कोरोना काळातही Mahindra च्या ‘या’ कारची घोडदौड सुरुच, बुकिंग्सचे रेकॉर्ड मोडीत
प्रत्येक मोठी कंपनी कॉम्पॅक्ट एसयूव्हींवर लक्ष केंद्रित करीत आहे, कारण ग्राहक आता या सेगमेंटकडे वळले आहेत. (Mahindra XUV 300)
मुंबई : कार खरेदी करण्याच्या बाबतीत भारतीय ग्राहकांची टेस्ट आता हळू हळू बदलत आहे. पूर्वी, भारतीय ग्राहकांना हॅचबॅक कार आवडत होत्या, आता मात्र ग्राहकांनी कॉम्पॅक्ट एसयूव्ही पसंत करण्यास सुरवात केली आहे. आता प्रत्येक मोठी कंपनी कॉम्पॅक्ट एसयूव्हींवर लक्ष केंद्रित करीत आहे, कारण ग्राहक आता या सेगमेंटकडे वळले आहेत. या सेगमेंटमध्ये एक असे वाहन आहे, ज्या वाहनाला देशात मोठी पसंती मिळत आहे. महिंद्रा एक्सयूव्ही 300 (Mahindra XUV300) असे या कारचे नाव आहे. (Mahindra XUV 300 breaking all records for getting more Bookings)
2021 मध्ये या कारच्या बुकिंगमध्ये 90 टक्क्यांनी वाढ झाली आहे. आकडेवारीनुसार, दरमहा सुमारे 6000 युनिट्स बुक केल्या जातात. या बुकिंगमध्ये बहुतेक ग्राहक पेट्रोल व्हेरिएंट निवडत असल्याचे निदर्शनास आले आहे. 48 टक्के ग्राहकांनी पेट्रोल व्हेरिएंटला पसंती दर्शवली आहे. दरम्यान, या वाहनाची लोकप्रियता इतकी वाढली आहे की या कारसाठीचा प्रतीक्षा कालावधी (वेटिंग पीरियड) 12 महिने इतका झाला आहे.
ग्राहकही या वाहनाला सर्वाधिक पसंती देत आहेत, कारण यात ग्राहकांना पेट्रोल आणि डिझेल इंजिनसह ऑटोमॅटिक आणि मॅन्युअल पर्यायही मिळतात. म्हणजेच, जर आपण ही कार खरेदी करण्याचा विचार करीत असाल तर हा निर्णय तुमच्यासाठी योग्य ठरेल, कारण यामध्ये तुम्हाला बरेच पर्याय मिळतील.
फीचर्स
वाहनाच्या फीचर्सविषयी बोलायचे झाल्यास, पेट्रोल व्हेरियंटमध्ये 1.2 लीटर क्षमतेचे टर्बो पेट्रोल इंजिन मिळते जे 109bhp पॉवर आणि 200nm टॉर्क देतं. त्याच वेळी, 1.5 लीटर टर्बो इंजिन देण्यात आलं आहे, जे 117hp पॉवर आणि 300nm टॉर्क देतं. वाहनाची सुरूवातीची किंमत 7.96 लाख रुपये आहे, या कारच्या टॉप व्हेरिएंटची किंमत 12.94 लाख रुपये इतकी आहे.
महिंद्रा 5-डोर थारसह 9 वाहनं लाँच करणार
दरम्यान, महिंद्रा अँड महिंद्राने अखेर पुष्टी केली आहे की, कंपनी न्यू जनरेशन थारचं (Mahindra Thar) 5-डोर व्हेरिएंट लाँच करणार आहे. वित्तीय वर्ष 2021 साठी कंपनीच्या चौथ्या तिमाहीचा निकाल जाहीर करण्यासाठी कंपनीने ऑनलाईन मीडिया ब्रीफिंगचं आयोजन केलं होतं. दरम्यान, महिंद्राने जाहीर केलं आहे की, कंपनी 2026 पर्यंत नऊ नवीन उत्पादने लाँच करणार आहे आणि 5-डोर थार हे त्यापैकीच एक उत्पादन असेल.
5-डोर थारच्या लाँचिंगची नेमकी तारीख अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही, परंतु कंपनीने याची पुष्टी केली आहे की नवीन महिंद्रा थार 5-डोर मॉडेल 2023 आणि 2026 च्या दरम्यान लाँच केलं जाईल. या काळात कंपनी न्यू जनरेशन महिंद्रा बोलेरो, बॉर्न ईव्ही प्लॅटफॉर्मवर बेस्ड काही इलेक्ट्रिक वाहनं, न्यू जनरेशन एक्सयूव्ही 300 आणि दोन नवीन मॉडेल्स लाँच करु शकतं. W620 आणि V201 अशी या दोन मॉडेल्सची नावं आहेत.
इतर बातम्या
Mahindra 9 शानदार SUV आणि MPV लाँच करणार, Scorpio, Bolero सह XUV 700 चा समावेश
धमाकेदार फीचर्ससह सर्वात स्वस्त मायक्रो SUV Tata HBX भारतात लाँच होणार
Wagon R EV : टोयोटाची इलेक्ट्रिक कार भारतात लाँचिंगसाठी सज्ज, जाणून घ्या काय असेल खास?
(Mahindra XUV 300 breaking all records for getting more Bookings)