सनरूफ खरेदी करताय? ‘या’ गोष्टी टाळल्यास जीव धोक्यात येईल, वाचा

Car Tips and Tricks: सनरूफ खरेदी करण्याचा विचार करताय का, तेही स्थानिक मार्केटमधून, असं केल्यानं तुमचा जीवही धोक्यात येऊ शकतो. कार उत्पादक कोणत्याही वाहनात सनरूफची सुविधा देण्यापूर्वी ग्राहकांची सुरक्षितता लक्षात घेतात आणि त्यानुसार सनरूफ बनवतात. स्थानिक बाजारातून ते घेताना ‘या’ गोष्टींची काळजी घ्या.

सनरूफ खरेदी करताय? ‘या’ गोष्टी टाळल्यास जीव धोक्यात येईल, वाचा
Car sunroofImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Nov 13, 2024 | 6:38 PM

Car Tips and Tricks : कमी बजेटमुळे अनेकदा कार खरेदी करता आपण सनरूफ घेत नाही. मग आपण स्थानिक मार्केटमधून तो खरेदी करतो. पण, तुम्हाला माहिती आहे का की, याचा तुम्हाला धोका होऊ शकतो. असे केल्याने म्हणजेच लोकल मार्केटमधून सनरूफ घेतल्यानं जीव धोक्यात येऊ शकतो. जाणून घेऊया कसं?

नवीन वाहन खरेदी करणारे बहुतेक ग्राहक सनरूफ असलेल्या कारला प्राधान्य देतात, हे फीचर ग्राहकांमध्ये खूप ट्रेंडी आहे. ग्राहकांची गरज ओळखून अनेक ऑटो कंपन्या आपल्या निवडक मॉडेल्समध्ये सनरूफ फीचर्स देतात, पण काही लोक आपल्या जुन्या आवडत्या कारमध्ये लोकल मार्केटमधून सनरूफ घेण्याचाही निर्णय घेतात. लोकल मार्केटमधून सनरूफ बसवण्यापूर्वी तुम्हाला हे माहित असायला हवं की, असं केल्याने तुमचा जीवही धोक्यात येऊ शकतो.

कार उत्पादक कोणत्याही वाहनात सनरूफची सुविधा देण्यापूर्वी ग्राहकांची सुरक्षितता लक्षात घेऊन अनेक गोष्टी तशा बनवतात. पण, लोकल मार्केटमध्ये ते घेताना या गोष्टींची काळजी घेतली जात नाही.

लोकल मार्केटमधून सनरूफ घेण्याचे तोटे कोणते?

वाहन सुरक्षा

स्थानिक बाजारपेठेतून सनरूफ बसवल्यास त्याचा परिणाम वाहनाच्या रचनेवर होतो. गाडीच्या एकंदर फ्रेममध्ये छत हादे खील एक महत्त्वाचा भाग आहे. पण सनरूफ बसवण्यासाठी छत कापले तर छताची ताकद कमी होते, ज्यामुळे गाडीची फ्रेम कमकुवत होते. यामुळे अपघात होण्याची शक्यताही वाढते.

संशोधनानंतर सनरूफ

ऑटो कंपन्या संशोधनानंतर सनरूफचा समावेश करून कारची रचना कमकुवत होणार नाही, याची काळजी घेतात, ज्यामुळे कारची ताकदही टिकून राहते.

खराब होण्याची शक्यता

ऑटो कंपन्या जेव्हा सनरूफ बसवतात तेव्हा ते याची काळजी घेतात की जोपर्यंत कारचे आयुष्य आहे तोपर्यंत ग्राहकांना सनरूफशी संबंधित कोणतीही समस्या येणार नाही. त्याचबरोबर लोकल मार्केटमधले सनरूफ लावल्यास सनरूफचे भाग खराब होण्याची शक्यता वाढू शकते. जर भाग खराब झाला असेल तर तो दुरुस्त करण्यासाठी आपल्याला पैसे खर्च करावे लागू शकतात.

गळतीची समस्या

लोकल मार्केटमधून बसवताना सनरूफ नीट बसवले नाही तर पावसाळ्यात सनरूफमधून पाणी येऊ शकते. पाण्यामुळे मोटार यंत्रणेचे नुकसान होऊ शकते, जरी असे झाले तरी ते दुरुस्त करण्यासाठी आपल्याला अधिक पैसे खर्च करावे लागतील. हे लक्षात घ्या की, थोडे पैसे वाचवण्यापेक्षा तुमचं जीवन महत्त्वाचं आहे. त्यामुळे दर्जेदार वस्तू घेण्यावर भर द्या. सनरूफच्या आणि इतरही बाबतीत.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.