Mahindra THAR 2020 | दमदार फीचर्ससह महिंद्राची ‘THAR 2020’ भारतात लाँच!

2 ऑक्टोबर रोजी महात्मा गांधी जयंतीनिमित्ताने सेकंड जनरेशन महिंद्रा ‘THAR 2020’चे लाँचिंग पार पडले.

Mahindra THAR 2020 | दमदार फीचर्ससह महिंद्राची ‘THAR 2020’ भारतात लाँच!
Follow us
| Updated on: Oct 03, 2020 | 11:57 AM

मुंबई : महिंद्रा अँड महिंद्राने (Mahindra) आपली लोकप्रिय ऑफ-रोड एसयूव्ही महिंद्रा ‘THAR 2020’ भारतात (India) लाँच केली आहे. 2 ऑक्टोबर रोजी महात्मा गांधी जयंतीनिमित्ताने सेकंड जनरेशन महिंद्रा ‘THAR 2020’चे लाँचिंग पार पडले. भारतात (India) या गाडीची किंमत जवळपास 9.8 लाख रुपये इतकी असणार आहे. तर, महिंद्रा थारचे एलएक्स ट्रिम हे टॉप मॉडेल 12.95 लाखांपर्यंत बाजारात विक्रीस येणार आहे (Mahindra THAR 2020 Launched In India).

या नवीन महिंद्रा (Mahindra THAR)थारचे बुकिंगही सुरू झाले आहे. 1 नोव्हेंबरपासून थारचे वितरण देखील सुरू होणार आहे. जुन्या महिंद्रा थारच्या तुलनेत नवीन महिंद्रा ‘THAR 2020’मध्ये बऱ्यापैकी कॉस्मेटिक बदल करण्यात आले आहेत. ग्राहक त्यांच्या पसंतीनुसार पेट्रोल आणि डिझेल इंजिन पर्यायांसह नवी महिंद्रा ‘THAR 2020’ खरेदी करू शकतात. या नव्या ‘THAR 2020’मध्ये 4 सीट आणि 6 सीट, असे सीटिंग लेआउट पर्याय देण्यात आले आहेत.

एलएक्स, एएक्स आणि एएक्स (ओ) या तीन ट्रिमसह महिंद्रा ‘THAR 2020’ उपलब्ध होणार आहे. यापूर्वी महिंद्रा थार केवळ एलएक्स आणि एएक्स ट्रिमसह येईल, असे म्हटले गेले होते. मात्र, अ‍ॅक्स (ओ) हा वेरियंट पेट्रोल आणि डिझेल पॉवरट्रेन पर्यायांसह उपलब्ध करून देण्यात आला आहे. सेकंड जनरेशन महिंद्रा थारमध्ये पेट्रोल आणि डिझेल इंजिन, असे दोन पर्याय देण्यात आले आहेत. ज्यामध्ये 2.0 लीटर 4 सिलिंडर पेट्रोल इंजिन, 150 बीएचपी पॉवर आणि 300 एनएम टॉर्क जनरेट करते. तर, 2.2 लीटर डिझेल इंजिनने 130 बीएचपीची पॉवर आणि 300 एनएम टॉर्क जनरेट केले जाते. या नव्या ‘THAR 2020’मध्ये बीएस 6 इंजिन देण्यात आले असून, 6 स्पीड मॅन्युअल आणि ऑटोमॅटिक गिअरबॉक्सचे पर्याय उपलब्ध करून देण्यात आले आहेत. (Mahindra THAR 2020 Launched In India)

सेकंड जनरेशन महिंद्रा ‘THAR 2020’ची वैशिष्ट्ये

सेकंड जनरेशन महिंद्रा थारच्या उर्वरित वैशिष्ट्यांविषयी बोलायचे झाले तर, 9 वेरियंटसह रेड रेज, गॅलेक्सी ग्रे, मिस्टिक कॉपर, रॉकी बेज, नेपोली ब्लॅक आणि अ‍ॅक्वामरीन या वेगवेगळ्या रंगात ‘THAR 2020’ लाँच केली गेली आहे.

महिंद्रा ‘THAR 2020’मध्ये 7 इंचाचा टचस्क्रीन इंफोटेनमेंट, अ‍ॅडजेस्टेबल सीट, रूफ माउंट स्पीकर्स, क्रूझ कंट्रोल, ड्युअल एअरबॅग, स्टीयरिंग माउंटेड कंट्रोल, एबीएस, ईबीडी, हिल कंट्रोल, डिजिटल ओडोमीटर, इलेक्ट्रॉनिक मल्टी ट्रिप मीटर, असे फीचर्स देण्यात आले आहेत. महिंद्रा ‘THAR 2020’मध्ये खास चौकोनी एलईडी टेललाईट्स, स्पोक अ‍ॅलॉय व्हील्स देण्यात आले आहेत.

(Mahindra THAR 2020 Launched In India)

संबंधित बातम्या : 

WagonR CNG कारची जोरदार मागणी, आतापर्यंत 3 लाखापेक्षा अधिक गाड्यांची विक्री

मारुती सुझुकीकडून ‘Buy Now Pay Later’ ऑफर लाँच, आता कार घ्या, दोन महिन्यांनी EMI सुुरु

मारुती, ह्युंडाईनंतर आता अशोक ले लँडचंही उत्पादन बंद

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.