घ्या SUV मध्ये काय असेल खास?

‘ही’ आहे भारताची पहिली इलेक्ट्रीक सुपरकार; फिचर्स, लूक पाहून तुम्हीही थक्क व्हाल

(Honda to launch new SUV in Indian market; know everything)

18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.