Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Kia च्या इलेक्ट्रिक कारचा जलवा, लाँचिंगपूर्वीच 7000 गाड्यांची विक्री

किआ कंपनीच्या (Kia Motors) या इलेक्ट्रिक कारने दक्षिण कोरियन बाजारात एक वेगळा विक्रम नोंदवला आहे. (Kia EV6)

Kia च्या इलेक्ट्रिक कारचा जलवा, लाँचिंगपूर्वीच 7000 गाड्यांची विक्री
Kia Ev6
Follow us
| Updated on: May 07, 2021 | 10:50 AM

लंडन : कोरियन कार उत्पादक कंपनी किआ कॉर्पोरेशनने (Kia Corporation / Automobile manufacturer) माहिती दिली आहे की, ग्राहक त्यांच्या पहिल्या इलेक्ट्रिक कारला चांगली पसंती दर्शवत आहेत. कंपनीला युरोपमध्ये प्री-सेलच्या जबरदस्त ऑर्डर्स मिळत आहेत. कंपनीच्या म्हणण्यानुसार, या इलेक्ट्रिक वाहनाला ब्रिटन, फ्रान्स, जर्मनी आणि इतर मोठ्या देशांकडून 7000 युनिट्सच्या ऑर्डर्स मिळाल्या आहेत आणि त्यात सातत्याने वाढ होत आहे. (Kia EV6 records highest pre-order sale of 7000 units)

किआ ईव्ही 6 (Kia EV6) चे उत्पादन या वर्षाच्या मध्यात सुरू होऊ शकतं आणि त्यानंतर या कारचे वितरणदेखील सुरू होऊ शकते. किआने गेल्या महिन्यात दक्षिण कोरियामधील एका डेडिकेटेड प्लॅटफॉर्मवर त्यांची ही क्रॉसओव्हर ईव्ही लाँच केली होती. या कारला लाँचिंगच्या दिवशीच 21,016 प्री-ऑर्डर्स मिळाल्या. एवढ्या मोठ्या ऑर्डरमुळे कंपनीने एक नवीन विक्रम स्थापित केला आहे. हा विक्रम कंपनीने त्यांच्या देशांतर्गत बाजारात प्रस्थापित केला होता. आता या कारचा जलवा युरोपातदेखील पाहायला मिळत आहे.

किआ ईव्ही 6 इलेक्ट्रिक ग्लोबल मॉड्यूलर प्लॅटफॉर्म (ई-जीएमपी) वर आधारित आहे, हा प्लॅटफॉर्म विशेषत: इलेक्ट्रिक वाहनांसाठी विकसित केला आहे. कंपनीचे म्हणणे आहे की आगामी काळात या प्लॅटफॉर्मचा इतर मॉडेल्समध्येही विस्तार होईल. 2026 पर्यंत 7 इलेक्ट्रिक मॉडेल्स सादर करण्याची किआची योजना आहे. ईव्ही 6 या ऑर्डरमधील पहिले मॉडेल आहे.

शानदार डिझाईन

कारचं फ्रंट पॅनल आधुनिक पद्धतीने डिझाईन करण्यात आलं आहे. ईव्ही 6 मध्ये एक शॉर्ट ओव्हरहँग आहे, असं फोटोंवरुन समजतंय. या कारची हेडलाईट बारीक असून एलईडी पॅटर्नमुले या कारला एक अनोखा लुक मिळाला आहे. नवीन इंटीरियरबद्दलची सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे ऑडिओ व्हिज्युअल आणि नेव्हिगेशन (AVN) स्क्रीन जी हायटेक आणि हाय डेफिनेशन क्वालिटीसह येते. Kia EV6 ची बॅटरी पॉवर या कारला विशेष बनवते आणि नवीन फिलॉसफीसह या करचं डिझाइन तयार केलं आहे. कंपनी आता लवकरात लवकर अजून काही इलेक्ट्रिक व्हिकल सादर करणार आहे.

3.5 सेकंदात 100 किमी वेग

ही कार 4680 मिमी लांब, 1880 मिमी रूंद आणि 1550 मिमी उंच आहे. किआ ईव्ही 6 ही कार दोन बॅटरी पॅक पर्यायांमध्ये विकली जाते, ज्यात 58kWh आणि 77.4kWh चा समावेश आहे. या बॅटरीच्या मदतीने ही ईव्ही अवघ्या 3.5 सेकंदात 100 किमी प्रतितास इतका वेग पकडते. त्याच वेळी, केबिनमध्ये अधिक जागा असलेली बरेच दमदार फीचर्स यामध्ये देण्यात आले आहेत.

इतर बातम्या

एकदा चार्ज केल्यावर 452KM धावणार, 1.5 लाखांच्या डिस्काऊंटसह ‘ही’ इलेक्ट्रिक कार विक्रीस उपलब्ध

ह्युंदायचा इलेक्ट्रिक SUVs चा धडाका, भारतात 3200 कोटी रुपयांची गुंतवणूक करणार

अवघ्या 10 हजारात बुक करा किफायतशीर इलेक्ट्रिक कार, सिंगल चार्जवर 200km धावणार

(Kia EV6 records highest pre-order sale of 7000 units)

पुणे-मुंबई एक्स्प्रेसवेवरून प्रवास करताय? तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी
पुणे-मुंबई एक्स्प्रेसवेवरून प्रवास करताय? तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी.
देशमुख कुटुंबाच्या भेटीनंतर अभिनेते सायाजी शिंदेंनी सांगितल्या भावना
देशमुख कुटुंबाच्या भेटीनंतर अभिनेते सायाजी शिंदेंनी सांगितल्या भावना.
'उबाठाचा पोपट अन् रडत राऊत...', चित्रा वाघ यांची राऊतांवर जहरी टीका
'उबाठाचा पोपट अन् रडत राऊत...', चित्रा वाघ यांची राऊतांवर जहरी टीका.
कुणाल कामराने पुन्हा एकदा सरकारला डिवचलं, 'त्या' ट्वीटची चर्चा
कुणाल कामराने पुन्हा एकदा सरकारला डिवचलं, 'त्या' ट्वीटची चर्चा.
'धनंजय मुंडे माझ्या घरी आले अन्...', अंजली दमानियांचा मोठा गौप्यस्फोट
'धनंजय मुंडे माझ्या घरी आले अन्...', अंजली दमानियांचा मोठा गौप्यस्फोट.
2 दिवस महिलेच्या मृतदेहासोबतच राहीला, मृतदेहा शेजारी बसून जेवणही केलं
2 दिवस महिलेच्या मृतदेहासोबतच राहीला, मृतदेहा शेजारी बसून जेवणही केलं.
धनंजय देशमुख आज केज पोलिसांना भेटणार; जेल प्रशासनावर उपस्थित केली शंका
धनंजय देशमुख आज केज पोलिसांना भेटणार; जेल प्रशासनावर उपस्थित केली शंका.
31 एप्रिलला कामराकडून पलावा पुलाचे उद्घाटन',मनसे नेत्याचा सरकारला टोला
31 एप्रिलला कामराकडून पलावा पुलाचे उद्घाटन',मनसे नेत्याचा सरकारला टोला.
हत्येच्या कटाचे धसांचे गंभीर आरोप; मुंडेंची प्रतिक्रिया
हत्येच्या कटाचे धसांचे गंभीर आरोप; मुंडेंची प्रतिक्रिया.
दम नाही, त्यांनी हिंदी सिनेमे पाहणं कमी करावं, दमानियांचा धसांना सल्ला
दम नाही, त्यांनी हिंदी सिनेमे पाहणं कमी करावं, दमानियांचा धसांना सल्ला.