NCAP क्रॅश टेस्टमध्ये Hyundai Verna सपशेल नापास, कारला 0-स्टार सेफ्टी रेटिंग

Hyundai या दक्षिण कोरियन कार निर्मात्या कंपनीसाठी लॅटिन NCAP क्रॅश टेस्टमधून निराशाजनक निकाल समोर आले आहेत. लॅटिन NCAP क्रॅश टेस्टमध्ये Hyundai Verna ने 0-स्टार रेटिंग मिळवलं आहे.

NCAP क्रॅश टेस्टमध्ये Hyundai Verna सपशेल नापास, कारला 0-स्टार सेफ्टी रेटिंग
Hyundai Verna
Follow us
| Updated on: Dec 17, 2021 | 6:30 AM

मुंबई : भारतीय ग्राहक गेल्या काही वर्षांपासून गाडी खरेदी करताना आपल्या आणि वाहनाच्या सुरक्षिततेचा (Car Safety) अधिक विचार करत असल्याचे निदर्शनास आले आहे. प्रत्येक ग्राहक त्याची ड्रिम कार किती सुरक्षित आहे, याचा विचार हमखास करतो. जगभरात अशा अनेक कंपन्या आहेत ज्या वाहनं बनवताना केवळ तिच्या लुक्स आणि फिचर्सचाच विचर न करता कारच्या सुरक्षिततेचाही खूप विचार करतात. परंतु काही कंपन्या अशाही आहेत ज्यांच्या कार बाहेरुन दमदार दिसतात, परंतु मजबुती आणि सुरक्षिततेच्या बाबतीत मागे पडतात. आज आम्ही तुम्हाला अशाच एका कारबद्दल सांगणार आहोत, जी कार सुरक्षिततेच्या बाबतीत सर्वात वाईट रेटिंगसह येते. या कारला NCAP (New Car Assessment Program) कडून झिरो रेटिंग मिळालं आहे. (Hyundai Verna scores a duck in Latin NCAP safety crash tests)

Hyundai या दक्षिण कोरियन कार निर्मात्या कंपनीसाठी लॅटिन NCAP क्रॅश टेस्टमधून निराशाजनक निकाल समोर आले आहेत. लॅटिन NCAP क्रॅश टेस्टमध्ये Hyundai Verna ने 0-स्टार रेटिंग मिळवलं आहे. लॅटिन अमेरिकन मार्केटमध्ये विकल्या जाणार्‍या कारसाठी, लॅटिन NCAP ने Hyundai Xcent च्या बेस व्हेरिएंटची चाचणी केली, जी Hyundai Verna म्हणून भारतात विकली जाते.

टेस्ट केलेली सेडान एकच ड्रायव्हर-साइड एअरबॅग आणि स्टँडर्ड म्हणून ABS ने सुसज्ज होती. भारतीय Hyundai Verna स्टँडर्ड स्वरूपात डुअल एअरबॅगसह येते, त्यामुळे हे सुरक्षा रेटिंग भारतातील Verna ला लागू होत नाही. Verna सोबत फ्रंटल इफेक्ट, साइड इफेक्ट, व्हिप्लॅश आणि पादचाऱ्यांची सुरक्षा यासारख्या विविध चाचण्या केल्या गेल्या आहेत. टेस्टमध्ये, Verna ने अॅडल्ट्सच्या सुरक्षेच्या बाबतीत 9.23 टक्के, पादचाऱ्यांच्या सुरक्षिततेमध्ये 53.11 टक्के, लहान मुलांच्या सुरक्षेच्या बाबतीत 12.68 टक्के आणि सेफ्टी असिस्टमध्ये 6.98 टक्के गुण मिळवले आहेत. जे या कारच्या सेगमेंटमध्ये खूप कमी गुण आहेत.

Tucson SUV क्रॅश टेस्टमध्ये फेल

लॅटिन NCAP ने नुकतीच Hyundai Tucson ची क्रॅश-टेस्ट केली आणि या चाचणीत कारला 0 स्टार रेटिंग मिळाले आहे. सध्या टक्सनची ही जेनरेशन भारतासह अनेक देशांमध्ये विक्रीसाठी उपलब्ध आहे. Hyundai ने आधीच Tucson ची नवीन जेनरेशन लॉन्च केली आहे, ज्याची भारतात टेस्टिंग केली गेली आहे आणि पुढील वर्षी ही कार लॉन्च होण्याची अपेक्षा आहे.

ज्या टक्सनची चाचणी घेण्यात आली ती फक्त ड्युअल फ्रंट एअरबॅग्ज आणि बेल्ट प्रीटेन्शनर्सने सुसज्ज होती. यामुळे, कारने समोरील बाजूस पुरेशी सुरक्षा दर्शविली आणि डोक्याची आणि मानेची सुरक्षितताही बरी होती. डॅशबोर्डच्या मागे असलेला ढाचा चालकाच्या गुडघ्यावर आदळल्याने चालकाच्या गुडघ्याला दुखापत झाली. साइड इफेक्ट टेस्टमध्ये पोटाची सुरक्षा आणि डोक्याची सुरक्षा ठिक होती परंतु केवळ छातीची सुरक्षा त्यातल्या त्यात बरी होती. प्रौढांसाठी, SUV ने फ्रंटल, साइड आणि व्हिप्लॅश सेफ्टीमध्ये चांगला स्कोर केला.

इतर बातम्या

नवीन वर्षात Toyota च्या गाड्या महागणार, Fortuner आणि Innova Crysta चा समावेश

Tesla च्या भारतात 7 ईव्ही लाँच होणार, केंद्र सरकारची मंजुरी, जाणून घ्या लाँचिंग कधी

13 लाखांची Mahindra Scorpio अवघ्या 3.8 लाखात खरेदीची संधी, जाणून घ्या कुठे मिळतेय ऑफर

(Hyundai Verna scores a duck in Latin NCAP safety crash tests)

सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.