AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

रेड सिग्नलला सुद्धा गाडीचे इंजिन चालू ठेवता? ‘हे’ नुकसान एकदा वाचा त्यानंतर ताबोडतोब कराल गाडी बंद

रस्त्यावरील रेड सिग्नलला वाहन चालू ठेवण्याची छोटीशी चूक तुमच्या खिशावरच नाही तर पर्यावरणावरही वाईट परिणाम करू शकते. रेड सिग्नलला एक ते दोन मिनिटे थांबल्यावर अनेकजण वाहनाचे इंजिन चालू ठेवतात, त्यामुळे अनेकांचे नुकसान होऊ शकते. हे परिणाम काय आहेत हे आज आम्ही तुम्हाला सांगतो? परिणाम जाणून घेतल्यानंतर तुम्ही अशा चुका करणे थांबवाल हे नक्की.

रेड सिग्नलला सुद्धा गाडीचे इंजिन चालू ठेवता? 'हे' नुकसान एकदा वाचा त्यानंतर ताबोडतोब कराल गाडी बंद
Follow us
| Updated on: Feb 16, 2025 | 4:06 PM

वाढत्या प्रदूषणाने पर्यावरणावर ताण पडू लागला आहे. त्याचबरोबर अनेक कंपन्यांनी पर्यावरणाचा समतोल राखण्याच्या दृष्टीने इलेक्ट्रिक वाहन देखील भारतीय बाजारपेठेत लाँच केलेली आहे. त्याचबरोबर सरकार प्रदूषण नियंत्रित करण्यासाठी ‘रेड लाईट ऑन-कार ऑफ’ आणि ‘ऑड-इव्हन’ सारख्या मोहिमाही चालवत आहे. सरकारची ही मोहीम तुमचा पाठिंबा मिळाला तरच यशस्वी होईल, पण तरीही लोकं रेड सिग्नलवर त्यांच्या कार, बाईक आणि स्कूटरचे इंजिन बंद करत नाहीत. लोकांच्या या छोट्या चुकीमुळे इंजिन चालू राहते आणि यामुळे प्रदूषण तर वाढतेच पण इतर अनेक प्रकारचे नुकसान देखील होते ज्याचा परिणाम खिशावरही होऊ शकतो. चला तर मग जाणून घेऊयात रेड सिग्नलवर गाड्या चालू ठेवल्याने कोणते वाईट परिणाम तुमच्या गादीवर आणि खिश्यावर होतो.

रेड सिग्नलवर इंजिन चालू ठेवण्याचे परिणाम

रेड सिग्नल लागताच काही लोकं त्यांची गाडी गियरमध्ये टाकून सिग्नल ग्रीन होईपर्यंत थांबवून ठेवतात, ज्यामुळे त्यांना क्लच दाबून ठेवावा लागतो. कारण क्लच गिअरमधून सुटताच गाडी जागेवरच थांबते. त्यामुळे विनाकारण क्लच सतत दाबून ठेवल्याने क्लच प्लेटवरही वाईट परिणाम होतो, ज्यामुळे क्लच प्लेट खराब होण्याची शक्यता वाढते.

तसेच क्लच सतत दाबून ठेवल्याने इंधनाचा अपव्यय किंवा क्लच प्लेट निकामी होऊ शकतात. त्यामुळे तुमच्या खिश्यावर मोठी कात्री बसू शकते, एवढेच नाही तर इंधनाचा वापर वाढल्याने मायलेजवरही परिणाम होऊ शकतो. ट्रॅफिक लाईनमध्ये इंजिन चालू ठेवण्याचा सर्वात मोठा तोटा म्हणजे तुमचे वाहन इंधन जळत राहते, ज्यामुळे इंधनाचा संपूर्ण अपव्यय होतो. दुसरा तोटा म्हणजे इंजिन चालू असेल तर वाहनातून निघणाऱ्या धुरातील घातक वायू प्रदूषणात वाढ करतात.

हे सुद्धा वाचा

रेड सिग्नलला इंजिन बंद करण्याचा फायदा?

जेव्हा रेड सिग्नल असेल तेव्हा इंजिन बंद करण्याचा सर्वात मोठा फायदा म्हणजे इंधनाची म्हणजेच पैशाची बचत होईल. केवळ पैशांची बचत करूनच नाही तर या छोट्याशा गोष्टींद्वारे तुम्ही पर्यावरण सुरक्षित ठेवण्यातही हातभार लावू शकता.

मुख्यमंत्र्यांचा 'वर्षा'वर प्रवेश अन् लेकीबद्दलही दिली Good News...
मुख्यमंत्र्यांचा 'वर्षा'वर प्रवेश अन् लेकीबद्दलही दिली Good News....
युद्धाची भिती अन् पाकचा शेअर बाजार कोसळला, गुंतवणूकदारांमध्ये धास्ती
युद्धाची भिती अन् पाकचा शेअर बाजार कोसळला, गुंतवणूकदारांमध्ये धास्ती.
राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार मंडळाचं पुनर्गठन
राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार मंडळाचं पुनर्गठन.
..त्याशिवाय पर्याय नाही, जरांगे पाटलांकडून इशारा देत चलो मुंबईचा नारा
..त्याशिवाय पर्याय नाही, जरांगे पाटलांकडून इशारा देत चलो मुंबईचा नारा.
'त्या' झिपलाइन ऑपरेटरची NIA कडून चौकशी झाल्यानंतर वडिलांकडून मोठा दावा
'त्या' झिपलाइन ऑपरेटरची NIA कडून चौकशी झाल्यानंतर वडिलांकडून मोठा दावा.
पाकिस्तानकडून युद्धबंदीचं उल्लंघन; आखनूर भागात गोळीबार
पाकिस्तानकडून युद्धबंदीचं उल्लंघन; आखनूर भागात गोळीबार.
हिंदू हो क्या?, हल्ल्याच्या आदल्या दिवशी दहशतवाद्यांनी विचारलं अन्...
हिंदू हो क्या?, हल्ल्याच्या आदल्या दिवशी दहशतवाद्यांनी विचारलं अन्....
पंतप्रधान मोदींच्या 5 मोठ्या बैठका; निर्णयाकडे देशाचं लक्ष
पंतप्रधान मोदींच्या 5 मोठ्या बैठका; निर्णयाकडे देशाचं लक्ष.
पहलगाम हल्ल्याचा मुद्दा ब्रिटिश संसदेत उपस्थित; शांततेचं आवाहन
पहलगाम हल्ल्याचा मुद्दा ब्रिटिश संसदेत उपस्थित; शांततेचं आवाहन.
'शत्रू हल्ल्याआधी 10 वेळा विचार करेल', नवाज शरीफच्या मुलीची दर्पोक्ती
'शत्रू हल्ल्याआधी 10 वेळा विचार करेल', नवाज शरीफच्या मुलीची दर्पोक्ती.