फक्त एक ट्वीट आणि मिळेल नवी कोरी Ola Electric Scooter, जाणून घ्या काय आहेत अटी
होळीचा रंग अजूनही चेहऱ्यावरून उतरलेला नाही, तोच ओला इलेक्ट्रिकनं एक जबरदस्त योजना जाहीर केली आहे. त्या अंतर्गत पाच नशिबवान विजेत्यांना नवी कोरी इलेक्ट्रिक स्कुटर मिळणार आहे.
मुंबई : ओलानं हळूहळू करत भारतीय बाजारात आपले पाय घट्ट रोवले आहेत. ओलाच्या इलेक्ट्रिक स्कूटरची मागणी गेल्या काही दिवसात वाढली आहे. आकडेवारीवरून ही बाब स्पष्ट झाली आहे. गेल्या महिन्यात कंपनीने एस 1 च्या 17 हजार युनिट्सची विक्री केली. असं असताना ओला इलेक्ट्रिक स्कूटरच्या लिमिटेड एडिशनचा एक फोटो समोर आला आहे. कंपनीचे सीईओ भाविश अग्रवाल यांनी हा फोटो शेअर केला आहे. लोकांच्या मागणीनंतर कंपनीने होळी एडिशन लाँच केली आहे. ओला एस 1 चं कलरफूल मॉडेल असून फक्त 5 युनिट असणार आहेत.
कशी मिळणार नवी ओला स्कुटर
नवी ओला इलेक्ट्रिक स्कुटर मिळवण्यासाठी तुमच्याकडे एस 1 इलेक्ट्रिक स्कुटर असणं गरजेचं आहे. स्कुटरच्या मालकाला फक्त एक फोटो किंवा व्हिडीओ पोस्ट करावा लागणार आहे. यात ओला स्कूटरसोबत होळी साजरी करताना दिसलं पाहीजे. ज्या युजर्सची पोस्ट चांगली असेल. त्यापैकी पाच जणांना ओलाकडून नवी एस 1 होळी एडिशन स्कुटर मिळणार आहे.
Due to popular demand, we will build 5 of these as a special Holi edition!
Comment with pic/video of how you celebrated holi with your S1 and best 5 will get one! pic.twitter.com/y2VEoMPUWT
— Bhavish Aggarwal (@bhash) March 9, 2023
भाविश अग्रवाल यांनी आपल्या ट्वीटमध्ये ही स्कुटर फ्री मिळणार की पैशांनी याबाबत सांगितलेलं नाही. ओला एस 1 होळी एडिशनचं स्टँडर्स मॉडेलसारखीच डिझाईन केली आहे. यामध्ये मल्टिकलर बॉडी पॅनल असणार आहे. याव्यतिरिक्त स्माइली शेप ड्युअल पॉड एलईडी हेडलाइट, इंडिकेटर माउंटेड फ्रंट एप्रन, फ्लॅट फुटबोर्ड, सिंगल पीस सीट, ग्रॅब रेल्स, स्लीक एलईडी टेललँप असेल.
नव्या ओला एस 1 होळी एडिशनमध्ये कोणताही बदल केलेला नाही. यात रेग्युलर मॉडेलप्रमाणे आयपी67 रेटेड 3 किलोवॅट बॅटरी पॅक आहे. ही बॅटरी 8.5 किलोवॅट इलेक्ट्रिक मोटरशी जोडलेली आहे. ही बॅटरी फुल चार्ज केली की, 141 किमीपर्यंत रेंज देते, असा कंपनीचा दावा आहे.
नवी ओला स्कुटर ब्रेकिंसाठी पुढच्या चाकात सीबीएस सिस्टम आहे. तर मागच्या चाकात डिस्क ब्रेक आहे. त्याचबरोबर सस्पेंशन ड्युटीसाठी सिंगल साइड फोर्क आणि रियर एंड मोनो शॉक युनिटचा वापर केला आहे. ओला इलेक्ट्रीकने सध्या तरी एस 1 होळी एडिशनच्या किमतीबाबत काहीही सांगितलेलं नाही. पण 5 विजेत्यांना ही स्कुटर डिलिव्हरी केली जाणार आहे.
ओलाने इलेक्ट्रिक व्हेईकल पोर्टफोलियोमध्ये एस 1 ए्अर, एस1 आणि एस 1 प्रो स्कुटर सादर केल्या आहेत. कंपनीच्या बेस मॉडेलची सुरुवातीची किंमत 84,999 रुपये, एस 1 च्या 2kW ची किंमत 89,000 आणि 3kW ची किंमत 1,07,999 रुपये इतकी आहे. तर एस 1 प्रोची किंमत 1,28,999 रुपये इतकी आहे.