‘इंडियन कार ऑफ द ईयर’ पुरस्काराचा मान Hyundai च्या ‘या’ गाडीला, इलेक्ट्रिक कार्समध्ये Tata ची बाजी

देशातील सर्वोत्कृष्ट गाड्यांबाबतची माहिती जाहीर करण्यात आली आहे. (Indian Car of the Year 2021 award Announced)

'इंडियन कार ऑफ द ईयर' पुरस्काराचा मान Hyundai च्या 'या' गाडीला, इलेक्ट्रिक कार्समध्ये Tata ची बाजी
2020 Hyundai i20
Follow us
| Updated on: Feb 28, 2021 | 3:42 PM

मुंबई : देशातील सर्वोत्कृष्ट गाड्यांबाबतची माहिती जाहीर करण्यात आली आहे. ‘इंडियन कार ऑफ द ईयर अवॉर्ड्स 2021’ मध्ये अनेक कंपन्यांच्या वेगवेगळ्या वाहनांनी वाहवा मिळवली. परंतु त्या सर्वांमध्ये ह्युंदाय कंपनी सर्वोत्कृष्ट ठरली. ह्युंदाय न्यू जनरेशन i20 (Hyundai New Generation i20) ने कार ‘इंडियन ऑफ द ईयर’ पुरस्कार जिंकला. त्याच वेळी, लँड रोव्हरने प्रीमियम कार सेगमेंटमध्ये पहिलं स्थान पटकावलं. तर टाटा नेक्सॉन EV (Tata Nexon EV) ही यंदाची ‘ग्रीन कार ऑफ द ईयर’ ठरली. (Hyundai i20 wins 2021 Indian Car of the Year 2021 award)

कार ऑफ द ईयर या पुरस्कारासाठी वाहनांची निवड करण्यासाठी मतदान प्रक्रिया राबवण्यात आली. यासाठी काही ज्युरींचीन नेमणूक करण्यात आली होती. या मतदान प्रक्रियेदरम्यान प्रत्येक ज्युरी सदस्याकडे 25 गुण होते. या गुणांचा मतांच्या रुपात वापर करण्यात आला आणि 5 वाहने शॉर्टलिस्ट करण्यात आली. त्या पाच वाहनांमधून i20 ला विजेती (Car of the year 2021) कार घोषित करण्यात आले. या पुरस्काराचे यंदाचे 16 वे वर्ष असून यावेळी ज्युरींचं मतं डिजिटली रेकॉर्ड करण्यात आली.

ग्रीन कॅटेगरीबद्दल बोलायचे झाल्यास, टाटा नेक्सॉन ईव्हीला 106 गुण मिळाले, तर ह्युंदाय कोना इलेक्ट्रिकला 99 गुण, MG ZS EV या कारला 93 गुण मिळाले. नेक्सॉननंतर या दोन्ही वाहनांना द्वितीय व तृतीय क्रमांक मिळाला. नेक्सॉन ईव्हीने आतापर्यंत बरेच पुरस्कार जिंकले आहेत. जर आपण प्रीमियम कार सेगमेंटबद्दल चर्चा केली तर लँड रोव्हरला 108 गुण मिळाले. मर्सिडीज बेंझ GLE आणि बीएमडब्ल्यू 2 सिरीजला अनुक्रमे 77 आणि 61 गुण मिळाले.

i20 चा धुमाकूळ

ह्युंदाय i20 या कारला ‘कार ऑफ द इयर 2021’ म्हणून गौरविण्यात आले. ह्युंदाय आय 20 ला 104 गुण मिळाले. ही कार काहीच महिन्यांपूर्वी कंपनीने लॉन्च केली होती. किआ सॉनेट, महिंद्रा थार या दोन कार अनुक्रमे दुसऱ्या आणि तिसऱ्या स्थानावर आहेत. सोनेटला 91 तर थारला 78 गुण मिळाले.

नवीन Hyundai i20 या कारची सुरुवातीची किंमत 6.80 लाख रुपये इतकी आहे. (New Hyundai i20 Price). ही कार पेट्रोल आणि डिझेल, अशा दोन्ही इंजिन पर्यायांसह उपलब्ध आहे. ही कार चार व्हेरिएंट्समध्ये सादर करण्यात आली आहे. यामध्ये Magna, Sportz, Asta आणि Asta (O) यांचा समावेश आहे. नव्या Hyundai i20 मध्ये जुन्या कारच्या तुलनेत अनेक फीचर्स वाढवण्यात आले आहेत.

कशी आहे i20?

ही कार पेट्रोल, डिझेल, टर्बो पेट्रोल बीएस-6 इंजिन आणि ट्रान्समिशनसह सज्ज आहे. ज्यामध्ये फर्स्ट इन-सेगमेंट इंटेलिजंट मॅन्युअल ट्रान्समिशन (आईएमटी), इंटेलिजंट व्हेरिएबल ट्रान्समिशन (आईवीटी), 7-स्पीड ड्यूल क्लच ट्रान्समिशन (डीसीटी) आणि मॅन्युअल व्हेरिएंटचा समावेश आहे. all new i20 कारच्या पेट्रोल व्हेरिएंटची किंमत 6.79 लाख रुपये ते 11.17 लाख रुपयांमध्ये आहे. तर डिझेल व्हेरिएंटची किंमत 8.19 लाख रुपयांपासून ते 10.59 लाख रुपयांपर्यंत आहे. या किंमती 31 डिसेंबर 2020 पर्यंत लागू असणार आहे.

नवीन i20 मध्ये 1.2 लीटर पेट्रोल इंजिन आहे. ज्यामध्ये 83hp पॉवर आणि 113Nm टॉर्क जनरेट करण्याची क्षमता आहे. या इंजिनसह 5 स्पीड मॅन्युअल किंवा CVT गियरबॉक्सचा पर्याय आहे. डिझेल इंजिन 1.5 लीटर टर्बो यूनिट आहे जे 100hp पॉवर आणि 240Nm टॉर्क निर्माण करु शकतं. डिझेल इंजिनासह 6 स्पीड मॅन्युअल ट्रान्समिशनसुद्धा आहे. या कारचे इंजिन Venue, Creta, 2020 Verna आणि Seltos या कारमध्ये यापूर्वी वापरण्यात आले आहे.

नवीन i20 च्या फ्रंटमध्ये मोठे ग्रिल, शार्प हेडलॅम्प आणि सिग्नेचर एलईडी डीआरएल दिले आहेत. रुफलाईन आणि शार्प स्टाईलचा सी-पिलरमुळे कारचा लूक अप्रतिम वाटतो. तर नवीन i20 च्या मागच्या बाजूला रॅपअराऊंड एलईडी टेललाईट आहे.

कंपनीने या कारबाबत म्हटलं आहे की, ऑल-न्यू आय-20 ही कार ‘लाइट वेट प्लेटफॉर्म’वर बनवण्यात आली आहे. ही कार वजनाने हलकी आहे. ही कार 66 टक्के ‘अॅडव्हान्स्ड अँड हाय स्ट्रेंथ स्टील’द्वारे बनवण्यात आली आहे. ही कार ग्राहकांना पूर्ण सुरक्षा देण्यास सक्षम आहे. या कारचा परफॉर्मन्स जबरदस्त आहे.

Hyundai i20 च्या पेट्रोल आणि डिझेल व्हेरिएंटच्या किंमती

मॅग्ना पेट्रोल – 6.79 लाख रुपये मॅग्ना डिझेल – 8.19 लाख रुपये स्पोर्ट्ज पेट्रोल – 7.59 लाख रुपये स्पोर्ट्ज डिझेल- 8.99 लाख रुपये स्पोर्ट्ज IVT – 8.59 लाख रुपये Asta – 8.69 लाख रुपये Asta IVT – 9.69 लाख रुपये Asta(O) पेट्रोल – 9.19 लाख रुपये Asta (O) डिझेल – 10.59 लाख रुपये

संबंधित बातम्या

Crash Test : टाटा नेक्सॉन, ह्युंदाई वेन्यू ते ईकोस्पोर्ट, ‘या’ पाच सब-कॉम्पॅक्ट एसयूव्ही सुरक्षित आहेत का?

पीएसए ग्रुपची छोटी एसयुव्ही दिवाळीत होणार लाँच; व्हेन्यू, सॉनेट आणि नेक्सॉनला देणार टक्कर

धमाकेदार ऑफर! 4 लाखांची कार अवघ्या 2 लाखात

(Hyundai i20 wins 2021 Indian Car of the Year 2021 award)

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.