AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भारतीयांच्या पसंतीस उतरलेली Mahindra ची SUV नव्या अवतारात लाँच होणार

बोलेरो ही भारतातील महिंद्राची सर्वाधिक विक्री होणारी चारचाकी गाडी आहे. तथापि, सध्या देशात बोलेरोशी स्पर्धा करु शकेल अशी कार उपलब्ध नाही.

भारतीयांच्या पसंतीस उतरलेली Mahindra ची SUV नव्या अवतारात लाँच होणार
Bolero 2021
Follow us
| Updated on: May 09, 2021 | 3:54 PM

मुंबई : महिंद्रा लवकरच XUV700 ही कार लाँच करणार आहे. याबाबत Mahindra कंपनीने काही दिवसांपूर्वी माहिती जाहीर केली होती. त्यानंतर आता कंपनी नवीन 2021 बोलेरो युटिलिटी व्हीकल (2021 Mahindra Bolero Utility Vehicle) लाँच करण्याचीही तयारी करत आहे. भारतीय कार निर्माता कंपनी Mahindra ने कोणताही गाजावाजा न करता नवीन बोलेरोवर काम सुरु केलं आहे. (Mahindra to launch new 2021 Mahindra Bolero soon)

2021 Mahindra Bolero या कारचं अद्ययावत (अपडेटेड) मॉडेल आतापर्यंत बर्‍याच वेळा पाहिले गेले आहे. लेटेस्ट अपडेट्सनुसार, नवीन बोलेरो ड्युअल टोन पेंट थीमसह लाँच केली जाऊ शकते, ज्यात रेड बॉडी कलर स्कीम देखील समाविष्ट असेल. त्यामध्ये ग्राहकांना सिल्व्हर कलर ट्रीटमेंट देखील मिळणार आहे, जे फ्रंट ग्रिलवर असेल आणि पुढच्या बाजूला फ्रंट बम्पर असेल.

दमदार इंजिन

आपण यामधील आणखी काही डिझाईन्सबद्दल बोलायचे झाल्यास नवीन बोलेरो हेडलॅम्प्स, फॉग लाईट्स आणि बॉडी कलर ORVM’s मध्ये बदल केले जातील. अंडर द हुड नवीन महिंद्रा बोलेरो बीएस 6 कंप्लाएंट 1.5 लीटर, तीन सिलेंडर, mHawk डिझेल इंजिनसह येईल. यात 75bhp मॅक्झिमम पॉवर आणि पीक टॉर्क 210Nm इतकं असेल. त्याचबरोबर यामध्ये 5 स्पीड मॅन्युअल ट्रान्समिशन देखील दिले जाईल.

बाजारात वर्चस्व

बोलेरो ही भारतातील महिंद्राची सर्वाधिक विक्री होणारी चारचाकी गाडी आहे. तथापि, सध्या देशात बोलेरोशी स्पर्धा करु शकेल अशी दुसऱ्या कोणत्याही कंपनीची कार उपलब्ध नाही. त्यातल्या त्यात मारुती अर्टिंगा (Maruti Suzuki Ertiga) आणि रेनो ट्रायबर (Renault Triber) या दोन कार या विभागात मोडतात. परंतु त्यांची थेट बोलेरोशी स्पर्धा नाही.

नव्या बोलेरोची किंमत किती?

बोलेरोची किंमत 8.40 लाख ते 9.39 लाख रुपयांपर्यंत आहे. अशा परिस्थितीत नवीन मॉडेलची किंमत थोडी जास्त असू शकते, जी 8.50 लाख रुपयांपासून सुरू होऊ शकते. 2021 मध्ये महिंद्रा अनेक उत्तम वाहनं लाँच करण्याचा सपाटा लावणार आहे. नवीन बोलेरो व्यतिरिक्त, या यादीत XUV700 समाविष्ट आहे. या व्यतिरिक्त, ग्राहक न्यू जनरेशन स्कॉर्पिओ, बोलेरो निओ आणि बर्‍याच इलेक्ट्रिक कार देखील लाँच करु शकते. तथापि, अद्याप या वाहनांचे पदार्पण कधी होणार याबाबतची कोणतीही माहिती जाहीर करण्यात आलेली नाही.

संबंधित बातम्या

प्रतीक्षा संपली! ऑक्टोबर 2021 मध्ये लाँच होणार Mahindra XUV700, कशी असेल नवी SUV?

कोरोनाविरुद्धच्या लढ्यात Mahindra कंपनी मैदानात, राज्यात Oxygen on Wheels सेवा सुरु

(Mahindra to launch new 2021 Mahindra Bolero soon)