IIT ने बनविली देशातील पहिली ड्रायव्हर लेस कार, कॅंपसमध्ये चाचण्या सुरु

देशातील आयआयटीने पहिली ड्रायव्हर लेस शटल कार तयार केली आहे. या कारच्यामधून केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांनी देखील नुकताच प्रवास केला आहे. सध्या या कारच्या चाचण्या सुरु आहेत.

IIT ने बनविली देशातील पहिली ड्रायव्हर लेस कार, कॅंपसमध्ये चाचण्या सुरु
driverless carImage Credit source: socialmedia
Follow us
| Updated on: Oct 20, 2023 | 7:09 PM

हैदराबाद | 20 ऑक्टोबर 2023 : भारतातील तरुण जगाच्या स्पर्धेत कुठेच मागे नाहीत. आता लवकरच वाहतूक क्षेत्रात क्रांतीकारक तंत्रज्ञान दाखल होणार आहे. आयआयटी हैदराबादने ( IIT Hyderabad ) देशातील पहिली ड्रायव्हर लेस ( Driverless ) इलेक्ट्रीक कार तयार केली आहे. गेल्या दोन महिन्यांपासून ही कार विद्यार्थी आणि प्रोफेसरना कॅंपसमध्ये ने-आण करण्याचे काम आरामात करीत आहे. या कारची अशाप्रकारे टेस्टींग सुरु असून केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांनी देखील तिच्यातून प्रवासाचा आनंद लुटला आहे.

चार चाकांच्या या क्लोज्ड इलेक्ट्रीक कारला हैदराबाद आयआयटीच्या TiHAN सेंटरने विकसित केले आहे. ही गाडी जुन्या पार्टपासून तयार करण्यात आली आहे. आयआयटीचे TiHAN सेंटर पहिले स्वायत्त नेव्हीगेशन टेस्टबेड ( एरियल टेरेस्ट्रियल ) फॅक्ट्री आहे. या TiHAN सेंटरने दोन गाड्या विकसित केल्या आहेत. त्यांची एक वर्ष कॅंपसमध्ये चाचणी घेण्यात येत आहे.

या शटल कारला वेगवेगळ्या प्रकारचे सेंसर लावण्यात आले आहेत. तसेच आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला आहे. चाचणीसाठी तिला अधिक वेळा चालवून पाहण्यात येत आहे. यात LiDAR आधारित नेव्हीगेशन सिस्टीमचा वापर करण्यात आला आहे. ड्रायव्हर लेस कारचे हे मॉडेल देशातील पहिले देशी तंत्रज्ञान आहे.

प्रोफेसर राजलक्ष्मी यांनी सांगितले की यासाठी डाटा जमा करण्यासाठी हैदराबादच्या ट्रॅफीकमध्ये वाहनांना तैनात केले होते. या डाटाचा वापर बॅकग्राऊंड रिसर्चसाठी ड्रायव्हरलेस कारना तयार करण्यासाठी करण्यात आला आहे. आणखी काही प्रोटोटाईप तयार केले असून ते विविध टप्प्यात आहेत. त्यांच्या टेस्टींगचे काम सुरु आहे.

आणखी देखील प्रयोग सुरु

हे सेंटर अनेक प्रकारच्या ऑटोमेटेड व्हेईकल तयार करीत आहे. यात एरियल, मल्टीटेरेन आणि जमीन खणणाऱ्या व्हेइकलटचा समावेश आहे. हे सेंटर देशाच्या पॉलिसी फ्रेमवर्कच्या दिशेत काम करीत आहे. अशा शटल कार वेअरहाऊस, कॅंपस आणि एअरपोर्ट सारख्या नियंत्रित वातावरणात उपयोगी ठरु शकणार आहेत.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.