Mahindra ट्रॅक्टरची चक्क Thar बनवून टाकली! आनंद महिंद्राना चकित करणारा तो ‘इंजिनियर’ कोण?
आपल्या देशात ऑटो लव्हर्स, इंजिनियर्स आणि जुगाडू लोकांची कमी नाही. ही माणसं आपल्या आवडीची, आपल्याला हवी तशी वाहनं चालवणं पसंत करतात. अनेकदा हे लोक आपल्या गाड्या कस्टमाईज करतात, किंवा आपली गाडी इतरांपेक्षा वेगळी कशी दिसेल असाही प्रयत्न करतात. असाच एक अवली माणूस मेघालयमध्ये पाहायला मिळाला आहे.
मुंबई : आपल्या देशात ऑटो लव्हर्स, इंजिनियर्स आणि जुगाडू लोकांची कमी नाही. ही माणसं आपल्या आवडीची, आपल्याला हवी तशी वाहनं चालवणं पसंत करतात. अनेकदा हे लोक आपल्या गाड्या कस्टमाईज करतात, किंवा आपली गाडी इतरांपेक्षा वेगळी कशी दिसेल असाही प्रयत्न करतात. असाच एक अवली माणूस मेघालयमध्ये पाहायला मिळाला आहे. या माणसाने महिंद्रा (Mahindra) चा एक ट्रॅक्टर महिंद्रा थारसारख्या (Mahindra Thar) दिसणाऱ्या कारमध्ये कन्व्हर्ट केला आहे. विशेष म्हणजे महिंद्रा ग्रुपचे चेअरमन आनंद महिंद्रा (Anand Mahindra) यांनी आपल्या ट्विटर अकाउंटवर या कारचे फोटो शेअर केले आहेत. महिंद्रा ट्रॅक्टर, कृषी आणि शेतीसाठी उपयोगी मशीनरी बनवण्यासाठी महिंद्रा ग्रुपचा एक डेडीकेटेड विभाग आहे. तुम्ही फोटोत पाहताय ती गाडी म्हणजे कस्टमाइज व्हीकल महिंद्रा 275 डीआय टीयू ट्रॅक्टर (Mahindra 275 DI TU Tractor) पासून बनवली आहे.
महिंद्रा थार ट्रॅक्टरचं डिझाईन
39 hp पावर ऑउटपुट देण्यास सक्षम असलेला हा कंपनीचा सर्वात जास्त विकल्या जाणाऱ्या ट्रॅक्टर्सपैकी एक आहे, जो शेती आणि वाहतूक या दोन्ही कामांसाठी योग्य आहे. थारसारख्या ट्रॅक्टरच्या डिझाईनबद्दल सांगायचे तर, या ट्रॅक्टरमधील पुढची लहान चाकं आणि मागची मोठी चाकं हा ट्रॅक्टर वेगळ्या थारसारखा दिसतो. मालकाने ट्रॅक्टरवर एक केबिन कस्टमाइज केली आहे. ट्रॅक्टरच्या पुढच्या आणि मागच्या बाजूला बॅलेन्स केबिन बनवण्यात आली आहे. तसेच वाहनाच्या पुढील बाजूस कस्टमाइज्ड दरवाजा मिळतो.
केबिनमध्ये फ्रंट विंडशील्ड आणि ड्रायव्हर साइड, फ्रंट पॅसेंजर साइड विंडोदखील फिट करण्यात आली आहे. कारचा फ्रंट फेशिया मूळ ट्रॅक्टरसारखा आहे. यामध्ये एक फ्रंट बंपर जोडण्यात आलं आहे. कस्टमाइज ट्रॅक्टरमध्ये महिंद्रा थारसारखे फ्रंट व्हील कव्हरदेखील आहे. तसेच यात साइड टर्निंग इंडिकेटर्सदेखील आहेत. फोटोमध्ये कारचा मागचा भाग दिसत नाही, परंतु पुढच्या बाजूचे फोटो पाहून असं वाटतंय की, यामध्ये एक सॉफ्ट टॉप मिळेल. जे रिमूव्ह करता येईल. या ट्रॅक्टरमध्ये काही मेकॅनिकल बदल केलेत की नाही, याबाबत कोणतीही माहिती मिळालेली नाही.
Now that’s a strange looking beast…But it looks like a loveable character from a Disney animated film! https://t.co/JBR25yeXKD
— anand mahindra (@anandmahindra) February 22, 2022
इतर बातम्या
आता इलेक्ट्रिक गाड्यांमधल्या बॅटरी रिसायकल होणार, Ford आणि Volvo ने सुरु केली स्टार्टअप कंपनी
BMW ची इलेक्ट्रिक Mini Cooper SE भारतात लाँचिंगसाठी सज्ज, कशी असेल नवीन EV?