Kia Seltos आणि Sonet च्या किंमतीत वाढ, जाणून घ्या नव्या किंमती
किया मोटर्सने (Kia India) त्यांच्या भारतातील दोन सर्वात लोकप्रिय वाहनांच्या किंमती वाढवल्या आहेत, सेल्टॉस (Seltos) आणि सोनेट (Sonet) या दोन गाड्या महागल्या आहेत.
मुंबई : किया मोटर्सने (Kia India) त्यांच्या भारतातील दोन सर्वात लोकप्रिय वाहनांच्या किंमती वाढवल्या आहेत, सेल्टॉस (Seltos) आणि सोनेट (Sonet) या दोन गाड्या महागल्या आहेत. कंपनीची कॉम्पॅक्ट एसयूव्ही सोनेटची सुरुवातीची एक्स-शोरूम किंमत आता 6.89 लाख रुपये आहे आणि टॉप मॉडेलची किंमत 13.55 लाख रुपये आहे. त्याच वेळी, सेल्टॉसची सुरुवातीची किंमत 9.95 लाख रुपये आणि टॉप व्हेरिएंटची किंमत 18.10 लाख रुपये करण्यात आली आहे. किआने दोन्ही वाहनांच्या किमतीत 20 हजार रुपयांपर्यंत वाढ केली आहे. (Kia seltos price and sonet price increases by Rs 20000)
किआने सोनेटच्या 1.2 लीटर पेट्रोल आणि 1 लीटर टर्बो पेट्रोल डीसीटी व्हेरिएंटमध्ये 10,000 रुपये आणि 1.5 लीटर डिझेल व्हेरिएंटच्या किंमतीत 20,000 रुपये वाढवले आहेत. तथापि, 1 लीटर टर्बो पेट्रोल डीसीटीच्या जीटीएक्स+ आणि जीटीएक्स+ Dual Tone व्हेरिएंटच्या किंमतीत कोणताही बदल झालेला नाही. टर्बोमध्ये फक्त एचटीएक्स व्हेरिएंटची किंमत वाढवण्यात आली आहेत. त्याच वेळी, ही वाढ केवळ सामान्य पेट्रोल आणि डिझेल इंजिनच्या किंमतीत झाली आहे.
त्याचप्रमाणे सेल्टॉसच्या काही व्हेरिएंटच्या किंमतीत कोणताही बदल करण्यात आलेला नाही. तर बहुतांश व्हेरिएंटच्या किंमती वाढवण्यात आल्या आहेत. Seltos 1.5 लीटर पेट्रोलचं बेस व्हेरिएंट HTE च्या किंमतीत कोणताही बदल करण्यात आलेला नाही. त्याची एक्स-शोरूम किंमत फक्त 9.95 लाख रुपये आहे. परंतु या इंजिनच्या उर्वरित पर्यायांमध्ये उपलब्ध असलेल्या इतर सर्व व्हेरिएंटच्या किंमतीत 10 हजार रुपयांनी वाढ करण्यात आली आहे.
सेल्टॉसच्या 1.4-लीटर टर्बो-पेट्रोलमध्ये X-Line DCT च्या किंमतींमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही. उर्वरित व्हेरिएंटच्या किंमतीत 10 हजारांनी वाढ करण्यात आली आहे. त्याच वेळी, 1.5-लीटर डिझेलमधील एक्स-लाइन एटीच्या किंमती वगळता, सर्व व्हेरिएंटच्या एक्स-शोरूम किंमतीत 20 हजार रुपयांनी वाढ करण्यात आली आहे. या सर्व एक्स-शोरूम किमती दिल्लीच्या आहेत.
किआ कंपनीची वाहने भारतात चांगली कामगिरी करत आहेत. त्याचबरोबर लोकांना या वाहनांचे मॉडेल्सही खूप आवडत आहेत. अशा स्थितीत, आता कंपनी भारतीय बाजारपेठ पाहून एक नवीन रणनीती तयार करत आहे, ज्यामध्ये येत्या काळात नवीन मॉडेल सादर केले जाऊ शकतात.
नवीन Kia Sonet चं इंजिन आणि फिचर्स
या कॉम्पॅक्ट एसयूव्हीमध्ये रिफाइन्ड 1.5 CRDi डिझेल इंजिन देण्यात आलं आहे, जे 6 स्पीड मॅन्युअल ट्रान्समिशनसह 100 PS इतकी पॉवर जनरेट करु शकतं. तर दुसरं इंजिन 115 PS इतकी पॉवर जनरेट करु शकतं. सोबतच यामध्ये G1.0 T-GDi पेट्रोल इंजिन देण्यात आलं आहे जे 120 PS इतकी पॉवर जनरेट करु शकतं. हे इंजिन 6iMT आणि 7DCT स्मार्टस्ट्रीमसह देण्यात आलं आहे.
मायलेज आणि स्पीड
7DCT सह किया सोनेटचं मायलेज 18.3 किलोमीटर प्रति लीटर इतकं आहे. iMT सह किया सोनेटचं मायलेज 18.2 किलोमीटर प्रति लीटर इतकं आहे. 6MT डिझेल सोनेट 24.1 किलोमीटर प्रति लीटर इतकं मायलेज देते. तर 6AT सोनेट 19 किलोमीटर प्रति लीटर मायलेज देते.
या कारमध्ये तुम्हाला इमरजन्सी स्टॉप सिग्नल, रियर पार्किंग सेन्सर, अँटी लॉक ब्रेकिंग सिस्टिम, डुअल एयरबॅग्स आणि ईबीडीसारखे फिचर्स देण्यात आले आहेत. किआ सोनेटमध्ये तुम्हाला 10.67cm कलर कलस्टर आणि 26.03cm टचस्क्रीन, स्मार्ट प्युअर एयर प्युरिफायरसह व्हायरस प्रोटेक्शन, फ्रंट वेंटिलेटेड सीट्स, मल्टी ड्राईव्ह मोड्स आणि एमटी रिमोट इंजिन स्टार्टसारखे अनेक फिचर्स मिळतील. या कारची एक्स शोरुम किंमत 6.71 लाख ते 11.99 लाख रुपयांपर्यंत आहे.
इतर बातम्या
अपडेटेड Mahindra Scorpio पुढच्या वर्षी बाजारात, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स
Renault कडून सर्व गाड्यांवर 80,000 रुपयांची सूट, KWID च्या बेस मॉडेलमध्ये नवं सेफ्टी फीचर
Tokyo Paralympics मधील सुवर्णपदक विजेत्या सुमित अंतिलला Mahindra कस्टम मेड स्पेशल XUV गिफ्ट करणार
(Kia seltos price and sonet price increases by Rs 20000)