Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

लाट असो की लॉकडाऊन, महिंद्रा सुसाट, एका महिन्यात विक्रमी ट्रॅक्टर्सची विक्री

महिंद्रा अँड महिंद्रा लिमिटेडच्या फार्म इक्विपमेंट सेक्टरतर्फे (FES) आज जून 2021 मधल्या त्यांच्या ट्रॅक्टर विक्रीची आकडेवारी जाहीर करण्यात आली आहे.

लाट असो की लॉकडाऊन, महिंद्रा सुसाट, एका महिन्यात विक्रमी ट्रॅक्टर्सची विक्री
संग्रहीत छायाचित्र
Follow us
| Updated on: Jul 02, 2021 | 6:29 PM

मुंबई : महिंद्रा समूहाचा (Mahindra Group) एक भाग असणाऱ्या महिंद्रा अँड महिंद्रा लिमिटेडच्या (Mahindra and Mahindra ltd.) फार्म इक्विपमेंट सेक्टरतर्फे (FES) आज जून 2021 मधल्या त्यांच्या ट्रॅक्टर विक्रीची आकडेवारी जाहीर करण्यात आली आहे. त्यानुसार आगामी काळात कंपनीची चांगली ग्रोथ होणार असल्याचे स्पष्ट दिसून येत आहे. जून 2020 मध्ये कंपनीने 35844 युनिट्सची विक्री केली होती तर जून 2021 मध्ये कंपनीने 46875 युनिटसची विक्री केली आहे. (Mahindra and Mahindra reports total tractor sales of 48,222 units in June)

महिंद्राने जून 2021 मध्ये स्थानिक आणि निर्यात मिळून 48,222 युनिट्सची विक्री केली आहे. तर गेल्या वर्षी हाच आकडा 36,544 युनिट्स इतका होता. या महिन्यात 1347 युनिट्सची निर्यात झाली आहे.

महिंद्रा अँड महिंद्रा लिमिटेडच्या फार्म इक्विपमेंट सेक्टरचे अध्यक्ष हेमंत सिक्का या कामगिरीबद्दल बोलताना म्हणाले, “गेल्या वर्षीच्या तुलनेत 31%ची वाढ करत आम्ही यंदा जून 2021 मध्ये स्थानिक बाजारपेठेत 46,875 ट्रॅक्टर्सची विक्री केली. कोव्हिड 19 च्या रुग्णांच्या संख्येमध्ये मोठ्या प्रमाणावर झालेली घट आणि तुलनेने कमी झालेले निर्बंध, वेळेवर दाखल झालेला मान्सून, मुख्य खरीप पिकांसाठीच्या हमीभावात झालेली वाढ आणि सगळ्या प्रकारच्या कृषी कार्यक्रमांना सातत्याने असलेले सरकारी पाठबळ यामुळे ट्रॅक्टर्सच्या मागणीत वाढ झाली. मान्सूनची वाटचाल, प्रगती दमदार होईल आणि आगामी महिन्यातही ट्रॅक्टरच्या मागणीत वाढ होईल, अशी आम्हांला आशा आहे. निर्यातीच्या बाजारपेठेत 92%ची वाढ होत आम्ही 1347 ट्रॅक्टर्सची विक्री केली.”

महिंद्रा समूहाची वाटचाल

1945 मध्ये स्थापना झालेला महिंद्रा समूह हा सर्वात मोठ्या कंपन्यांपैकी एक आणि सर्वाधिक पसंतीच्या बहुराष्ट्रीय कंपन्यांचे संघटन असलेला 100 देशांमध्ये कार्यरत आणि 2,60,000 कर्मचारी असणारा समूह आहे. कृषी साहित्य, उपयुक्ततावादी वाहने, माहिती तंत्रज्ञान आणि आर्थिक सेवा या क्षेत्रात भारतात आघाडीवर आहे आणि जगातली सर्वात मोठ्या संख्येने ट्रॅक्टर बनविणारी कंपनी आहे. रिन्यूएबल एनर्जी, कृषी, पुरवठा, हॉस्पिटॅलिटी आणि बांधकाम व्यवसाय यामध्ये कंपनीचे मोठे काम चालते.

इतर बातम्या

उद्यापासून तुमच्या आवडत्या गाड्या होणार महाग; मारुतीपासून हिरोपर्यंत कंपन्यांनी घेतला दरवाढीचा निर्णय

टाटा मोटर्स बनवणार 15 हायड्रोजन आधारीत इंधन सेल बस, आयओसीएलचे आदेश

खूशखबर! आता ड्रायव्हिंग लायसन्स बनवणे झाले सोपे, जाणून घ्या काय आहे नवीन नियम

(Mahindra and Mahindra reports total tractor sales of 48,222 units in June)

बीड प्रकरणात पोलिसांनी मुलाहिजा बाळगू नये - अंबादास दानवे
बीड प्रकरणात पोलिसांनी मुलाहिजा बाळगू नये - अंबादास दानवे.
वडाळा येथे पोलीस आणि विश्व हिंदू परिषदेचे कार्यकर्ते आमनेसामने
वडाळा येथे पोलीस आणि विश्व हिंदू परिषदेचे कार्यकर्ते आमनेसामने.
रिक्षा अडवली म्हणून चालकाने पोलिसांना दिल अमित देशमुखांच्या नावाचा दम
रिक्षा अडवली म्हणून चालकाने पोलिसांना दिल अमित देशमुखांच्या नावाचा दम.
चांडाळ चौकडी ठाकरे बंधूंना एकत्र येऊ देणार नाही; शिरसाट यांची टोलेबाजी
चांडाळ चौकडी ठाकरे बंधूंना एकत्र येऊ देणार नाही; शिरसाट यांची टोलेबाजी.
ठाकरे बंधूंच्या युतीवर छगन भुजबळ थेट बोलले
ठाकरे बंधूंच्या युतीवर छगन भुजबळ थेट बोलले.
गिरगावात ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्यावर मनसेची बॅनरबाजी
गिरगावात ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्यावर मनसेची बॅनरबाजी.
जम्मू-काश्मीरमध्ये मुसळधार पाऊस आणि भूस्खलन; तिघांचा मृत्यू
जम्मू-काश्मीरमध्ये मुसळधार पाऊस आणि भूस्खलन; तिघांचा मृत्यू.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या गगनचुंबी पुतळ्याचं काम पूर्णत्वाकडे
छत्रपती शिवाजी महाराजांच्या गगनचुंबी पुतळ्याचं काम पूर्णत्वाकडे.
शिंदेंना ठाकरे बंधु एकत्र यायला नको आहे; राऊतांचा टोला
शिंदेंना ठाकरे बंधु एकत्र यायला नको आहे; राऊतांचा टोला.
ठाकरे बंधूंच्या युतीच्या चर्चेवर शरद पवारांचे मौन
ठाकरे बंधूंच्या युतीच्या चर्चेवर शरद पवारांचे मौन.