Kia EV6 : किआ ईव्ही 6 आज भारतात होणार लाँच, किमतीबाबत ग्राहकांमध्ये उत्सूकता

किआच्या पहिल्या इलेक्ट्रिक कारची किमती आज जाहीर केली जाणार आहे. किआ ईव्ही 6 ही सीबीयुच्या माध्यमातून मर्यादित संख्येत भारतात उपलब्ध करुन देण्यात येणार आहे.

Kia EV6 : किआ ईव्ही 6 आज भारतात होणार लाँच, किमतीबाबत ग्राहकांमध्ये उत्सूकता
Kia EV6Image Credit source: social
Follow us
| Updated on: Jun 02, 2022 | 10:50 AM

मुंबई : किआ ईव्ही 6 (Kia EV6) चे आज भारतात लाँचिंग (launch) होणार आहे. सीबीयु (CBU) च्या माध्यमातून ही इलेक्ट्रिक कार भारतात उपलब्ध करुन देण्यात येत आहे. दरम्यान एका रिपोर्टनुसार, या कारच्या किमतीत काहीशी वाढ होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. या कारच्या आयातीवर जास्त प्रमाणात आयातशुल्क आकारले जाणार असल्याने ग्राहकांना या कारसाठी जास्तीचे पैसे मोजावे लागणार आहे. किआच्या या कारचे केवळ 100 युनिट्स विक्रीसाठी ऑफर करण्यात येणार आहे. किआ ईव्ही 6चे बुकिंग 26 मे रोजी सुरू करण्यात आले होते. कंपनीने याची बुकिंग अमाउंट 3 लाख रुपये ठेवली होती.

किआ ईव्ही 6 चे हे मॉडेल ह्युंडाई मोटर ग्रुपच्या E-GMP (इलेक्ट्रिक ग्लोबल मॉड्युलर प्लॅटफॉर्म) ईव्ही आर्किटेक्चरवर आधारित क्रॉसओवर आहे. त्याला 4,695mm लांब, 1,890mm रुंद आणि 1,550mm उंच आणि 2,900mm व्हीलबेस देण्यात आले आहे. हा स्टायलिश क्रॉसओवर पाच रंगांमध्ये सादर केला जाणार असून त्यात, Moonscape, Snow White Pearl, Runway Red, Aurora Black Pearl आणि Yacht Blue याचा समावेश आहे.

हे सुद्धा वाचा

किआ ईव्ही 6 च्या इंटीरियरच्या विचार केल्यास आतमध्ये 12.3 इंच आकाराचे इंस्ट्रुमेंट क्लस्टर आणि इन्फोटेनमेंट डिस्प्ले असलेला मोठा पॅनेल दिला आहे. त्‍याच्‍या व्यतिरिक्त कारचमध्ये ADAS फंक्‍शन्‍सचाही समावेश आहे. किआ ईव्ही 6 चे दोन प्रकार GT लाइन ट्रिममध्ये विक्रीसाठी उपलब्ध असतील. त्यात RWD आणि AWD यांचा समावेश असेल. रीअर व्हील ड्राइव्ह व्हेरियंटमध्ये मागील चाकांना पॉवर देणारी एकच मोटर दिली आहे.

7.3 सेकंदात 0 ते 100kmph पर्यंत वेग

पावरचा विचार केल्यास एका टॅपवर 229bhp आणि 350Nm ची पॉवर जनरेट होते. कार केवळ 7.3 सेकंदात 0 ते 100kmph पर्यंत वेग पकडू शकते. AWD किंवा ऑल व्हील ड्राईव्हमध्ये 325bhp कमाल पॉवर आणि 605Nm पीक टॉर्कसह ड्युअल मोटर सेटअप आहे, जे फक्त 5.2 सेकंदांचा वेगवान 0 ते 100kmph वेग धारण करु शकतात. 350kW DC फास्ट चार्जर वापरून 18 मिनिटांत 10 ते 80 टक्के चार्ज करता येते तर 50kW DC फास्ट चार्जरला त्यासाठी 73 मिनिटे लागतात.

काय असेल किंमत

किआ ईव्ही 6 ची भारतातील किंमत आज दुपारी 12 वाजता कंपनीच्या अधिकृत युट्यूब चॅनेलद्वारे घोषित केली जाईल. भारताबाहेरील बाजारपेठेतील त्याची किंमत लक्षात घेता आणि CBU च्या माध्यमातून आयात करण्यात येणार असल्याने किआ ईव्ही 6 ची किंमतीबाबत अंदाज बांधण्यात येत आहे. 60 ते 70 लाखांच्या दरम्यान कारची किंमत राहू शकते अशी चर्चा आहे.

तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल
तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल.
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती.
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे.
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस.
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार.
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू.
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी.
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.