एक लाखांच्या डाऊन पेमेंटवर घरी आणा ‘ही’ कार… किती भरावा लागेल ईएमआय?

ह्युंदाई इंडियाने नुकतेच 2022 ह्युंदाई वेन्यू फेसलिफ्ट कार लाँच केली असून यात आकर्षक लुक आणि विविध फीचर्सचा समावेश आहे. या एसयुव्हीची एक्सशोरुम किंमत 7.53 लाख रुपयांपासून सुरू होत आहे. ग्राहक केवळ 1 लाख रुपये डाऊन पेमेंट भरून वेन्यूसाठी फायनान्स करु शकता.

एक लाखांच्या डाऊन पेमेंटवर घरी आणा ‘ही’ कार... किती भरावा लागेल ईएमआय?
Hyundai CarImage Credit source: Social Media
Follow us
| Updated on: Jul 29, 2022 | 1:48 PM

ज्या ग्राहकांना 10 लाखांच्या बजेटमध्ये एक चांगला लूक अन्‌ आकर्षक फीचर्स तसेच उत्तम मायलेज असलेली एसयुव्ही (SUV) खरेदी करायची असेल त्यांच्यासाठी ह्युंदाई वेन्यू (Hyundai Venue) हा एक चांगला पर्याय आहे. ह्युंदाई वेन्यू फेसलिफ्टची किंमत 7.53 लाख रुपयांपासून सुरू होते. E, S, S+/S(O), SX आणि SX(O) सारख्या 5 ट्रिम लेव्हल आणि 16 व्हेरिएंटमध्ये सब कॉम्पॅक्ट 4 मीटर एसयुव्ही वेन्यू ऑफर केली जात आहे. या सर्व व्हेरिएंटच्या किंमती 7.53 लाखांपासून ते 12.72 लाखापर्यंत आहेत. नवीन ह्युंदाई वेन्यू पेट्रोल तसेच डिझेल इंजिन आणि मॅन्युअल तसेच ऑटोमॅटिक ट्रान्समिशन (Automatic Transmission) पर्यायांमध्ये उपलब्ध असून यातून 23 kmpl पर्यंत मायलेज मिळते.

9.8 टक्के व्याजदर

ह्युंदाई वेन्यू ई पेट्रोल हे सर्वात बजेट मॉडेल आहे ज्याची एक्सशोरूम किंमत 7.53 लाख रुपये आहे. ऑन-रोड किंमत 8,49,778 रुपये आहे. जर तुम्ही ह्युंदाई वेन्यू ई पेट्रोल मॉडेलला 1 लाख (ऑन-रोड प्लस प्रोसेसिंग फी आणि पहिल्या महिन्याचा ईएमआय) डाउन पेमेंट देऊन फायनान्स केला तर ईएमआय कॅल्क्युलेटरनुसार ग्राहकांना 9.8 टक्के व्याजदराने 7,49,778 रुपयांचे कर्ज मिळेल. यानंतर, पुढील 5 वर्षांसाठी, ग्राहकांना दरमहा 15,857 रुपये ईएमआय भरावा लागेल. ह्युंदाई वेन्यू ई पेट्रोल व्हेरियंटसाठी फायनान्स केल्यास ग्राहकांना 2 लाखांपेक्षा जास्त व्याज लागेल.

2.36 लाखांपेक्षा जास्त व्याज

ह्युंदाई वेन्यू एस पेट्रोल व्हेरिएंटची किंमत 8.70 लाख रुपये आहे असून ऑनरोड किंमत 9,78,742 रुपये आहे. ग्राहक 1 लाख (ऑन-रोड प्लस प्रोसेसिंग फी आणि पहिल्या महिन्याचा ईएमआय) डाउनपेमेंट भरून ह्युंदाई वेन्यू एस व्हेरियंटसाठी फायनान्स करु शकतात. कार देखो ईएमआय कॅल्क्युलेटरनुसार ग्राहकांना यानुसार, 8,78,742 चे कर्ज मिळेल. यानंतर, 9.8 टक्के व्याजदरानुसार, 5 वर्षांसाठी प्रत्येक महिन्याला 18,584 रुपयांचा हप्ता भरावा लागेल. ह्युंदाई वेन्यू पेट्रोल व्हेरियंटसाठी फायनान्स केल्यावर ग्राहकांना 2.36 लाखांपेक्षा जास्त व्याज लागेल.

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.