Mahindra चा इलेक्ट्रिक थ्री व्हीलर कार्गो बाजारात, लहान व्यावसायिकांची मोठी बचत होणार
महिंद्रा इलेक्ट्रिक मोबिलिटी लिमिटेडने (Mahindra Electric Mobility Limited) गुरुवारी इलेक्ट्रिक थ्री व्हीलर कार्गो (Electric three wheeler cargo) लाँच केला आहे, जो छोट्या व्यावसायिकांसाठी खूप उपयुक्त ठरू शकतो.
मुंबई : महिंद्रा इलेक्ट्रिक मोबिलिटी लिमिटेडने (Mahindra Electric Mobility Limited) गुरुवारी इलेक्ट्रिक थ्रीव्हीलर कार्गो( Electric three wheeler cargo) लाँच केला आहे, जो छोट्या व्यावसायिकांसाठी खूप उपयुक्त ठरू शकतो. कंपनीने सांगितले की, त्यांनी त्यांचा नवीन इलेक्ट्रिक 3-व्हीलर ई-अल्फा कार्गो (E-Alfa Cargo) लॉन्च केला आहे. या इलेक्ट्रिक थ्री-व्हीलरची किंमत (Electric three wheeler) 1.44 लाख रुपये (एक्स-शोरूम दिल्ली) इतकी निश्चित करण्यात आली आहे. हे इलेक्ट्रिक वाहन कंपनीला ई-कार्ट सेगमेंटमध्ये प्रवेश करण्यास खूप मदत करेल. त्यामुळे इंधनाची बचत होण्याबरोबरच पर्यावरणाचेही संरक्षण होणार आहे.
हा इलेक्ट्रिक 3-व्हीलर ई-अल्फा कार्गो मॉडेल 310 किलो पेलोड क्षमतेसह येतो. या कार्गोच्या रेंजबद्दल बोलायचे झाले तर तो सिंगल चार्जवर 80 किमी रेंज देऊ शकतो. उर्जेच्या बाबतीत, ई-अल्फा कार्गो जास्तीत जास्त 1.5 किलोवॅट ऊर्जा निर्माण करण्यास सक्षम आहे. या कार्गोच्या वेगाबद्दल बोलायचे झाल्यास, हा इलेक्ट्रिक थ्री-व्हीलर कार्गो 25 किमी प्रतितास इतका टॉप स्पीड देण्यास सक्षम आहे.
चार्जिंग करणे खूप सोपे
हा इलेक्ट्रिक थ्री-व्हीलर ई-अल्फा कार्गो चार्ज करणे खूप सोपे आहे. ई-अल्फा कार्गो चार्ज करणे हे ऑफ-बोर्ड 48V/15A चार्जरसह मोबाईल फोन चार्ज करण्याइतके सोपे आहे. हे इलेक्ट्रिक 3-व्हीलर ई-अल्फा कार्गो मॉडेल 310 किलो पेलोडसह येते. दुसरीकडे, त्याच्या रेंजबद्दल बोलायचे झाल्यास तो सिंगल चार्जवर 80 किमीचे अंतर कव्हर करू शकतो.
लहान व्यवसायिकांची बचत
महिंद्रा इलेक्ट्रिक मोबिलिटीचे सीईओ सुमन मिश्रा यांनी सांगितले की, आम्ही ग्राहकांच्या गरजा लक्षात घेऊन ई-अल्फा कार्गो ई-कार्ट लाँच करत आहोत. ते पुढे म्हणाले की, डिझेल कार्गो थ्री-व्हीलरवर 60,000 रुपयांच्या बचतीसह कार्गो सेगमेंटमध्ये शाश्वत आणि प्रदूषणमुक्त समाधान प्रदान करण्याचे ई-अल्फा कार्गोचे उद्दिष्ट आहे.
इलेक्ट्रिक सेगमेंटचा विस्तार
भारतीय बाजारपेठेत इलेक्ट्रिक सेगमेंटमध्ये अनेक दुचाकी, तीन चाकी आणि चारचाकी गाड्या लॉन्च केल्या जात आहेत. यामुळे पेट्रोल आणि डिझेल यांसारख्या इंधनावरील आपले अवलंबित्व तर कमी होईलच पण वायू प्रदूषण कमी होण्यासही मदत होईल. भारतात पेट्रोल पंपांसह अनेक कंपन्या इलेक्ट्रिक चार्जरची सुविधा देण्याचा प्रयत्न करत आहेत. इतकंच नाही तर अनेक कंपन्या अवजड वस्तू वाहून नेणाऱ्या दुचाकी देखील देत आहेत.
इतर बातम्या
इलेक्ट्रिक बाईक सेगमेंटमध्ये Tork बाईकची एण्ट्री, ई-बाईकमधील टॉप 4 ऑप्शन्स जाणून घ्या…
Maruti Suzuki : मारुतीची फेब्रुवारीमध्ये लॉन्च होणार ही खास कार, उत्पादन सुरू ही असतील वैशिष्ट्ये!
Toyota : टोयोटाने सादर केली दमदार नवीन SUV कार, फिचर्स पाहून थक्क व्हाल!