कोरोनाविरुद्धच्या लढ्यात Mahindra कंपनी मैदानात, राज्यात Oxygen on Wheels सेवा सुरु
महिंद्रा लॉजिस्टिकने (Mahindra Logistics) ऑक्सिजन ऑन व्हील्स (Oxygen on Wheels) ही सेवा सुरू करण्याची घोषणा केली आहे.
नवी दिल्ली : महिंद्रा लॉजिस्टिकने (Mahindra Logistics) मंगळवारी ऑक्सिजन ऑन व्हील्स (Oxygen on Wheels) ही सेवा सुरू करण्याची घोषणा केली, जी एक मोफत सेवा असेल. याद्वारे ऑक्सिजन उपलब्ध करुन देण्यासाठी उत्पादक आणि रुग्णालये तथा वैदकीय केंद्र जोडली जातील. महाराष्ट्रातील मुंबई, ठाणे, पुणे, पिंपरी-चिंचवड, चाकण, नाशिक आणि नागपूर अशा शहरांमध्ये ही सेवा सुरू केली जाईल, असे महिंद्रा लॉजिस्टिकने आपल्या निवेदनात म्हटले आहे. ऑक्सिजन सिलिंडर्सचा पुरवठा अधिक सुरक्षित व वेगवान करण्याच्या उद्देशाने कंपनी राज्यात एकूण 100 वाहने तैनात करणार आहे. (Mahindra Oxygen on Wheels initiative started in Maharashtra)
महिंद्रा अँड महिंद्रा म्हटले आहे की, ही सेवा महिंद्रा लॉजिस्टिकच्या सीएसआर उपक्रमांतर्गत होईल, ज्याने या प्रकल्पासाठी प्रशासन आणि स्थानिक सरकारी संस्थांशी भागीदारी केली आहे. दिल्लीसह इतर शहरांमध्ये ही सेवा सुरू करण्याबाबत शहरी प्रशासन आणि सरकारी विभागांशी चर्चा सुरु असल्याचेही कंपनीने म्हटले आहे. वैद्यकीय ऑक्सिजनच्या कमतरतेचा सामना करत असलेल्या सर्व राज्यात ही सेवा सुरु करण्याचा विचार सुरु असल्याचे कंपनीने म्हटले आहे.
महिंद्रा कंपनीनेदेखील या कोरोना साथीच्या आजारात लोकांना मदत करण्यासाठी बोलेरो पिकअप ट्रकचा वापर केला आहे. त्याच्या मदतीने ही कंपनी ऑक्सिजनचे वितरण करत आहे. महिंद्रा आणि महिंद्रा कंपनीने या उपक्रमाला Oxygen on Wheels असे नाव दिले आहे. या उपक्रमाद्वारे गरजूंपर्यंत आणि रुग्णालयात ऑक्सिजन पोहोचवण्याचे काम केले जात आहे.
Today, Oxygen is the key to reducing mortality. The problem is not of oxygen production but its transportation from producing plants to hospitals & homes. We’re attempting to bridge this gap with “Oxygen on Wheels” a project implemented via Mahindra Logistics (1/5) pic.twitter.com/Cj0CkrfYRo
— anand mahindra (@anandmahindra) May 1, 2021
Force Motors चा मदतीचा हात
कोरोनाची वाढती रुग्णसंख्या पाहता, अनेक वाहन उत्पादक कंपन्या मदत करण्यासाठी पुढे येत आहेत. अशा परिस्थितीत प्रसिद्ध वाहन उत्पादक कंपनी फोर्स मोटर्सनेही (Force Motors) महाराष्ट्र सरकारला 50 ट्रॅक्स रुग्णवाहिका (Trax Ambulance) दिल्या आहेत. कोरोना संसर्गाविरूद्धच्या लढ्यात आरोग्य सेवा बळकट करण्यासाठी महाराष्ट्र सरकारने नांदेड जिल्ह्यात या रुग्णवाहिका तैनात केल्या आहेत.
राज्य सरकारने एक निवेदनात म्हटले आहे की, या रुग्णवाहिका 1 मेपासून सेवांमध्ये दाखल करण्यात आल्या असून राज्यातील नांदेड जिल्ह्यातील सर्व भागात संसर्गजन्य रुग्णांची ने-आण करणासाठी त्यांचा वापर केला जाईल. या रुग्णवाहिका सर्व नवीन नियमांशी अनुरुप आहेत आणि आरोग्य विभाग, सरकारी रुग्णालये यासह आपत्कालीन सेवांसाठी योग्य आहेत.
फोर्स मोटर्सचे सेल्स अँड मार्केटींगचे अध्यक्ष आशुतोष खोसला म्हणाले की, “जिल्ह्यातील सर्व भागातील रूग्णांना मदत करण्यासाठी नांदेड प्रशासनाने फोर्स प्लॅटफॉर्मवर आपला विश्वास दाखवल्याचा आम्हाला अभिमान आहे. हेल्थ केअर सिस्टिम बळकट करण्यासाठी आणि कोरोना संसर्गाविरूद्ध लढण्याच्या या उदात्त उपक्रमाचा भाग होऊन आम्हाला खूप आनंद झाला आहे.”
50 Trax Ambulances pressed into service in Nanded, Maharashtra to fight the spread of COVID-19. Flag was off done by the Guardian Minister of Nanded. The all-terrain capability of the Trax Ambulance makes it ideal to ferry patients from all parts of the district. pic.twitter.com/eYS4Qt4cxP
— Force Motors Ltd. (@ForceMotorsFML) May 3, 2021
संबंधित बातम्या
कोरोना रुग्णांसाठी Hyundai India कडून 20 कोटी रुपयांचं मदत पॅकेज, महाराष्ट्रासह पाच राज्यांना लाभ
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने धाबे दणाणले, तिसरी लाट कशी असेल?; जगाची तयारी काय? वाचा सविस्तर
(Mahindra Oxygen on Wheels initiative started in Maharashtra)