ह्युंदाईचे ‘हे’ मॉडेल 4 ऑगस्टला होणार लाँच… फीचरपासून ते किमतीपर्यंत सर्वकाही जाणून घ्या…
नवीन ह्युंदाइ टक्सन 4 ऑगस्ट रोजी भारतात लाँच केली जाणार आहे. लाँचिंग दरम्यान या कारच्या किंमतीबाबत खुलासा करण्यात येणार आहे. नवीन जेन टक्सन 60 पेक्षा जास्त सेफ्टी फीचर्ससह भारतात लाँच होणार आहे.
ह्युंदाईने (Hyundai) भारतीय बाजारामध्ये आपली लोकप्रिय एसयुव्ही टक्सनचे (Hyundai Tucson) नवनी मॉडेल लाँच करण्याची तयारी पूर्ण केली आहे. दिल्लीमध्ये झालेल्या एका इव्हेंटमध्ये कंपनीने नवीन ह्युंदाई टक्सनची माहिती दिली आहे. लेटेस्ट मॉडेल ह्युंदाई प्लॅगशिप एसयुव्हीची चौथी जनरेशन असणार आहे. ह्युंदाईने अपकमिंग एसयुव्हीला ग्लोबली सप्टेंबर 2020 मध्ये लाँच केले होते. ADAS सह बाजारात आणले जाणारे हे ह्युंदाईचे भारतातील पहिले मॉडेल ठरणार आहे. नवीन ह्युंदाई टक्सन 4 ऑगस्ट रोजी भारतात लाँच केले जाणार आहे. लाँचिंगच्या दरम्यान या कारच्या किंमतीबाबत खुलासा करण्यात येणार आहे. नवीन जेन टक्सन 60 पेक्षा जास्त सेफ्टी फीचर्ससह (Features) भारतात लाँच होणार आहे. नवीन टक्सनमध्ये मिळत असलेल्या खास गोष्टी पुढील काही मुद्यांच्या आधारे समजून घेणार आहोत.
- नवीन टक़्सनला पहिल्या मॉडेलच्या तुलनेत मोठ्या आकारात सादर केले जाणार आहे. अपकमिंग एसयुव्ही सध्या उपलब्ध असलेल्या मॉडेलच्या तुलनेत 150 एमएम जास्त लांब असून 15 एमएम चौडी आणि 5 एमएम उंच आहे. याचे व्हीलबेस देखील पहिल्या मॉडेलच्या तुलनेत 85 एमएमने जास्त मोठे आहेत.
- न्यू जेन टक्सनचे नवीन डिझाईन अतिशय आकर्षक आहे. यात बोल्ड पॅरामीट्रिक स्लॅटेड फ्रंट ग्रील देण्यात आले आहे. ग्राहकांना व्हर्टिकल DRLs देखील मिळणार आहे. नवीन एसयुव्हीची स्प्लिट एलईडी हेडलाइट्स आणि एक मस्कुलर बंपर एसयुव्हीचे फ्रंटला चांगल्या पध्दतीने फिनिशिंग टच देतात.
- शार्प क्रीज आणि कारमध्ये देण्यात आलेली लाइन नवीन टक्सनला एक स्पोर्टी लूक देतात. तर ड्युअल टोन 18 इंचाचे अलाय व्हील स्पोर्टी एसयुव्हीची थीमला पूर्ण करण्यास मदत करतात.
- ह्युंदाई टक्सनचे नवीन मॉडेलच्या बॅकमध्ये सर्वात आकर्षित करणारी बाब म्हणजे त्याचे टेललाइट आहेत. कंपनीने या वेळी आपल्या अपकमिंग कारच्या रियरमध्ये स्नेक-फँग स्टाइल एलईडी टेल लँप दिले आहेत.
- इंटीरियरबाबत बोलायचे झाल्यास, टक्सन 2022 मध्ये मागील मॉडेलच्या सर्व कमतरता यात दुर करण्यात आल्या आहेत. नवीन एसयुव्हीमध्ये कमी डिझाईनसह डॅशबोर्ड लेआउट मिळणार आहे. तर दुसरीकडे स्लीक एसी वेंट आणि क्रेटाचे फोर स्पोक स्टियरिंग व्हीलदेखील देण्यात आले आहे.
- अपकमिंग मॉडेलमध्ये 10.25 इंच टचस्क्रीन इंफोटेनमेंट सिस्टम, व्हेंटिलेटेडे आणि हीटेड फ्रंट सी, पावर्ड फ्रंट सीट, 10.25 इंच डिजिटल ड्राईवर डिसप्ले, एक पॅनोरमिक सनरफसह अनेक फीचर्स देण्यात आले आहेत.
- एसयुव्हीमध्ये एक 8 स्पीकर बोस साउंड सिस्टमसह गुगल आणि ॲलेक्सा व्हाईस असिस्टचा सपोर्ट मिळणार आहे. पॅसेंजर्सच्या सेफ्टीसाठी नवीन कारमध्ये एअरबेग, ईएससी, हिल होल्ड आणि डिसेंट कंट्रोल, ऑल व्हील डिस्क ब्रेकसह फ्रंट आणि रियर पार्किंग सेंसरदेखील मिळणार आहेत.
- नवीन टक्सनमध्ये 2 लीटर 156 पीएस पेट्रोल आणि 186 पीएस डिझेल इंजिन देण्यात आले आहे. पेट्रोल इंजिन 6 स्पीड ऑटोमेटीक ट्रांसमिशनसह उपलब्ध होणार आहे. तर डिझेल इंजिनमध्ये 8 स्पीड ऑटोबॉक्स मिळणार आहे.
- टक्सनच्या डिझेल व्हेरिएंटमध्ये विविध राइडिंग क्षेत्रांनुसार तीन टेरेन मोड मिळणार आहे. युजर्सला डिझेल व्हेरिएंटमध्ये स्नो, मड आणि सेंड टेरेन मोडने सुसज्ज AWD सिस्टम पर्याय मिळणार आहे.
- मीडिया रिपोर्टनुसार, ह्युंदाई भारतामध्ये टक्सनला ऑगस्टच्या सुरुवातीला 25 लाख रुपयांच्या एक्सशोरुम किमतीच्या सुरुवातीच्या रेंजमध्ये लाँच करु शकते. या कारची बुकिंग 18 जुलेपासून सुरु होणार आहे. अपकमिंग एसयुव्ही जीप कंपास, फॉक्सवेगन टिगुआन आणि सिट्रोएन सी5 एअरक्रोसशी स्पर्धा करेल.
Non Stop LIVE Update