ग्लोबल लाँचिंगसाठी एमजीचा शंखनाद… नवीन इलेक्ट्रिक कारच्या सिंगल चार्जवर मिळेल 450 किमीची रेंज

नवीन एमजी 4 ईव्हीला आकर्षक लूक देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. ही कार जुन्या व्हर्जनपेक्षा बरीच मोठी आहे. फ्रंट बंपर चांगले स्पोर्टी आणि हेडलँपदेखील वेगळ्या डिझाईनमध्ये देण्यात आले आहे. या बॅक पॅनलवर स्पोर्टी बॅक लाइट्‌स देण्यात आले असून ब्रेक लावल्यावर ते इंडिकेट होतात.

ग्लोबल लाँचिंगसाठी एमजीचा शंखनाद... नवीन इलेक्ट्रिक कारच्या सिंगल चार्जवर मिळेल 450 किमीची रेंज
Follow us
| Updated on: Jul 07, 2022 | 9:43 PM

इलेक्ट्रिक सेगमेंटमध्ये (Eelectric segment) एमजीने आपल्या नवीन कारचा पहिला ऑफिशिअल लूक प्रसिध्द केला आहे. या अपकमिंग कारचे नाव एमजी 4 इलेक्ट्रिक क्रोसओव्हर (MG4 electric crossover) असणार आहे. एमजीची अपकमिंग इलेक्ट्रिक कार मॉड्यूलर स्क्लेबल प्लॅटफॉर्मवर तयार केलेली आहे. या प्लॅटफॉर्मला कंपनीने खासकरुन भविष्यातील गरजा लक्षात घेउन तयार केले आहे. यात रियर व्हील ड्राईव्हचा पर्याय देण्यात आला आहे. एका माहितीनुसार, यात युजर्सला सिंगल चार्जमध्ये तब्बल 450 किमीपर्यंतची ड्राईव्हिंग रेंज (Driving range) मिळणार आहे. या कारची विक्री सप्टेंबरपासून सुरु होणार आहे. या कारची किंमत 23 लाख 66 हजार 158 रुपये इतकी ठेवण्यात आली आहे.

आकर्षक डिझाईन

नवीन एमजी 4 ईव्हीच्या डिझाईनबाबत बोलायचे झाल्यास, कारला आकर्षक लूक देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. ही कार जुन्या व्हर्जनपेक्षा बरीच मोठी आहे. फ्रंट बंपर चांगले स्पोर्टी आणि हेडलँपदेखील वेगळ्या डिझाईनमध्ये देण्यात आले अआहे. बॅक पॅनलवर स्पोर्टी लाइट्‌स देण्यात आले असून ब्रेक लावल्यावर ते इंडिकेट होतात.

एमजीच्या या नवीन कारमध्ये सिंगल मोटर ड्राइव्हचा पर्याय देण्यात आला आहे. यात, रियर व्हील ड्राईव्हचे लेआउट देण्यात आले आहे. एका माहितीनुसार, कारमध्ये 51kWh किंवा 64kWh ची बॅटरी देण्यात आली असून लहान बॅटरी व्हर्जनमध्ये 350 किमीची ड्राईव्हींग रेंज बघायला मिळणार आहे. दुसर्या व्हर्जनमध्ये 482 किमीची ड्राईव्ह देण्यात आली आहे.

नवीन एमजी 4 ईव्हीचे फीचर्स

नवीन एमजी 4 ईव्हीमध्ये 2650 एमएमचे व्हीलबेस देण्यात आले आहे. तर या प्लॅटफॉर्ममध्ये व्हीलबेसला 3100 एमएमपर्यंत ॲक्सेस देण्यात आला आहे. याशिवाय यात 40kWh च्या बॅटरीपासून 150kWh पर्यंतची कपॅसिटी असलेली बॅटरी लावण्यात येणार आहे. दरम्यान, एमजीच्या या लेटेस्ट कारमध्ये 4287 एमएमची लेंथ देण्यात आली असून 1506 एमएमची हाईट देण्यात आली आहे. याचे व्हीलबेस 2705 एमएम इतके आहेत. या कारची स्पर्धा किया ईव्ही 6, ह्युंदाई आईओनिक 5 आणि फॉक्सवेगन आईडी डॉट 3 सोबत होणार आहे.

कसे असणार इंटीरिअर

अन्य एमजी कारच्या तुलनेमध्ये नवीन एमजी ईव्हीचा लूक खूप वेगळा व आकर्षक असणार आहे. यात एक चांगली रेंज बघायला मिळणार आहे. डेशबोर्डच्या मध्यभागी एक मोटी स्क्रीन बघायला मिळणार आहे. या स्क्रीनला एक इंफोटेनमेंट सिस्टम देण्यात आली आहे. ही एक फ्लोटिंग डिसप्ले असून सोबत यात डिजिटल मीटर देण्यात आले आहे. त्यात, इंडिकेटर, स्पीडसह अन्य माहिती उपलब्ध असणार आहे.

मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली.
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?.