Kia च्या इलेक्ट्रिक कारचा बाजारात धुमाकूळ, अवघ्या काही तासांत सर्व युनिट्सची विक्री, 5 मिनिटांच्या चार्जिंगवर 112KM रेंज

किआ कॉर्पोरेशनने त्यांची पहिली इलेक्ट्रिक कार सादर केली आहे. या कारने आधी कोरियन आणि युरोपियन मार्केटमध्ये धुमाकूळ घातला. त्यानंतर आता या कारला अमेरीकन बाजारातही पसंती मिळत आहे.

Kia च्या इलेक्ट्रिक कारचा बाजारात धुमाकूळ, अवघ्या काही तासांत सर्व युनिट्सची विक्री, 5 मिनिटांच्या चार्जिंगवर 112KM रेंज
Kia EV6
Follow us
| Updated on: Jun 13, 2021 | 3:45 PM

मुंबई : भविष्यात मोठ्या प्रमाणात इलेक्ट्रिक वाहने (Electric Vehicles) रस्त्यांवर धावताना दिसतील, असं म्हटलं जात होतं. परंतु आता तशी परिस्थिती राहिलेली नाही. जगभरातील लोकांनी आपला मोर्चा इलेक्ट्रिक वाहनांकडे वळवला आहे. प्रदूषण आणि पेट्रोल, डिझेल यांच्या वाढत्या किंमतींमुळे लोकांचा इलेक्ट्रिक वाहनांकडे (Electric Vehicle) कल वाढत चालला आहे. देशातील काही शहरांमध्ये पेट्रोलच्या किंमती शंभरी पार (Petrol Price hike) गेल्या आहेत, तर काही शहरांमध्ये पेट्रोलच्या किंमती 90 रुपयांच्या पुढे आहेत. त्यामुळे 2021 मध्ये अनेक दिग्गज वाहन कंपन्या इलेक्ट्रिक व्हीकल लाँच करण्याच्या तयारीत आहेत. (Kia EV6 runs 112KM in 5 minute charging, EV breaks all records and booked all the car in few hour)

पूर्वी इलेक्ट्रिक वाहनांच्या बजेटमुळे लोक चिंतेत असायचे, परंतु आता तसे चित्र राहिलेलं नाही. कार/मोटारसायकल कंपन्या कमीत कमी बजेटमध्ये जास्तीत जास्त फिचर्स देणाऱ्या इलेक्ट्रिक कार्स, बाईक आणि स्कूटर लाँच करत आहेत. दरम्यान, कोरियन कार उत्पादक कंपनी किआ कॉर्पोरेशनने (Kia Corporation / Automobile manufacturer) त्यांची पहिली इलेक्ट्रिक कार सादर केली आहे. या कारने आधी कोरियन आणि युरोपियन मार्केटमध्ये धुमाकूळ घातला. त्यानंतर आता या कारला अमेरीकन बाजारातही ग्राहकांकडून जोरदार पसंती मिळत आहे.

अमेरिकेत या कारसाठी कंपनीने बुकिंग घेण्यास सुरुवात केल्यानंतर अवघ्या काही तासांतच सर्व वाहने बुक झाली आहेत. बुकिंगच्या पहिल्या टप्प्यात 1500 युनिट्स बुकिंगसाठी ठेवण्यात आले होते. अवघ्या काही तासात या सर्व 1500 युनिट्ससाठी कंपनीला बुकिंग्स मिळाल्या आहेत. Kia EV6 कंपनीची पहिली फुल इलेक्ट्रिक कार आहे जी इलेक्ट्रिक-ग्लोबल मॉड्यूलर प्लॅटफॉर्मवर (E-GMP) आधारित आहे. या कारमध्ये 400v आणि 800v चा चार्जिंग सपोर्ट देण्यात आला आहे. कंपनीच्या म्हणण्यानुसार, ही एसयूव्ही फक्त 5 मिनिटांच्या फास्ट चार्जिंगवर 112 किमी पर्यंतची रेंज देऊ शकते आणि 18 मिनिटांच्या चार्जिंगनंतर 330 किलोमीटरपर्यंतची रेंज देईल.

शानदार डिझाईन

कारचं फ्रंट पॅनल आधुनिक पद्धतीने डिझाईन करण्यात आलं आहे. ईव्ही 6 मध्ये एक शॉर्ट ओव्हरहँग आहे, असं फोटोंवरुन समजतंय. या कारची हेडलाईट बारीक असून एलईडी पॅटर्नमुले या कारला एक अनोखा लुक मिळाला आहे. नवीन इंटीरियरबद्दलची सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे ऑडिओ व्हिज्युअल आणि नेव्हिगेशन (AVN) स्क्रीन जी हायटेक आणि हाय डेफिनेशन क्वालिटीसह येते. Kia EV6 ची बॅटरी पॉवर या कारला विशेष बनवते आणि नवीन फिलॉसफीसह या करचं डिझाइन तयार केलं आहे. कंपनी आता लवकरात लवकर अजून काही इलेक्ट्रिक व्हिकल सादर करणार आहे.

3.5 सेकंदात 100 किमी वेग

ही कार 4680 मिमी लांब, 1880 मिमी रूंद आणि 1550 मिमी उंच आहे. किआ ईव्ही 6 ही कार दोन बॅटरी पॅक पर्यायांमध्ये विकली जाते, ज्यात 58kWh आणि 77.4kWh चा समावेश आहे. या बॅटरीच्या मदतीने ही ईव्ही अवघ्या 3.5 सेकंदात 100 किमी प्रतितास इतका वेग पकडते. त्याच वेळी, केबिनमध्ये अधिक जागा असलेली बरेच दमदार फीचर्स यामध्ये देण्यात आले आहेत.

18 मिनिटात 80% चार्ज

Kia EV6 मध्ये 800 व्होल्टची चार्जिंग सिस्टम मिळेल, ज्याच्या मदतीने केवळ 18 मिनिटांत ही कार 10 वरुन 80 टक्क्यापर्यंत चार्ज केली जाऊ शकते. कंपनीच्या म्हणण्यानुसार, ही कार केवळ 4.30 मिनिटं चार्ज केली तरी ही कार किमान 100 किलोमीटरपर्यंत धावते. तर या कारची बॅटरी पूर्ण चार्ज केल्यानंतर ही कार 510 किलोमीटरची रेंज देते. ही इलेक्ट्रिक एसयूव्ही EV6, EV6 GT-Line आणि EV6 GT सह तीन व्हेरिएंट्समध्ये सादर करण्यात आली आहे. ही कार EV6 टू-व्हील ड्राइव्ह (2WD) आणि ऑल व्हील ड्राइव्हसह (AWS) सादर करण्यात आली आहे.

इतर बातम्या

एकदा चार्ज केल्यावर 452KM धावणार, 1.5 लाखांच्या डिस्काऊंटसह ‘ही’ इलेक्ट्रिक कार विक्रीस उपलब्ध

अवघ्या 10 हजारात बुक करा किफायतशीर इलेक्ट्रिक कार, सिंगल चार्जवर 200km धावणार

(Kia EV6 runs 112KM in 5 minute charging, EV breaks all records and booked all the car in few hour)

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.