Royal Enfield : हंटर 350 च्या व्हेरिएंटमध्ये गोंधळला आहात? जाणून घ्या रेट्रो अन् मेट्रोमधील फरक
Royal Enfield : रॉयल एनफिल्ड हंटर 350 ने भारतीय दुचाकी मार्केटमध्ये धूम माजवली आहे. ही लेटेस्ट बाईक आपली किंमत आणि फीचर्सबद्दल ग्राहकांमध्ये एकच चर्चेचा विषय ठरत आहे. जाणून घ्या...
मुंबई : रॉयल एनफिल्डने (Royal Enfield) आपली सर्वात बजेट बाईक हंटर 350 (Hunter 350) लाँच केली आहे. कंपनीने रेट्रो आणि मेट्रो या दोन व्हेरिएंटमध्ये नवीन बाइक ग्राहकांसमोर आणली आहे. मेट्रो व्हेरियंटमध्ये डॅपर आणि रेबेल सिरीजही देण्यात आल्या आहेत. हंटर 350 रेट्रो व्हेरिएंट सर्वात स्वस्त असून त्याची एक्सशोरूम किंमत 1.49 लाख रुपये आहे. दुसरीकडे, मेट्रो डॅपर सिरीजची एक्सशोरूम किंमत 1.63 लाख रुपये आहे. मेट्रो रेबेल हंटर 350 हे सर्वात महाग व्हेरिएंट असून त्याची एक्सशोरूम किंमत 1.68 लाख रुपये इतकी आहे. दोन्ही व्हेरिएंटची आपाआपली फीचर्स असून रेट्रो आणि मेट्रो व्हेरिएंट (Retro and metro variants) एकमेकांसारखे असूनही ते एकमेकांपेक्षा किती वेगळे आहेत, याची माहिती पुढील काही मुद्दयांच्या आधारे घेणार आहोत.
रेट्रो आणि मेट्रो – एकमेकांपेक्षा किती वेगळे
- – हंटरच्या दोन्ही प्रकारांमधील सर्वात मोठा फरक चाकामध्ये दिसून येतो. दोन्ही व्हेरियंटमध्ये 17 इंच चाके देण्यात आली आहेत. पण रेट्रोला वायर स्पोक व्हील आणि मेट्रोला अलॉय व्हील मिळतात.
- – दोन्ही बाईकमध्ये वापरलेले टायर्स आकार आणि मॉडेलनुसार भिन्न आहेत. रेट्रो व्हेरियंटला 110/80-17 आणि 120/80-17 ट्यूब टायर्स मिळतात, तर मेट्रो व्हेरियंटला पुढील बाजूस 110/70-17 रबर टायर आणि मागील बाजूस 140/70-17 ट्युब टायर्स मिळतात. दोन्ही प्रकारांमध्ये Ceat Zoom XL ट्यूबलेस टायर देण्यात आले आहेत.
- – दोन्ही व्हेरियंटच्या ब्रेकींगमध्येही फरक आहे. मेट्रोमध्ये मागील डिस्क ब्रेक आणि ड्युअल चॅनल एबीएस देण्यात आला आहे. दुसरीकडे, रेट्रो वेरिएंटमध्ये ड्रम ब्रेक्स आणि सिंगल चॅनल एबीएस फीचर्स मिळतात.
- – रेट्रो आणि मेट्रो व्हेरियंटच्या इन्स्ट्रूमेंटेशनमध्येही भिन्नता आहे. मेट्रो प्रकारात मोठ्या डिजिटल इनसेटसह फॅन्सी इन्स्ट्रूमेंट क्लस्टर आहे. दुसरीकडे, रेट्रोला मेटियर आणि स्क्रम सारख्या लहान डिजिटल रीडआउटसह बेसिक स्पीडोमीटर पॉड मिळतो.
- – मुख्य फरक टेल लॅम्प आणि गोल इंडिकेटरच्या स्वरूपात दिसतो. मेट्रो प्रकारात एलईडी टेल लॅम्प आणि राउंड इंडिकेटर देण्यात आले आहेत. दुसरीकडे, रेट्रोला जुन्या पद्धतीचे हॅलोजन टेल लॅम्प आणि रेक्टेंगुलर इंडीकेटर्स मिळतात.
- – रॉयल एनफील्ड हंटर 350 च्या डिझाईनबद्दल बोलायचे झाल्यास, मेट्रो व्हेरियंटला स्लीक, स्टायलिश रीअर ग्रॅब रेल मिळते. दुसरीकडे, हंटर 350 च्या रेट्रो व्हेरियंटमध्ये ट्युब्युलर ग्रॅब रेलचे जुने प्रकार देण्यात आले आहेत.
- – 349cc सिंगल सिलेंडर 2 व्हॉल्व्ह इंजिन मेटियोर आणि क्लासिक 350 या दोन्ही प्रकारांमध्ये देण्यात आले आहे. तरुणांना आकर्षित करण्यासाठी हंटरमध्ये फ्यूअल आणि इग्निशनचे मॅप्स बदलण्यात आल्याचे रॉयल एनफिल्डचे म्हणणे आहे.
- – फ्रेम आणि सस्पेंशन दोन्ही व्हेरिएंटमध्ये समान आहेत. त्यांना टेलिस्कोपिक फोर्कवर सस्पेंशन आणि डबल डाउनट्यूब फ्रेमवर ट्विन शॉक मिळतात. दोन्ही व्हेरिएंटमध्ये समान 300 मिमी फ्रंट डिस्क ब्रेक आहेत.
Non Stop LIVE Update