Mahindra: महिंद्रा लाँच करणार इलेक्ट्रिक पिकअप ट्रक; दमदार लूक अन्‌ आकर्षक फीचर्स

महिंद्राचा (Mahindra) अनेक दिवसांपासून इंटरनॅशनल मार्केटमध्ये आपली छाप सोडण्याचा प्रयत्न होता. यामुळे कंपनीने अपकमिंग इलेक्ट्रिक पिकअप ट्रकला सर्वात आधी नॉर्थ अमेरिकामध्ये सादर करण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

Mahindra: महिंद्रा लाँच करणार इलेक्ट्रिक पिकअप ट्रक; दमदार लूक अन्‌ आकर्षक फीचर्स
महिंद्रा लाँच करणार इलेक्ट्रिक पिकअप ट्रकImage Credit source: Mahindra
Follow us
| Updated on: Jul 18, 2022 | 11:03 AM

या वर्षीच्या सुरुवातीला भारतीय ऑटोमोबाईल कंपनी महिंद्राने तीन इलेक्ट्रिक एसयुव्हीचे टीझर प्रसिध्द केले होते. या तीन अपकमिंग इलेक्ट्रिक एसयुव्हीची साइज वेगवेगळी आहे. काही रिपोट्‌सनुसार या तिन्ही इलेक्ट्रिक एसयुव्हीमधून एक इलेक्ट्रिक पिकअप ट्रक असण्याची शक्यता आहे. 15 ऑगस्ट रोजी देशाच्या स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी युकेमध्ये याचे ग्लोबल प्रीमिअम (Global Premium) होणार आहे. महिंद्राचा (Mahindra) अनेक दिवसांपासून इंटरनॅशनल मार्केटमध्ये आपली छाप सोडण्याचा प्रयत्न होता. यामुळे कंपनीने अपकमिंग इलेक्ट्रिक पिकअप ट्रकला (Electric pickup truck) सर्वात आधी नॉर्थ अमेरिकामध्ये सादर करण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. या लेखातून अपकमिंग इलेक्ट्रिक पिकअम ट्रकची अधिक माहिती घेणार आहोत.

फॉक्सवेगनची घेतली मदत

महिंद्राच्या नवीन इलेक्ट्रिक पिकअम ट्रकशी निगडीत बरीच माहिती अजून समोर आलेली नाही. परंतु रॅशलेनच्या मते, या इलेक्ट्रिक पिकअपला बनविण्यासाठी महिंद्राने फॉक्सवेगनची मदत घेतलेली असू शकते. एका कराराअंतर्गत महिंद्रा आणि फॉक्सवेगनमध्ये ईव्हीसाठी कंपोनेंट्‌स शेअर करण्यासाठी सामंजस्य करार झाला आहे. महिंद्राने इलेक्ट्रिक पिकअपसाठी जर्मन ऑटो कंपनी एमईबी इलेक्ट्रिक प्लेटफार्मचा वापर केला आहे.

एलजी देणार कला बॅटरी पॅक

अपकमिंग इलेक्ट्रिक पिकअप ट्रकला सिंगल आणि ड्युअल मोटर अशा दोघांसह सादर केले जाणार आहे. तर दुसरीकडे याची बॅटरी कॅपेसिटीचीही माहिती अद्याप समोर आलेली नाही. परंतु असे सांगण्यात येतेय, की महिंद्राचे इलेक्ट्रिक पिकअप ट्रकसाठी एलजी आणि एक चिनी सप्लायर बॅटरी पॅकचा पुरवठा करणार आहे. तिन्ही अपकमिंग इलेक्ट्रिक कारची संभावित रेंज 400 किमीपर्यंत असण्याची शक्यता आहे.

हे सुद्धा वाचा

ग्लोबल मार्केटमध्ये मिळणार ओळख

भारतीय एसयुव्ही स्पेशलिस्ट महिंद्राची नेहमीच ग्लोबल मार्केटमध्ये आपली ओळख निर्माण करण्याची अपेक्षा राहिली आहे. यासाठी कंपनीने इलेक्ट्रिक व्हेकलच्या डिझाईन आणि कॉन्सेप्टसाठी युकेमधील महिंद्रा एडव्हांस डिझाईन युरोप सेंटर बनविले आहे. तर दुसरीकडे, अमेरिकेतील महिंद्रा नॉर्थ अमेरिकन टेक्निकल सेंटरमध्ये इंजिनिअरिंगच्या घटकांवर काम करत आहे. याबाबत अधिक माहिती वर्ल्ड प्रीमिअमच्या दरम्यान मिळण्याची शक्यता आहे.

मुंडेंचं मंत्रिपद वाचणार की जाणार? दादांनी घेतली दिल्लीत शहांची भेट
मुंडेंचं मंत्रिपद वाचणार की जाणार? दादांनी घेतली दिल्लीत शहांची भेट.
महाराष्ट्रातील असं एक गाव जिथं माणसं आपोआप होतात टकले, नेमक काय घडतय?
महाराष्ट्रातील असं एक गाव जिथं माणसं आपोआप होतात टकले, नेमक काय घडतय?.
शकुनी-कंस मामाला लाजवेल असा कलीयुगातला मामा, भाचीच्या लग्नात असं कृत्य
शकुनी-कंस मामाला लाजवेल असा कलीयुगातला मामा, भाचीच्या लग्नात असं कृत्य.
'चुकीच्या पद्धतीने...', धसांचा धनंजय मुंडेंनंतर पंकजा मुंडेंवर आरोप
'चुकीच्या पद्धतीने...', धसांचा धनंजय मुंडेंनंतर पंकजा मुंडेंवर आरोप.
पुरुष वेश्या.. मुंडेंच्या राजीनाम्यावर बोलताना 'या' आमदाराची जीभ घसरली
पुरुष वेश्या.. मुंडेंच्या राजीनाम्यावर बोलताना 'या' आमदाराची जीभ घसरली.
'मनगटात दम असेल तर कामाने मोठे व्हा', जानकरांना महिला नेत्याचा सल्ला
'मनगटात दम असेल तर कामाने मोठे व्हा', जानकरांना महिला नेत्याचा सल्ला.
'शरद पवार गटाकडून दादांना मिसकॉल येतात', NCP च्या आमदाराचा गौप्यस्फोट
'शरद पवार गटाकडून दादांना मिसकॉल येतात', NCP च्या आमदाराचा गौप्यस्फोट.
'बाप-लेकीला सोडा अन्...', शरद पवारांच्या खासदारांना कोणाचा प्रस्ताव?
'बाप-लेकीला सोडा अन्...', शरद पवारांच्या खासदारांना कोणाचा प्रस्ताव?.
दादर स्टेशनवर तरूणीचे कापले केस, काढला पळ; माथेफिरूला पोलिसांकडून अटक
दादर स्टेशनवर तरूणीचे कापले केस, काढला पळ; माथेफिरूला पोलिसांकडून अटक.
फेसबूक अन् इंस्टाग्राम वापरताय? आता होणार मोठा बदल, झुकेरबर्ग म्हणाला
फेसबूक अन् इंस्टाग्राम वापरताय? आता होणार मोठा बदल, झुकेरबर्ग म्हणाला.