मुंबई : भारतात 18 जूनला लाँच झालेल्या Hyundai Alcazar SUV ला ग्राहकांकडून चांगली पसंती मिळत आहे. लाँचिंगनंतर अवघ्या एका महिन्यात कंपनीला या एसयूव्हीसाठी 11,000 हून अधिक बुकिंग्स मिळाल्या आहेत. लाँचिंगपासून आतापर्यंत कंपनीने या एसयूव्हीच्या 5,600 मोटारी विकल्या आहेत. या कारच्या पेट्रोल व्हेरिएंटला सर्वाधिक मागणी असल्याचे कंपनीकडून सांगण्यात आले आहे. (Hyundai Alcazar SUV Receives 11,000 Bookings in Less Than a Month Since Launch)
कंपनीने या कारची सुरुवातीची किंमत 16.30 लाख रुपये इतकी निश्चित केली आहे, तर या कारच्या टॉप व्हेरिएंटसाठी ग्राहकांना 19.99 लाख रुपये मोजावे लागतील. या दोन्ही किंमती एक्स शोरुम आहेत. ही कार भारतीय बाजारात टाटा सफारी आणि एमजी हेक्टर प्लस या दोन गाड्यांना तगडी स्पर्धा देत आहे. ह्युंदाय Alcazar ही एसयूव्ही क्रेटावर आधारित आहे, जी 2015 मध्ये लाँच करण्यात आलेली मिड-साईज एसयूव्ही आहे. क्रेटाने भारतीय बाजारात ह्युंदायला मोठं नाव मिळवून दिलं आहे. अल्काझारचा व्हीलबेस 2760 मिमी इतका आहे, तर आपल्याला यामध्ये 180 लीटर बूट स्पेस मिळते.
Alcazar ही कार कंपनीने तीन वेगवेगळ्या व्हेरिएंट्समध्ये सादर केली आहे. ज्यामध्ये Prestige, Platinum आणि Signature चा समावेश आहे. यामध्ये पेट्रोल आणि डिझेल असे दोन्ही प्रकार उपलब्ध आहेत. ग्राहकांना पेट्रोलमध्ये मिळणारं बेस व्हेरिएंट 7 सीटर पर्याय असेल आणि हे व्हेरिएंट मॅन्युअल ट्रांसमिशनसह येईल. त्याच वेळी, डिझेल इंजिनचे बेस मॉडेलदेखील सारखंच आहे. यानंतर तुम्हाला Prestige 6 सीट ऑप्शन आणि नंतर Prestige (O) मध्ये 7 सीट ऑप्शन मिळेल. एकूण 6 सिंगल आणि दोन ड्युअल टोन कलरसह ही एसयूव्ही सादर करण्यात आली आहे.
सिंगल टोन कलरमध्ये तुम्हाला Phantom ब्लॅक, पोलर व्हाइट, Starry नाइट, Taiga ब्राऊन, Titan ग्रे आणि टायफून सिल्व्हर हे रंग मिळतील. डुअल टोन कलरमध्ये तुम्हाला पोलर व्हाइट, फँटम ब्लॅक रूफ आणि टायटन ग्रे हे रंग मिळतील. या कारच्या इंजिनबद्दल बोलायचे झाल्यास, यामध्ये तुम्हाला 2.0 लीटरचं पेट्रोल इंजिन मिळेल, जे 152 hp पॉवर आणि 191Nm टॉर्क देईल. यामध्ये तुम्हाला 1.5 लीटर डीझेल इंजिन मिळेल, जे 115hp पॉवर 250Nm टॉर्क देईल. पेट्रोल इंजिन 14.2 किलोमीटर प्रती लीटर मायलेज देतं. तर डिझेल इंजिन तुम्हाला 18.1 kmpl मायलेज देईल.
या कारमध्ये तुम्हाला 26.03cm मल्टी डिस्प्ले डिजिटल क्लस्टर, 8 स्पीकर्ससह बोस प्रीमियम साऊंड सिस्टिम, ऑटो हेल्दी एयर प्यूरीफायर, फ्रंट रो सीटबॅक टेबल रिट्रॅक्टेबल कप होल्डर आणि आयटी डिव्हाइस होल्डसह अनेक फीचर्स मिळतात. तसेच यामध्ये तुम्हाला फ्रंट रो स्लायडिंग सनवायजरही मिळेल. गाडीमध्ये रियर विंडो सनशेड मिळेल. तसेच यामध्ये तुम्हाला व्हॉईस इनेबल्ड स्मार्ट पॅनोरोमिक सनरूफ देण्यात आलं आहे. ही कार 64 कलर एंबियंट लायटिंग, पॉवर ड्रायव्हर सीट आणि कनेक्टेड कार टेक्नोलॉजीसह येते.
इतर बातम्या
‘या’ आहेत देशातील सर्वात स्वस्त 7 सीटर कार्स, मोठ्या कुटुंबासाठी बेस्ट पर्याय
(Hyundai Alcazar SUV Receives 11,000 Bookings in Less Than a Month Since Launch)