FASTag | आता व्हॉट्सॲपसह ‘या’ पाच पर्यायद्वारे बनवू शकता FASTag, वाचा सोपे पर्याय

जर तुम्ही तुमच्या गाडीवर फास्टॅग लावलं नसेल, तर तुम्हाला टोल नाक्यावर अडचणींचा सामना करावा लागू शकतो. (ICICI Bank FASTag Service)

FASTag | आता व्हॉट्सॲपसह 'या' पाच पर्यायद्वारे बनवू शकता FASTag, वाचा सोपे पर्याय
Follow us
| Updated on: Jan 17, 2021 | 9:14 PM

मुंबई : रस्ते परिवहन मंत्रालयाने राष्ट्रीय महामार्गांवर टोल नाक्यांवर फास्‍टॅग (FASTag) अनिवार्य केले आहे. सरकारने 1 जानेवारी 2021 पासून सर्व चारचाकी वाहनांसाठी FASTag बंधनकारक करण्यात आलं होतं. मात्र त्यानंतर सरकारकडून ही मुदत 15 फेब्रुवारी 2021 पर्यंत वाढवण्यात आली. त्यामुळे जर तुम्ही तुमच्या गाडीवर फास्टॅग लावलं नसेल, तर तुम्हाला टोल नाक्यावर अडचणींचा सामना करावा लागू शकतो. (ICICI Bank FASTag Service)

जर तुम्हाला फास्टॅग काढायचा असेल, तर तो तुम्ही आता मोबाईल ॲप किंवा बँकद्वारेही काढू शकता. सध्या ICICI या बँकेकडूनही फास्टॅग दिला जात आहे. हा फास्टॅग तुम्ही पाच प्रकारे मिळवू शकता. विशेष म्हणजे तुम्ही ICICI बँकेचे ग्राहक नसाल तरीही तुम्ही फास्टॅग बनवू शकता.

1. ICICI बँक फास्टॅग पोर्टल

ICICI बँकेच्या फास्टॅग पोर्टलवरुन फास्टॅग मिळवण्यासाठी www.icicibank.com/fastag या लिंकवर जा. यानंतर ‘New Customer – Apply Now या ठिकाणी क्लिक करा. यानंतर तुमच्यासमोर थेट ॲप्लिकेशन फॉर्म ओपन होईल. या फॉर्ममध्ये दिलेली सर्व माहिती आणि पैसे भरा. त्यानतंर तुमची फास्टॅगची ऑर्डर प्रोसेस केली जाईल. हा टॅग तुम्हाला तुमच्या पत्त्यावर मिळेल.

2. गुगल पे

गुगल पे द्वारे फास्टॅग घेण्यासाठी तुम्ही सर्वात आधी गुगल पे सुरु करा. यात Businesses या कॅटगरीत गेल्यानंतर त्याखाली ‘ICICI Bank FASTag’ या ठिकाणी क्लिक करा. यानंतर Buy new FASTag यावर क्लिक करा. यात तुमचा पॅन कार्ड, आरसी कॉपी, गाडीचा नंबर आणि पत्ता हा तपशील भरा. यानतंर तुमच्या मोबाईल क्रमांकावर तुम्हाला एक ओटीपी येईल. हा ओटीपी टाकून पैसे भरा. यानंतर तुमच्या फास्टॅगची प्रोसेस केली जाईल. हा फास्टॅग तुम्हाला तुमच्या घरी पाठवला जाईल.

3. iMobile Pay app

ICICI बँकद्वारे फास्टॅग बनवण्यासाठी सर्वात आधी तुम्हाला गुगल प्ले स्टोअरवरुन iMobile Pay app डाऊनलोड करावा लागेल. या ॲपवर लॉगिन केल्यानंतर तुम्ही Shop या ठिकाणी क्लिक करा. या ठिकाणी गेल्यानंतर तुम्ही FASTag हे क्लिक करा. यानंतर Buy New क्लिक करुन तुमच्या वाहनांसंबधीची माहिती भरा. यानंतर पेमेंट करुन फास्टॅगसाठीची ऑर्डर प्रोसेस करा.

4. ICICI बँक इंटरनेट बँकिंग

नेट बँकिंगद्वारे फास्टॅग घेण्यासाठी तुम्हाला इंटरनेटवर बँकिंगवर खातं असणे गरजेचे आहे. यानंतर तुम्ही ‘Payments & Transfer’ वर क्लिक करा. यापुढे जाऊन ‘Buy/Recharge FASTag’ वर क्लिक करा. यानतंर तुम्ही आवश्यक ती माहिती आणि पैसे भरुन फास्टॅग प्रोसेस करता येईल. यानंतर तुमचा फास्टॅग प्रोसेस होईल आणि तो थेट तुमच्या पत्त्यावर पाठवण्यात येईल.

5. व्हॉट्सॲप

व्हॉट्सॲपद्वारेही तुम्हाला फास्टॅगसाठी अप्लाय करता येईल. यासाठी तुम्हाला 8640086400 या मोबाईल क्रमांकावर Hi मॅसेज करावा लागेल. यानंतर 3 क्रमांकाचा ‘ICICI Bank FASTag services’ या पर्याय निवडा. यानंतर ‘Apply for a new tag’ यावर क्लिक करा. यावर क्लिक केल्यावर तुम्हाला एक लिंक दिली जाईल. या लिंकवर केल्यानंतर तुम्ही ICICI फास्टॅग ॲप्लिकेशन पेजवर रिडायरेक्ट केलं जाईल. यात महत्त्वाची माहिती भरल्यानंतर त्याचे पेमेंट केले. यानंतर तुमचा फास्टॅग प्रोसेस केला जाईल. (ICICI Bank FASTag Service)

संबंधित बातम्या : 

FASTag | वाहनचालकांना दिलासा, टोलनाक्यांवरील FASTag साठी मुदतवाढ

FASTag बाबत शंका असेल, तर हे नक्की वाचा…

Non Stop LIVE Update
नरेंद्र मोदी जातीय जनगणनेविरोधात, राहुल गांधी यांचा आरोप
नरेंद्र मोदी जातीय जनगणनेविरोधात, राहुल गांधी यांचा आरोप.
पाशा पटेल यांचे जाहीर सभेत अश्लील हातवारे, रोहित पवारांची तक्रार
पाशा पटेल यांचे जाहीर सभेत अश्लील हातवारे, रोहित पवारांची तक्रार.
युपीतील रुग्णालयाला लागलेल्या आगीत 10 नवजात बालकांच्या मृत्यूने हळहळ
युपीतील रुग्णालयाला लागलेल्या आगीत 10 नवजात बालकांच्या मृत्यूने हळहळ.
कोणी म्हणत असेल मीच देशाचा प्रमुख, तर म्हण बाबा पण...काय म्हणाले पवार
कोणी म्हणत असेल मीच देशाचा प्रमुख, तर म्हण बाबा पण...काय म्हणाले पवार.
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.