Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मारुती अर्टिंगाला टक्कर, Kia ची MPV सज्ज, जाणून घ्या लीक फीचर्स आणि लाँच अपडेट

Kia India भारतात एक नवीन कार आणण्याचा विचार करत आहे, या कारचे नाव Kia Carens असे असेल. ही MPV सेगमेंटची कार आहे, ज्यामध्ये मारुती अर्टिगा आहे. Kia MPV चे लॉन्चिंग 2022 च्या सुरुवातीला केले जाऊ शकते.

मारुती अर्टिंगाला टक्कर, Kia ची MPV सज्ज, जाणून घ्या लीक फीचर्स आणि लाँच अपडेट
Kia Mpv Cars
Follow us
| Updated on: Nov 03, 2021 | 8:11 AM

Kia Carens : Kia India भारतात एक नवीन कार आणण्याचा विचार करत आहे, या कारचे नाव Kia Carens असे असेल. ही MPV सेगमेंटची कार आहे, ज्यामध्ये मारुती अर्टिगा आहे. Kia MPV चे लॉन्चिंग 2022 च्या सुरुवातीला केले जाऊ शकते. नवीन मॉडेल भारतात तसेच दक्षिण आफ्रिकेत अनेक वेळा पाहण्यात आले आहे. Kia KY कोडनेम असलेल्या या 7 सीटर कारचे नाव Kia Carens असू शकते परंतु कंपनीने अद्याप अधिकृत पुष्टीकरण केलेले नाही. वास्तविक कंपनीने हे नाव भारतात नोंदवले आहे. कंपनी या कारची काही मार्केटमध्ये विक्री करत आहे. Kia ची आगामी MPV कार मारुती सुझुकी XL6, Ertiga आणि Mahindra Marazzo यांच्याशी स्पर्धा करेल. (Kia Carens MPV to launch in 2022, it will compete with Maruti Ertiga, Suzuki XL6 and Mahindra Marazzo)

Kia Carens ची लांबी 4.5 मीटर असेल. लक्षात ठेवा की हे मॉडेल मारुती एर्टिगा आणि टोयोटा इनोव्हा क्रिस्टल दरम्यान ऑफर केले जाईल. Kia ची ही आगामी कार MPV 6 आणि 7 सीटर व्हेरियंटमध्ये दाखल होऊ शकते. ही एमपीव्ही कंपनीच्या SP2 प्लॅटफॉर्मवर तयार केली जाऊ शकते, जो यापूर्वी सेल्टॉस आणि क्रेटामध्ये देखील होता. MPV ला Hyundai Alcazar वर ऑफर केलेला अपडेटेड प्लॅटफॉर्म मिळण्याची शक्यता आहे, ज्याचा व्हीलबेस Creta पेक्षा जास्त असेल, जो 150mm आहे.

जुन्या अहवालांबद्दल बोलायचे झाल्यास, Kia MPV च्या थर्ड रोमध्ये इलेक्ट्रिक बटण फंक्शन मिळेल. नवीन मॉडेलमध्ये बॉडी पॅनेल्स आणि सेल्टॉस व सॉनेट सारखी वैशिष्ट्ये अपेक्षित आहेत. यामधील काही डिझाईनबद्दल सांगायचे झाले तर, याला ‘टायगर नोज’ ग्रिल, क्रोम हायलाइट्स, मोठे रियर डोर आणि शार्क फिन अँटेनासह रुंद एअर-डॅम मिळेल.

ही MPV फॅक्टरी फिटेड सनरूफ आणि 16 इंच अलॉय व्हीलसह येईल. कंपनी ही कार दोन इंजिन पर्यायांमध्ये सादर करु शकते. 1.5 लीटर 4 सिलेंडर टर्बोचार्ज्ड डिझेल आणि 1.5 लीटर 4 सिलेंडर नॅचरली एस्पिरेटेड पेट्रोल इंजिन असे दोन पर्याय मिळू शकतात. डिझेल इंजिन 113bhp पॉवर आणि 250Nm टॉर्क जनरेट करण्यात सक्षम असेल, तर पेट्रोल इंजिन 113bhp पॉवर आणि 244Nm पीक टॉर्कसह येईल. दोन्ही इंजिन 6 स्पीड मॅन्युअल आणि 6 स्पीड ऑटोमॅटिक ट्रान्समिशनच्या पर्यायासह ऑफर केले जातील.

यात कनेक्टेड कारसह अनेक लेटेस्ट फीचर्स मिळतील. आगामी Kia कारमध्ये AI व्हॉईस कमांड, रोड साइड असिस्टन्स, मोठ्या टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टमसह लाइव्ह व्हेईकल ट्रॅकिंग आणि अनेक लेटेस्ट स्टँडर्ड फीचर्स तसेच सेफ्टी फीचर्स यांसारख्या नवीन वैशिष्ट्यांसह कार लाँच होईल अशी अपेक्षा आहे.

इतर बातम्या

कावासकीने भारतात लॉन्च केली मोटरसायकल, जाणून घ्या किती आहे या बाईकची किंमत

ऑलिम्पियन सुमित अंतिलला महिंद्राचं शानदार गिफ्ट, XUV700 ची पहिली Javelin Gold Edition भेट

PHOTO | ही आहे जगातील पहिली इलेक्ट्रिक टू-सीटर फॉर्म्युला रेस कार, जाणून घ्या काय आहे खास

(Kia Carens MPV to launch in 2022, it will compete with Maruti Ertiga, Suzuki XL6 and Mahindra Marazzo)

कश्मीरच्या पहलगाम येथे सर्वात मोठा अतिरेकी हल्ला,२७ पर्यटक ठार
कश्मीरच्या पहलगाम येथे सर्वात मोठा अतिरेकी हल्ला,२७ पर्यटक ठार.
शेलार ठाकरेंना 'लँड माफिया' म्हणताच पेडणेकरांकडून 'झोलर'ची आठवण...
शेलार ठाकरेंना 'लँड माफिया' म्हणताच पेडणेकरांकडून 'झोलर'ची आठवण....
युगेंद्रला साथ द्या, नातवासाठी शरद पवारांची साद म्हणाले, इथून पुढेही..
युगेंद्रला साथ द्या, नातवासाठी शरद पवारांची साद म्हणाले, इथून पुढेही...
'मी सिनिअर मंत्री आता...', चंद्रकांत पाटलांचं लक्ष फडणवीसांच्या पदावर?
'मी सिनिअर मंत्री आता...', चंद्रकांत पाटलांचं लक्ष फडणवीसांच्या पदावर?.
'हिंदी' भाषा सक्तीवरून सरकारची माघार, घेतला मोठा निर्णय; यापुढे...
'हिंदी' भाषा सक्तीवरून सरकारची माघार, घेतला मोठा निर्णय; यापुढे....
राज-उद्धव एकत्र आल्यास मुंबई कोणाची? युती सत्ताधार्‍यांसाठी डोकेदुखी?
राज-उद्धव एकत्र आल्यास मुंबई कोणाची? युती सत्ताधार्‍यांसाठी डोकेदुखी?.
हिंदीची सक्ती केली तर मी तर मरेनच...नितेश राणेंचं मिश्कील वक्तव्य काय?
हिंदीची सक्ती केली तर मी तर मरेनच...नितेश राणेंचं मिश्कील वक्तव्य काय?.
ठाकरे बंधू परदेशात पण चर्चा मात्र महाराष्ट्रात, सेना भवनासमोर बॅनरबाजी
ठाकरे बंधू परदेशात पण चर्चा मात्र महाराष्ट्रात, सेना भवनासमोर बॅनरबाजी.
हुसैन दलवाई यांना नाशिक पोलिसांनी घेतलं ताब्यात
हुसैन दलवाई यांना नाशिक पोलिसांनी घेतलं ताब्यात.
पाणीबाणी! लातूरमध्ये पाण्यासाठी नागरिकांची वणवण भटकंती
पाणीबाणी! लातूरमध्ये पाण्यासाठी नागरिकांची वणवण भटकंती.