Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कार प्रेमींसाठी GOOD NEWS, महिंद्राकडून ‘या’ SUV मॉडेल्सवर मोठा डिस्काऊंट जाहीर

कार प्रेमी आणि महिंद्रा यांचे नाते अतूट आहे. महिंद्रा कंपनी आपल्या ग्राहकांसाठी नेहमी नवनवीन ऑफर घेऊन येतात. प्रत्येक ऑफर मागे महिंद्रा कंपनीचे काही ना काही ग्राहकांचे हित लपलेले असतेच.

कार प्रेमींसाठी GOOD NEWS, महिंद्राकडून 'या' SUV मॉडेल्सवर मोठा डिस्काऊंट जाहीर
Mahindra Xuv700 (PS- Mahindra)
Follow us
| Updated on: Mar 09, 2022 | 12:42 PM

बाजारांमध्ये वेगवेगळ्या कंपनी आपल्याला पाहायला मिळतात तसेच फोटो क्षेत्रामध्ये प्रत्येक कंपनी स्वतःला सिद्ध करण्याचा प्रयत्न करत असते या ऑटो क्षेत्रांमध्ये (Auto Industry) एक नाव प्रामुख्याने पुढे येते ते म्हणजे महिंद्रा अँड महिंद्रा. महिंद्रा अँड महिंद्रा (Mahindra and Mahindra) आपल्या ग्राहकांसाठी नेहमी काहीना काही ऑफर बाजारामध्ये आणत असेल असते त्याचबरोबर आपल्या ग्राहकांचे हित लक्षात ठेवूनच या ऑफरचा विचार केलेला असतो महिंद्रा अँड महिंद्रा ही कंपनी व ग्राहकांचे एक अतूट नाते आहे. या नात्यातील विश्वास नाही आता जपण्यासाठी महिंद्रा कंपनी नेहमी सकारात्मक पावले उचलत असतो. काही दिवसा वरच होळीचा सण येणार आहे होळीचा सण(festival offer) प्रत्येक भारतीय साजरा करत असतो आणि म्हणूनच या सणाच्या निमित्ताने महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीने आपल्या ग्राहकांसाठी या महिन्यापुरता एक विशेष ऑफर (special offer for car lover) बाजारामध्ये आणली आहे. जर तुम्हाला सुद्धा नवीन कार विकत घ्यायची असेल तर ही ऑफर तुमच्यासाठी लाभदायक ठरणार आहे. M&M च्या SUV आणि MPV मुळे कमी बजेट मध्ये सुद्धा तुम्हाला चांगली गाडी विकत घेता येईल. यंदाच्या होळीच्या निमित्ताने महिंद्राने KUV100, XUV300 अन्य काही मॉडेलवर विशेष सूट दिलेली आहे. तुम्ही निवडलेल्या मॉडेलवर विशेष अशा काही सवलती,कॅश डिस्काउंट, एक्सचेंज ऑफर, कॉर्पोरेट डिस्काउंट व अन्य काही गोष्टींचा तुम्हाला लाभ देखील घेता येईल.

KUV100 NXT

कार विकत घेत असताना आपण कोणते मॉडेल निवडत आहोत त्या निवडीवर काही विशेष सूट अवलंबून आहे. M&M’s KUV100 NXT मॉडेल Rs 38,055 पर्यंत स्पेशल कॅश डिस्काउंट सूट देखील मिळत आहे.या महिन्यात लिट्ल क्रॉस ओव्हर 20000 एक्सचेंज बोनस आणि 3 हजार रुपये पर्यंत कॉर्पोरेट डिस्काउंट देखील मिळेल.

XUV300

XUV300 हा एस यू व्ही गाडीचा मॉडेल आपल्याला 30,000 रुपयांपर्यंतच्या कॅश डिस्काउंट सह आणि 10,000 रुपयांपर्यंतच्या फ्री ॲक्सेसरीज सोबत खरेदी करता येऊ शकतो.या मॉडेल च्या खरेदीवर ग्राहकांना 25,000 रुपयांचा एक्सचेंज बोनस आणि 4,000 रुपयांच्या कॉर्पोरेट डिस्काउंट देखील मिळेल.

बोलेरो

जर तुम्ही महिंद्रा बोलेरो खरेदी करू इच्छित असाल तर या महिंद्रा बोलेरो वर कोणताही कॅश सूट दिली जाणार नाही.हा मॉडेल खरेदी करताना ग्राहकांना 15,000 रुपयांचा एक्सचेंज बोनस आणि 3,000 रुपयांची कॉर्पोरेट सूट दिली जाईल.ही ऑफर 6,000 रुपयांच्या फ्री ॲक्सेसरीज वर देखील मिळेल. जर तुम्हाला बोलेरो निओ खरेदी करायची असेल तर या मॉडेल वर एक्सचेंज बोनस आणि कॉर्पोरेट बोनस हे जास्त किंमतीचे असून रु. 20,000 आणि रु. 4,000 इतके आहेत.

मराझो

M2 ट्रिमवर, जर ग्राहकांना Mahindra Marazzo विकत घ्यायची असेल तर या मॉडेल वर Rs 20,000 ची सूट मिळेल, इतर trims वर, Rs 15,000 ची सूट मिळते. एक्सचेंज बोनस व्यतिरिक्त, मॅन्युफॅक्चरअर MPV वरती 5,200 रुपयांची कॉर्पोरेट सूट देखील दिली जात आहे.

स्कॉर्पिओ

जर ग्राहकांना Mahindra Scorpio विकत घ्यायची असेल तर या मॉडेल वर ग्राहकांना कोणत्याही प्रकारची सूट मिळणार नाही, परंतु ग्राहकांनी हे मॉडेल विकत घेतल्यास 15,000 रुपयांपर्यंत किमतीच्या ॲक्सेसरीज मोफत मिळवू शकतात याव्यतिरिक्त,हे प्रोडक्ट 4,000 रुपयांच्या कॉर्पोरेट सूट आणि 15,000 रुपयांच्या एक्सचेंज बोनस वर उपलब्ध आहे.

Alturas G4

जर ग्राहकांना मॉडेल विकत घ्यायचे असल्यास त्याच्या ठराविक किंमतीतील कपातीचा एक भाग म्हणून, महिंद्रा तिच्या फ्लॅगशिप SUV, Alturas G4 साठी रु. 2.2 लाखची मोठी सूट देईल तसेच रु. 50,000 चे एक्सचेंज बोनस आणि रु. 11,500 ची अतिरिक्त कॉर्पोरेट सूट ऑफर देखील मिळेल. ही ऑफर Alturas G4 मॉडेल घेतल्यास 20,000 रुपयांच्या किंमती पर्यंत फ्री ॲक्सेसरीज उपलब्ध होईल.

शरद पवारांच्या आशीर्वादानं दादांच्या लाडक्या लेकांचा साखरपुडा संपन्न
शरद पवारांच्या आशीर्वादानं दादांच्या लाडक्या लेकांचा साखरपुडा संपन्न.
'हे तर कलंक, या नालायकांनी...', वडेट्टीवारांचा मंगेशकर कुटुंबावर संताप
'हे तर कलंक, या नालायकांनी...', वडेट्टीवारांचा मंगेशकर कुटुंबावर संताप.
'आका' म्हणतो मला सोडा..वाल्मिक कराडचा निर्दोष मुक्ततेसाठी कोर्टात अर्ज
'आका' म्हणतो मला सोडा..वाल्मिक कराडचा निर्दोष मुक्ततेसाठी कोर्टात अर्ज.
सुनील राऊतांना सिलेंडरची अंत्ययात्रा काढणं अन् हायवे रोखणं पडलं महागात
सुनील राऊतांना सिलेंडरची अंत्ययात्रा काढणं अन् हायवे रोखणं पडलं महागात.
जय पवार यांचा साखरपुडा, शरद पवार हजेरी लावणार? बघा VIP मध्ये कोण-कोण?
जय पवार यांचा साखरपुडा, शरद पवार हजेरी लावणार? बघा VIP मध्ये कोण-कोण?.
वणी गडावर भविकांची चेंगराचेंगरी? भाविकांमध्ये ढकलाढकली, नेमकं काय घडल?
वणी गडावर भविकांची चेंगराचेंगरी? भाविकांमध्ये ढकलाढकली, नेमकं काय घडल?.
सोलापुरात संतापजनक प्रकार, बाळाला नुकताच जन्म अन् टाके असतानाही...
सोलापुरात संतापजनक प्रकार, बाळाला नुकताच जन्म अन् टाके असतानाही....
बाळासाहेब ठाकरे आणि शरद पवार यांच्याकडून मी शिकलो - छगन भुजबळ
बाळासाहेब ठाकरे आणि शरद पवार यांच्याकडून मी शिकलो - छगन भुजबळ.
'बैलजोडी जप्त करू..', धमकी देऊन गरीब शेतकऱ्याकडून केली वसूली
'बैलजोडी जप्त करू..', धमकी देऊन गरीब शेतकऱ्याकडून केली वसूली.
'वतन के, धर्म के गद्दार..', मानखुर्दमध्ये राऊतांच्या विरोधातले बॅनर
'वतन के, धर्म के गद्दार..', मानखुर्दमध्ये राऊतांच्या विरोधातले बॅनर.