AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

महिंद्रा इलेक्ट्रिक एसयुव्हीचे काउंट डाउन सुरु… कधी होणार लाँच?

एका रिपोर्टनुसार, 2027 पर्यंत 8 इलेक्ट्रिक कार लाँच करण्याचा महिंद्राचा प्लॅन आहे. यात, पहिले लाँच eXUV300 असू शकते. या कारची लाँचिंग 2023 च्या सुरुवातीला होउ शकते. यानंतर eKUV100 ला लाँच केले जाउ शकते.

महिंद्रा इलेक्ट्रिक एसयुव्हीचे काउंट डाउन सुरु... कधी होणार लाँच?
Follow us
| Updated on: Jul 04, 2022 | 3:55 PM

मुंबईः देशातील एसयुव्ही सेगमेंटमध्ये आपली वेगळी ओळख निर्माण करणारी महिंद्रा (Mahindra) आता आपली इलेक्ट्रिक कार (Electric car) लाँच करण्याच्या तयारीमध्ये आहे. कंपनी दोन इलेक्ट्रिक एसयुव्ही कार eXUV300 आणि eKUV100 वर काम करीत आहे. सध्या महिंद्राकडून आपल्या इलेक्ट्रिक कार सेगमेंटकडे जास्त लक्ष केंद्रीत करण्यात येत आहे. एका रिपोर्टनुसार, 2027 पर्यंत 8 इलेक्ट्रिक कार लाँच करण्याचा महिंद्राचा प्लॅन (plans) आहे. यात, पहिले लाँच eXUV300 असू शकते. या कारची लाँचिंग 2023 च्या सुरुवातीला होउ शकते. यानंतर eKUV100 ला लाँच केले जाउ शकते. दरम्यान, eKUV100 ला पहिल्यांदा 2020 ऑटो एक्सपोमध्ये पाहण्यात आले आहे. येत्या काळात महिंद्रा कोणकोणत्या इलेक्ट्रिक बाइक आणण्याच्या विचारात आहे, याची माहिती या लेखातून जाणून घेणार आहोत.

eKUV100 च्या लाँचिंगमध्ये विलंब का?

इलेक्ट्रिक कार लाइनअपमध्ये महिंद्राने सर्वात पहिले eKUV100 ला भारतील बाजारासाठी ऑटो एक्सपो 2020 मध्ये सादर केले होते. त्या वेळची तिची किंमत 8.25 लाख रुपये एक्सशोरुम होती. परंतु आतापर्यंत एंट्री लेव्हल कारची विक्री सुरु झालेली नाही. ET Auto च्या रिपोर्टनुसार, eKUV100 कार बॅटरी सोर्सिंगच्या अडचणींशी मुकाबला करत आहे. त्यामुळे तिच्या लाँचिंगला उशिर होत आहे.

पुढील वर्षी दाखल होणार eXUV300

eXUV300 च्या लाँचिंगबाबत बोलायचे झाल्यास, अद्याप ही कार पाइपलाइनमध्ये आहे. महिंद्रा eXUV300 च्या लाँचिंगमध्ये विलंब होण्याची शक्यता कमी आहे. ऑटो एक्सपोमध्ये महिंद्रा eKUV100 ला 15.9kWh बॅटरी पॅक आणि सिंगल इलेक्ट्रिक मोटरसह बाजारात आणले होते. कंपनीने सिंगल चार्जवर 150km रेंजचा दावा केला होता. रेग्युलर चार्जरने 6 तासांपेक्षा कमी आणि फास्ट चार्जरने 55 मिनिटांमध्ये बॅटरी चार्ज होउ शकते.

कसा असणार परफॉर्मेंस

महिंद्रा आपल्या अपकमिंग दोन्ही इलेक्ट्रिक वाहनांच्या स्पेसिफिकेशन्समध्ये काय बदल करेल हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. परंतु मागील दोन वर्षांमध्ये ईव्ही टेक्नॉलॉजी बरीच अपग्रेड झालेली आहे. त्यात, इलेक्ट्रिक सेगमेंटमध्ये देखील मोठी स्पर्धा निर्माण झालेली आहे. याला बघता, महिंद्रा eKUV100 मध्ये पहिलेच्या तुलनेत अधिक चांगले बदल दिसण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. तसेच कारच्या परफॉर्मेंसमध्ये व रेंजमध्येही अनेक चांगले बदल दिसून येतील.

पहलगाम हल्ल्यात मुश्ताक अहमद जरगरचा हात?
पहलगाम हल्ल्यात मुश्ताक अहमद जरगरचा हात?.
पाकिस्तानचे पश्तून लोक भारतासोबत; काय आहे कारण?
पाकिस्तानचे पश्तून लोक भारतासोबत; काय आहे कारण?.
युद्धाची चाहूल? राज्यांना सुरक्षा यंत्रणांची मॉक ड्रिल घेण्याचे आदेश
युद्धाची चाहूल? राज्यांना सुरक्षा यंत्रणांची मॉक ड्रिल घेण्याचे आदेश.
राहुल गांधी पंतप्रधान मोदींच्या भेटीसाठी दाखल, काय होणार चर्चा?
राहुल गांधी पंतप्रधान मोदींच्या भेटीसाठी दाखल, काय होणार चर्चा?.
'मेरा ये वतन..', काश्मीरच्या शाळकरी मुलींनी गायलं देशभक्तीचं गाणं
'मेरा ये वतन..', काश्मीरच्या शाळकरी मुलींनी गायलं देशभक्तीचं गाणं.
'तुला पुढे काय शिकायचं?', उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा वैभवीला फोन
'तुला पुढे काय शिकायचं?', उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा वैभवीला फोन.
विशेष दलाची शोध मोहीम, tv9 चा ग्राऊंड रिपोर्ट
विशेष दलाची शोध मोहीम, tv9 चा ग्राऊंड रिपोर्ट.
काहीतरी मोठं होणार? पंतप्रधान मोदींचा लष्कराला फ्री हँड
काहीतरी मोठं होणार? पंतप्रधान मोदींचा लष्कराला फ्री हँड.
पाकसोबतचा वाद, पुतीन यांचा मोदींना फोन, युद्धजन्य परिस्थितीत काय घडतय?
पाकसोबतचा वाद, पुतीन यांचा मोदींना फोन, युद्धजन्य परिस्थितीत काय घडतय?.
कशाचे पेढे अन् काय.., 12वीचा निकाल लागताच सुप्रिया सुळेंचा वैभवीला फोन
कशाचे पेढे अन् काय.., 12वीचा निकाल लागताच सुप्रिया सुळेंचा वैभवीला फोन.