प्रतीक्षा संपली! भारतात बनलेली KTM 490 लाँच होणार, जाणून घ्या काय आहे खास?

KTM कंपनी नवीन 490cc ट्वीन इंजिन डेव्हलप करत आहे. या इंजिनावर आधारित बाईक्स 2022 मध्ये लाँच केल्या जाणार आहेत.

प्रतीक्षा संपली! भारतात बनलेली KTM 490 लाँच होणार, जाणून घ्या काय आहे खास?
Follow us
| Updated on: Dec 27, 2020 | 1:20 PM

मुंबई : KTM कंपनी नवीन 490cc ट्वीन इंजिन डेव्हलप करत आहे. या इंजिनावर आधारित बाईक्स 2022 मध्ये लाँच केल्या जाणार आहेत. KTM चे सीईओ Stefan pierer म्हणाले की, आम्ही 490 बाईकमध्ये पावरट्रेनचा वापर करणार आहोत. त्याचबरोबर 490 बाईक अॅडव्हेंचर बाईक्समध्ये समाविष्ट केली जाणार आहे. 490cc ट्वीन इंजिनसह दोन बाईक्स लाँच केल्या जाणार आहेत. या दोन्ही बाईक्स 390 सिंगल सिलेंडर रेंजपेक्षा जबरदस्त असतील. (India made KTM 490 Duke launch to take place in 2022 : Stefan Pierer)

Stefan pierer म्हणाले की, “नवीन पॉवरट्रेन सध्या बजाज ऑटोच्या R&D सेंटर पुणे येथे डेव्हलप केलं जात आहे. सर्व गोष्टी बजाजच्या सेंटरमध्ये जरी सुरु असल्या तरी आमची टीम त्यावर लक्ष ठेवून आहे. हा फॉरमॅट आम्ही 790/890 आणि 500cc मध्ये वापरत आहोत”.

केटीएमने अधिक माहिती देताना सांगितले की, “ही बाईक भारतातच बनवायची किंवा नाही, हे अद्याप ठरलेलं नाही. सध्या हे इंजिन डेव्हलप केलं जातंय. तसेच नव्या रेंजमधील 500 सीसी ट्विन सिलेंडर मॉडेल्स बनवाचे की नाही, याचादेखील फैसला झालेला नाही. अशा परिस्थितीत ही बाईक चीनमध्ये बनवली जाऊ शकते. कारण आम्ही CFMoto या कंपनीला 790 चं इंजिन बनवण्याचे काम दिले होते, त्यावेळी CFMoto ने आमच्या अपेक्षेनुसार काम केलं होतं”.

KTM ने RC 125 आणि RC 390 ची किंमत वाढवली

दरम्यान, काही दिवसांपूर्वी भारतात KTM ने बाईक्सच्या किंमती वाढवल्या आहेत. यापूर्वी केटीएम स्ट्रीटफाइटर्स (KTM Street Fighters) म्हणजेच केटीएम 200 ड्युक, 250 ड्युक आणि 390 या बाईक्सची किंमत वाढवण्यात आली होती. आता या यादीत अजून दोन नव्या बाईक्सचा समावेश करण्यात आला आहे. कंपनीने आता RC 125 आणि RC 390 या दोन बाईक्सची किंमत वाढवली आहे.

डीलर्सकडे केटीएम RC 125 च्या किंमतीत 1 हजार 280 रुपयांची वाढ झाल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे या बाईकची एकूण किंमत आता 1 लाख 61 हजार 101 रुपये इतकी झाली आहे. दुसऱ्या बाजूला कंपनीने केटीएम RC 390 या बाईकची किंमतदेखील वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कंपनीने KTM RC 390 च्या किंमतीत तब्बल 3 हजार 537 रुपयांची वाढ केली आहे. त्यामुळे या बाईकची एकूण किंमत आता 2 लाख 56 हजार 917 रुपये झाली आहे.

या सर्व दिल्लीतल्या एक्स शोरुम किंमती आहेत. या बाईकच्या किंमती थोड्याफार वाढवल्या असल्या तरी ही वाढ 390 ड्युकच्या किंमतीत करण्यात आलेल्या वाढीइतकी नाही. 390 ड्युकच्या किंमतीत नुकतीच 8 हजार 515 रुपयांची वाढ करण्यात आली होती. यावेळी कंपनीने कोणत्याही बाईकच्या किंमतीत 3 हजारांहून अधिक वाढ केलेली नाही.

संबंधित बातम्या

भारतीयांच्या पसंतीस उतरलेल्या KTM च्या ‘या’ बाईकचं पुढील व्हर्जन लाँच होणार, जाणून घ्या किंमत आणि फिचर्स

KTM लव्हर्ससाठी वाईट बातमी, कंपनीने RC 125 आणि RC 390 ची किंमत वाढवली, जाणून घ्या नवीन किंमती

(India made KTM 490 Duke launch to take place in 2022 : Stefan Pierer)

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.