खुशखबर! Mahindra कडून Scorpio वर बंपर डिस्काऊंट

तुम्ही जर या महिन्यात महिंद्रा स्कॉर्पिओ (Mahindra Scorpio) ही कार घरी आणण्याचा विचार करीत असाल तर तुमच्यासाठी एक चांगली बातमी आहे.

खुशखबर! Mahindra कडून Scorpio वर बंपर डिस्काऊंट
Mahindra Scorpio
Follow us
| Updated on: Apr 14, 2021 | 4:50 PM

मुंबई : तुम्ही जर या महिन्यात महिंद्रा स्कॉर्पिओ (Mahindra Scorpio) ही कार घरी आणण्याचा विचार करीत असाल तर तुमच्यासाठी एक चांगली बातमी आहे. महिंद्रा आणि महिंद्रा कंपनी एप्रिल 2021 मध्ये स्कॉर्पिओ कारवर 27,177 रुपयांपर्यंतची डिस्काऊंट ऑफर देत आहेत. ही ऑफर महिंद्रा स्कॉर्पिओच्या पाच व्हेरिएंट्सवर S3 +, S5, S7, S9 आणि S11 वर उपलब्ध आहे. या व्हेरिएंट्सच्या किंमती 11.99 ते 16.53 लाख (एक्स-शोरूम, नवी दिल्ली) रुपयांच्या दरम्यान आहेत. (Huge discounts on Mahindra Scorpio, offer valid till 30th April)

महिंद्रा स्कॉर्पिओ एस 3 + वर 15,135 रुपयांपर्यंत सूट मिळत आहे. यात 5000 रुपयांपर्यंतचा रोख लाभ आणि 10,135 रुपयांपर्यंतचा कॉर्पोरेट लाभ देण्यात आला आहे. महिंद्रा स्कॉर्पिओ एस 5 वर 25,135 रुपयांपर्यंत सूट मिळत आहे. यात 5000 रुपयांपर्यंतचे रोख फायदे, 10,135 रुपयांपर्यंतचे कॉर्पोरेट फायदे आणि 10,000 रुपयांपर्यंतचे इतर बेनिफिट समाविष्ट आहेत.

महिंद्रा स्कॉर्पिओ एस 7 वर 10,135 रुपयांपर्यंत सवलत मिळत आहे, जी कॉर्पोरेट बेनिफिट म्हणून दिली जात आहे. महिंद्रा स्कॉर्पिओ एस 9 वर 18,176 रुपयांपर्यंत सवलत मिळत आहे. यात 3,041 रुपयांपर्यंतचा कॅश बेनिफिट, 10,135 रुपयांपर्यंतचा कॉर्पोरेट बेनिफिट आणि 5,000 रुपयांपर्यंतचे इतर फायदे आहेत.

महिंद्रा स्कॉर्पिओ एस 11 वर 27,177 रुपयांपर्यंत सूट मिळत आहे. यात 7,042 रुपयांपर्यंतचा कॅश बेनिफिट, 10,135 रुपयांपर्यंतचा कॉर्पोरेट बेनिफिट आणि 10,000 रुपयांपर्यंतच्या इतर बेनिफिट्सचा समावेश आहे.

Mahindra ची स्वस्त Scorpio लवकरच बाजारात

महिंद्रा अँड महिंद्रा (Mahindra & Mahindra) कंपनी ऑल-न्यू स्कॉर्पियोच्या (All New Scorpio) लाँचिंगसाठी जोरदार तयारी करत आहे. महिंद्राची ही बहुप्रतीक्षित कार जून 2021 च्या आसपास लाँच केली जाण्याची शक्यता आहे. या नव्या Scorpio चे फोटो पाहून लक्षात येईल की, ही कार जुन्हा Scorpio पेक्षा थोडी मोठी आणि बोल्ड असेल. ऑल-न्यू स्कॉर्पियो या कारमध्ये कंपनीने काही बदल केले आहेत. आगामी स्कॉर्पियो नवीन लॅडर-फ्रेम चेसीवर आधारित असेल. या कारच्या लीक झालेल्या फोटोवरुन अंदाज बांधला जातोय की, आगामी स्कॉर्पियोमध्ये सध्याच्या स्कॉर्पियोच्या तुलनेत मोठं फुटप्रिंट असेल, हे नवीन फ्रंट ग्रिलने लेस असेल. यामध्ये वर्टिकल स्लॅट्ससह मध्यभागी कंपनीचा लोगो असेल.

स्कॉर्पियोच्या नवीन हेडलॅम्प्सना रीमॉडेल्ड ट्विन-पॉड हेडलॅम्प्सद्वारे फ्लँक केले जातील. बोनेट थोडं लांब असेल आणि एक नवीन फ्रंट बम्परही दिलं जाईल. मागच्या बाजूचं टेलगेटही मोठं असेल. एलईडी टेललाइट्स आणि रूफ-माउंटेड स्टॉप लँपसह येईल. असं म्हटलं जातंय की कंपनी ही कार 12 लाख रुपये इतक्या किंमतीत लाँच करु शकते. ही या लाईनअपमधील सर्वात स्वस्त कार असेल. महिंद्राची नेक्स्ट जनरेशन New Scorpio ही गाडी ZEN3 प्लॅटफॉर्मवर आधारित असेल. नव्या महिंद्रा स्कॉर्पियोच्या नव्या डिझाईनमध्ये, ज्यादा जागा, नवा इंटेरियर लूक आणि लांब व्हीलबेसच्या सह लाँच केले जाणार आहे. या कारमध्ये 2.2 लीटर टर्बोचार्ज्ड डीझेल आणि 2.0 लीटर टर्बोचार्ज्ड पेट्रोल इंजिन असेल. यामध्ये मॅन्युअल आणि ऑटोमेटिक ट्रांन्समिशन सुविधा उपलब्ध असेल.

इतर बातम्या

Mahindra कंपनी XUV500 चं उत्पादन बंद करणार, जाणून घ्या कारण

Renault कडून SUV सह अनेक गाड्यांवर 750000 रुपयांपर्यंतचा डिस्काऊंट

अलर्ट! 2 दिवसांत कार-बाईक-स्कूटरवर लावली नाही ही खास नंबर प्लेट, तर 5500 रुपयांचा दंड

(Huge discounts on Mahindra Scorpio, offer valid till 30th April)

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.