लॅपटॉपप्रमाणे कुठेही चार्ज करा, सिंगल चार्जवर 150km रेंज, भारताची पहिली AI इनेबल बाईक सादर

आगामी रिव्हॉल्ट आरव्ही 400 इलेक्ट्रिक मोटरसायकलला 3kW मिड-ड्राइव्ह मोटर मिळण्याची अपेक्षा आहे. या बाईकमध्ये 3.24kWh लिथियम-आयन बॅटरी देखील मिळेल.

लॅपटॉपप्रमाणे कुठेही चार्ज करा, सिंगल चार्जवर 150km रेंज, भारताची पहिली AI इनेबल बाईक सादर
Revolt Rv 400
Follow us
| Updated on: Oct 20, 2021 | 3:44 PM

मुंबई : रिव्हॉल्ट मोटर्सने आपली आगामी इलेक्ट्रिक टू व्हीलर रिव्हॉल्ट आरव्ही 400 (Revolt RV400) लवकरच लॉन्च करण्याचे संकेत दिले आहेत. यासाठी कंपनीने टीझर रिलीज केला आहे, सोबत त्यांनी लवकरच या बाईकची बुकिंग सुरु करणार असल्याची माहितीदेखील दिली आहे. इलेक्ट्रिक दुचाकी उत्पादक कंपनीने पुष्टी केली आहे की, रिव्हॉल्ट आरव्ही 400 साठी 21 ऑक्टोबरपासून बुकिंग सुरू होईल आणि भारतातील 70 शहरांमध्ये ही बाईक उपलब्ध होईल. (India first AI Enable electric bike Revolt RV400 is ready to launch)

सध्या फक्त दिल्ली, मुंबई, चेन्नई, अहमदाबाद आणि हैदराबाद सारख्या शहरांमध्ये ही बाईक उपलब्ध आहे. आता कंपनीने ती बंगळुरू, कोलकाता, जयपूर, सूरत आणि चंदीगड सारख्या इतर शहरांमध्ये नेण्याची योजना आखली आहे. Revolt RV 400 मध्ये अनेक चांगले फीचर्स देण्यात आले आहेत, सोबत आकर्षक डिझाईन मिळेल.

AI इनेबल मोटरसायकल

कंपनीने मायक्रोब्लॉगिंग वेबसाइट ट्विटरवर ट्विट करून या आगामी प्रोडक्टचा टीझर जारी केला आहे. यासाठी कंपनीने 14 सेकंदांचा व्हिडिओ पोस्ट केला आहे. ट्विटनुसार, ही भारताची पहिली AI इनेबल मोटरसायकल असल्याचा दावा करण्यात आला आहे. लवकरच ही बाईक 70 नवीन शहरांमध्ये पोहोचेल. “तुम्ही भविष्यातील मोबिलिटीसाठी तयार आहात का? 21 ऑक्टोबरपासून बुकिंग सुरू होईल.” असं कंपनीने ट्विटमध्ये म्हटलं आहे.

ट्विटमध्ये या बाईकबद्दल फारशी माहिती देण्यात आलेली नाही. यामध्ये हेडलॅम्प दाखवले आहेत. तसेच, यावेळी डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर उपलब्ध असेल. तथापि, बाईकचं कलर कॉम्बिनेशन आणि इतर कोणत्याही वैशिष्ट्यांविषयी माहिती उपलब्ध नाही.

सिंगल चार्जमध्ये 150 किमी रेंज

आगामी रिव्हॉल्ट आरव्ही 400 इलेक्ट्रिक मोटरसायकलला 3kW मिड-ड्राइव्ह मोटर मिळण्याची अपेक्षा आहे. या बाईकमध्ये 3.24kWh लिथियम-आयन बॅटरी देखील मिळेल. ही इलेक्ट्रिक बाईक एकाच चार्जवर 150 किलोमीटर पर्यंत ड्रायव्हिंग रेंज देण्याचे वचन देते. बाईकचं टॉप स्पीड 85 किमी प्रतितास इतकं असेल. यामध्ये आपणास Eco, Normal आणि Sports असे तीन रायडिंग मोड्स मिळतील. या बाईकमधील लिथियम आयन बॅटरी पूर्णपणे चार्ज होण्यासाठी एकूण साडेचार तास लागतात.

65 किमी/तास वेगमर्यादा

ही बाईक डेडिकेटेड MyRevolt मोबाइल अ‍ॅपसह सादर करण्यात आली आहे, जी जिओफेन्सींग, ट्रिप डिटेल्स, क्लोज चार्जिंग स्टेशनची माहिती आणि पसंतीचे एक्झॉस्ट साऊंडसारखे फीचर्स ऑफर करते. त्याचप्रमाणे, आरव्ही 300 मध्ये 1500W रेटिंग वाली मोटार देण्यात आली आहे, जी जास्तीत जास्त ताशी 65 किलोमीटर इतक्या वेगाने धावू शकते आणि त्यामध्ये 2.7kWh क्षमतेची बॅटरी देण्यात आली आहे.

इतर बातम्या

शानदार ऑफर! अवघ्या 27 हजारात घरी न्या होंडाची ढासू बाईक, सोबत 12 महिन्यांची वॉरंटी

हिरो मोटोकॉर्पची Xtreme 160R Stealth Edition बाजारात, जाणून घ्या नव्या बाईकमध्ये काय आहे खास?

70,000 रुपयांहून कमी किंमतीत शानदार इलेक्ट्रिक स्कूटर लाँच, जाणून घ्या फीचर्स

(India first AI Enable electric bike Revolt RV400 is ready to launch)

माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्यe अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्यe अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.