Hyundai च्या ‘या’ गाडीची कमाल, जानेवारीमध्ये तब्बल 11,779 युनिट्स सेल

जानेवारी 2021 मध्ये ह्युंदई वेन्यू सबकॉम्पॅक्ट SUV (Hyundai Venue) सेल्स टेबलमध्ये टॉपवर पोहोचली आहे

Hyundai च्या 'या' गाडीची कमाल, जानेवारीमध्ये तब्बल 11,779 युनिट्स सेल
Follow us
| Updated on: Feb 05, 2021 | 3:01 PM

मुंबई : जानेवारी 2021 मध्ये ह्युंदई वेन्यू सबकॉम्पॅक्ट SUV (Hyundai Venue) सेल्स टेबलमध्ये टॉपवर पोहोचली आहे (Most Selling Subcompact SUV). या गाडीच्या आकड्यांमध्ये दर वर्षी 75 टक्क्यांची वाढ झाल्याचं चित्र आहे. ह्युंदई मोटार इंडियाने गेल्या महिन्यात एकूण 11,779 युनिट्स विकले आहेत. वेन्यूनंतर मारुती सुझुकी ब्रेजाचा नंबर येतो. गेल्या महिन्यात ब्रेजाने एकूण 10,623 युनिट्स विकले आहेत (Most Selling Subcompact SUV).

ब्रेजामध्ये 4.82 टक्क्यांची वृद्धी पाहायला मिळाली. यादीत तिसऱ्या क्रमांकावर किआ सोनेट आहे. जानेवारी 2021 मध्ये या एकूण 8,859 युनिट्स विकले गेले आहेत. किआ सोनेटला गेल्या वर्षी लॉन्च करण्यात आलं होतं. ही कार दक्षिण कोरिअन कार मेकरची सर्वात दमदार कार आहे आणि लॉन्चनंतर याची सर्वाधिक विक्री झाली.

सोनेटनंतर टाटा नेक्सॉनचा क्रमांक आहे. टाटा नेक्सॉन SUV ने एकूण 8,825 युनिट्स विकल्या. कंपनीच्या सेलमध्ये जानेवारीमध्ये 143.19 टक्क्यांची वाढ झाली आहे. सब कॉम्पॅक्ट SUV ची डिमांड देशात दिवसेंदिवस वाढत आहे. निसान मॅग्नाईट आणि मग रेनॉ काईगर लोकांच्या अत्यंत पसंतीस उतरत आहे. काईगरची किंमत 5 ते 8 लाख रुपयांपर्यंत आहे.

वेन्यूचं डिझाईन

वेन्यूचं डिझाईन अत्यंत बोल्ड आहे. बाजुने ही क्रेटा सारखी दिसते. पण, समोर आणि रिअर साईडवरुन ही अत्यंत वेगळी दिसते. एसयूव्हीमध्ये केसकेडिंग ग्रिल, स्प्लिट हेडलॅम्प्स, प्रोजेक्टर फॉग लॅम्प्स, एलईडी टेललॅम्प्स, 16-इंचचा डायमंड कट अलॉय व्हिल्ज देण्यात आले आहेत. साईडमध्ये स्ट्रॉन्ग कॅरेक्टर लाईन्स याचा लुकला आणखी स्पोर्टी बनवतं. एसयूव्हीमध्ये प्रीमिअम लेझर कट फिनिश डॅशबोर्ड आणि फॅब्रिक आणि लेदर फिनिश सीट्स देण्यात आली आहेत. जे कॅबिनला प्रीमिअम फील देते. यामध्ये स्लाईडिंग फ्रंट आर्म रेस्ट आणि कप होल्डरसोबत रिअर आर्म रेस्ट देण्यात आले आहेत. वेन्यूचा बूट स्पेस 350-लीटरचा आहे. एसयूव्हीमध्ये 10 कलर ऑप्शन उपलब्ध आहेत (Most Selling Subcompact SUV).

फीचर्स

वेन्यूमध्ये तीन इंजिन ऑप्शन देण्यात आले आहेत.

>> पहिलं – 1.2 लीटर पेट्रोल इंजिन आहे, जे 82 bhp चा पावर आणि 114 Nm पीक टॉर्क जनरेट करतं.

>> दूसरं – 1.4 लीटर डिझेल इंजिन आहे, जे 89 bhp चा पावर आणि 220 Nm पीक टॉर्क जनरेट करतं.

>> तिसरं – 1.0 लीटर टर्बोचार्ज्ड पेट्रोल इंजिन आहे, जे 118 bhp चा पावर आणि 172 Nm पीक टॉर्क जनरेट करतं.

>> वेन्यूची सुरुवातीची किंमत 6.50 लाख ते 11.10 लाख रुपयांदरम्यान आहे.

Most Selling Subcompact SUV

संबंधित बातम्या :

शानदार ऑफर! 5 लाखांहून अधिक किंमत असलेली कार अवघ्या 1.70 लाख रुपयांमध्ये खरेदी करा

Mahindra Thar च्या इंजिनमध्ये मोठा बिघाड, कंपनीने गाड्या परत मागवल्या

Toyota Sales Report | टोयोटा किर्लोस्करचा धडाका, वाहनांच्या विक्रीत 92 टक्क्यांची वाढ

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.