लॉकडाऊनचा असाही सदुपयोग, लंडनमधील भारतीय व्यक्तीने घरीच बनवले विमान, कुटुंबासह केला प्रवास

मूळचे केरळचे रहिवासी असलेले अशोक सध्या लंडनमध्ये आपल्या कुटुंबासह राहतात. लॉकडाऊनमधील वेळेचा सदुपयोग करत त्यांनी स्वत: घरी एक 4 सीटर विमान तयार केले.

लॉकडाऊनचा असाही सदुपयोग, लंडनमधील भारतीय व्यक्तीने घरीच बनवले विमान, कुटुंबासह केला प्रवास
Follow us
| Updated on: Jul 28, 2022 | 11:52 AM

कोरोनाच्या (Corona) संकटामुळे जगभरात लॉकडाऊन (Lockdown) लागलेला असताना अनेक जण घरी डॅलगोना कॉफी आणि ब्रेड बनवत होते. अनेकांनी आपले व्हिडीओही शेअर केले. मात्र लंडमधील एका भारतीय व्यक्तीने (London based Indian) याच वेळेचा सदुपयोग करत घरच्या घरी स्वत:च्या हाताने एक 4 सीटर ( चार आसनी) विमान (Built his own plane) तयार केले आहे. अशोक थामरक्षण असे त्या व्यक्तीचे नाव असून ते मूळचे केरळचे रहिवासी आहेत. सध्या ते कुटुंबासह लंडनमध्ये राहतात. पत्नी व मुलींसह फिरता येऊ शकेल असा विचार करून त्यांनी लॉकडाऊनच्या काळात स्वत: विमान तयार केले. त्यासाठी त्यांना 18 महिन्यांच्या कालावधी लागला व सुमारे 1.8 कोटी रुपयात हे विमान तयार झाले. त्यांची धाकटी मुलगी दिया हिच्या नावावरून त्यांनी या विमानाला G-Diya हे नावही दिले.

मूळचे केरळमधील अलप्पुझा येथील रहिवासी असलेले अशोक, हे केरळचे माजी आमदार ए.व्ही थामरक्षण यांचे पुत्र आहेत. पलक्कड अभियांत्रिकी महाविद्यालयातून बीटेकचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर, मास्टर्स करण्यासाठी 2006 साली अशोक यूकेला गेले. सध्या ते फोर्ड मोटर कंपनीत कार्यरत आहेत.

हे सुद्धा वाचा

कशी सुचली विमान बनवण्याची कल्पना ?

या प्रश्नाचे उत्तर देताना अशोक सांगतात, 2018 साली पायलटचा परवाना मिळाल्यानंतर मी 2 सीटर विमान प्रवासासाठी भाड्याने घ्यायचो. मात्र आता आमच्या कुटुंबात पत्नीसह दोन मुलीही आहेत. त्यामुळे 2 आसनी विमानाने प्रवास करणे शक्य नव्हते. 4 सीटर विमाने खूप दुर्मिळ असतात. मी अशी काही विमाने पाहिली, पण ती खूप जुनी होती. तर काही मलाच आवडली नाहीत. त्यामुळे मी स्वत: विमान तयार करण्याचे ठरवले.

तेव्हा जोहान्सबर्गमधील स्लिंग एअरक्राफ्ट या कंपनीबद्दल त्यांना माहिती मिळाली. 2018 साली ते Sling TSI विमान लॉंच करणार होते. अशोक यांनी त्या कंपनीला भेट देऊन विमानाचा संपूर्ण अभ्यास केला. लंडनमध्ये घरी आल्यावर त्यांनी विमान तयार करण्यासाठी किट मागवले. घरीच वर्कशॉप तयार करून त्यांनी विमान तयार करण्यास सुरूवात केली. त्यासाठी अशोक यांना 18 महिन्यांचा कालावधी लागला. विमान तयार करण्याची प्रक्रिया सुरू असताना नागरी विमान वाहतूक प्राधिकरणाचे अधिकारी संपूर्ण प्रकल्पावर लक्ष ठेवून होते. ब्रिटनमध्ये अशा होम-मेड विमानांची कल्पना नवी नाही. विमानसाठीचे असेंब्ली किट पुरवणाऱ्या अनेक कंपन्या येथे आहेत, असे अशोक यांनी नमूद केले.

विमान तयार करण्यासाठी आला 1.8 कोटींचा खर्च

हे विमान 18 महिन्यात तयार झाले असून त्यासाठी 1.8 कोटी रुपये इतका खर्च आला, असे अशोक यांनी सांगितले. विमानाचा वेग 200 किमी प्रतितास असून इंधन टाकी 180 लिटर क्षमतेची आहे. उड्डाणासाठी ताशी सुमारे 20 लिटर इंधन लागते. अशोक यांची छोटी मुलगी दिया हिच्या नावावरून त्यांनी या विमानाचे G-Diya असे नाव ठेवले आहे. त्यांनी या विमानातून कुटुंबासह संपूर्ण ब्रिटनचा प्रवास केला. पत्नी व मुलींसह ते जर्मनी, ऑस्ट्रिया आणि झेक रिपब्लिक येथेही फिरून आले आहेत.

Non Stop LIVE Update
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.
'मुंडे 12 वर्ष वनवासात, बऱ्याच गोष्टी इच्छेविरुद्ध...',अंधारेंचा टोला
'मुंडे 12 वर्ष वनवासात, बऱ्याच गोष्टी इच्छेविरुद्ध...',अंधारेंचा टोला.
अजितदादांची शरद पवारांकडून पुन्हा भरसभेत नक्कल अन्..., बघा व्हिडीओ
अजितदादांची शरद पवारांकडून पुन्हा भरसभेत नक्कल अन्..., बघा व्हिडीओ.
रामटेकमध्ये वाद पेटला; 'सुनील केदार मारूतीच्या बेंबीतील विंचू अन्..'
रामटेकमध्ये वाद पेटला; 'सुनील केदार मारूतीच्या बेंबीतील विंचू अन्..'.