Mahindra XUV700 क्रॅश टेस्टमध्ये पास की नापास? तुफान विक्री होत असलेली कार किती सुरक्षित?

75,000 हून अधिक बुकिंगसह ब्लॉकबस्टर ठरलेल्या नवीन Mahindra XUV700 ने आता टॉप सेफ्टी स्कोअर करुन ग्राहकांचे लक्ष वेधून घेतले आहे. प्रौढांच्या सुरक्षिततेसाठी XUV700 ने 17 पैकी 16.03 गुण मिळवून 5 स्टार रेटिंग मिळवलं आहे.

Mahindra XUV700 क्रॅश टेस्टमध्ये पास की नापास? तुफान विक्री होत असलेली कार किती सुरक्षित?
Follow us
| Updated on: Nov 11, 2021 | 12:05 PM

मुंबई : भारतीय ग्राहक गेल्या काही वर्षांपासून गाडी खरेदी करताना आपल्या आणि वाहनाच्या सुरक्षिततेचा (Car Safety) अधिक विचार करत आहेत. प्रत्येक ग्राहक त्याची ड्रिम कार किती सुरक्षित आहे, याचा विचार हमखास करतो. जगभरात अशा अनेक कंपन्या आहेत ज्या वाहनं बनवताना केवळ तिच्या लुक्स आणि फिचर्सचाच विचर न करता कारच्या सुरक्षिततेचाही खूप विचार करतात. परंतु काही कंपन्या अशाही आहेत ज्यांच्या कार बाहेरुन दमदार दिसतात, परंतु मजबुती आणि सुरक्षिततेच्या बाबतीत मागे पडतात. (Mahindra XUV700 gets 5-star adult safety rating in Global NCAP crash test)

दरम्यान, 75,000 हून अधिक बुकिंगसह ब्लॉकबस्टर ठरलेल्या नवीन Mahindra XUV700 ने आता टॉप सेफ्टी स्कोअर करुन ग्राहकांचे लक्ष वेधून घेतले आहे. प्रौढांच्या सुरक्षिततेसाठी XUV700 ने 17 पैकी 16.03 गुण मिळवून 5 स्टार रेटिंग मिळवलं आहे. 2014 नंतर चाचणी केलेल्या भारतीय बनावटीच्या वाहनांमध्ये ही कार सुरक्षिततेच्या बाबतीत सर्वोत्तम ठरली आहे.

कारच्या स्ट्रक्चरला देखील स्टेबल रेटिंग दिले गेले आहे. टेस्टिंगदरम्यान, पुढच्या प्रवाशांना झालेल्या संभाव्य दुखापती देखील किरकोळ आहेत आणि क्रॅश टेस्ट डमी इंजरी एनालिसिसवर कोणताही नारंगी किंवा लाल रंग न दिसणे चांगले आहे. महिंद्रा XUV700 ने लहान मुलांच्या सुरक्षेसाठी सर्वाधिक 49 पैकी 41.66 गुण मिळवून आतापर्यंतचा सर्वोच्च स्कोअर देखील मिळवला आहे.

XUV700 या कारची किंमत 19.79 लाख रुपये आहे. महिंद्रा 1.8 लाख रुपयांच्या अतिरिक्त पेमेंटवर AX7 ऑटोमॅटिकसह लक्झरी पॅक ऑफर करेल. AX7 डिझेल ऑटोमॅटिकसह AWD व्हेरिएंट देखील उपलब्ध आहे. त्याची किंमत 1.3 लाख रुपये अधिक असेल.

फीचर्स

XUV700 चे आतील लेआउट उत्तम आहे, सॉफ्ट-टच मटेरियल आणि क्रोम अॅक्सेंटचा वापर केबिनला आणखी उत्कृष्ट बनवतो. मध्यभागी 10.25 इंचांची टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम उपलब्ध आहे. XUV700 मध्ये सोनी 3D साउंड सिस्टीम, पुश-बटन स्टार्ट/स्टॉप, केबिन एअर फिल्टर, अॅम्बियंट लायटिंग, ड्युअल-झोन ऑटोमॅटिक एसी, पॉवर्ड फ्रंट सीट, मल्टी-फंक्शन स्टीयरिंग व्हील, क्रूझ कंट्रोल आणि पॅनारोमिक सनरूफ सारखे फीचर्स यात आहेत.

एसयूव्ही कनेक्टेड कार टेक्नोलॉजी आणि अमेझॉन अलेक्सा कॉम्पॅटिबिलिटीसाठी अॅड्रेनॉक्स सूट सादर करते. जे व्हॉईस कमांड वापरून सनरूफ ऑपरेट करू शकते. XUV700 चार ड्रायव्हिंग मोडसह येते, ज्यात Zip, Zap, Zoom आणि Custom मोड्सचा समावेश आहे. XUV700 चे एक स्मार्ट वैशिष्ट्य म्हणजे एंट्रीसाठी पुढील सीट आपोआप मागे घेतली जाते.

सेफ्टी फीचर्स

XUV700 मध्ये फ्रंट आणि साइड एअरबॅग्स, ABS, EBD, हिल-होल्ड कंट्रोल, इलेक्ट्रॉनिक स्टेबिलिटी प्रोग्राम, रिव्हर्सिंग कॅमेरा, 360 डिग्री साराऊंड व्ह्यू इत्यादी सेफ्टी फीचर्स मिळतात. यासह, एसयूव्हीला ऑटो-बूस्टर हेडलॅम्प (जे ऑटोमॅटिक रुपात हेडलॅम्प्स थ्रो आणि इंटेन्सिटी वाढवतात.), ड्रायव्हर स्लीप डिटेक्शन, पर्सनल सिक्योरिटी अलर्ट सारख्या अनेक सेगमेंट-फर्स्ट सेफ्टी फीचर्स देखील यात देण्यात आले आहेत.

इंजिन

XUV700 टर्बो पेट्रोल इंजिन आणि डिझेल पॉवरप्लांटच्या निवडीसह उपलब्ध आहे. पेट्रोल युनिट 2.0 लीटर mStallion युनिट आहे, जे नवीन थार मध्ये उपलब्ध आहे. हे इंजिन 198 bhp पॉवर आणि 380 Nm टॉर्क जनरेट करते. डिझेल इंजिन mHawk इंजिन आहे जे 182 बीएचपी पॉवर आणि 450 एनएम टॉर्क जनरेट करते. ही दोन्ही इंजिन 6 स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्स आणि 6-स्पीड टॉर्क कन्व्हर्टर ऑटोमॅटिक ट्रान्समिशनच्या पर्यायासह उपलब्ध आहेत. XUV700 मध्ये 4X4 पॉवरट्रेनचा पर्याय देखील आहे.

इतर बातम्या

कावासकीने भारतात लॉन्च केली मोटरसायकल, जाणून घ्या किती आहे या बाईकची किंमत

ऑलिम्पियन सुमित अंतिलला महिंद्राचं शानदार गिफ्ट, XUV700 ची पहिली Javelin Gold Edition भेट

PHOTO | ही आहे जगातील पहिली इलेक्ट्रिक टू-सीटर फॉर्म्युला रेस कार, जाणून घ्या काय आहे खास

(Mahindra XUV700 gets 5-star adult safety rating in Global NCAP crash test)

...तर धनंजय मुंडेंना रस्त्यावर फिरू देणार नाही, जरांगेंचा सभेतून इशारा
...तर धनंजय मुंडेंना रस्त्यावर फिरू देणार नाही, जरांगेंचा सभेतून इशारा.
लाडक्या बहिणीचे पैसे लेकाला! चूक मान्य, पैसे केले परत, मात्र पुन्हा...
लाडक्या बहिणीचे पैसे लेकाला! चूक मान्य, पैसे केले परत, मात्र पुन्हा....
'लई अवघड हाय...', मिटकरींकडून फोटो शेअर अन् बजरंग सोनावणेंवर निशाणा
'लई अवघड हाय...', मिटकरींकडून फोटो शेअर अन् बजरंग सोनावणेंवर निशाणा.
बीड हत्येतील तिन्ही फरार आरोपी दोन दिवस भिवंडीत अन् नंतर...
बीड हत्येतील तिन्ही फरार आरोपी दोन दिवस भिवंडीत अन् नंतर....
नारायण राणेंची 45 लाखांची फसवणूक? पोलिसांकडून चौघांना अटक, प्रकरण काय?
नारायण राणेंची 45 लाखांची फसवणूक? पोलिसांकडून चौघांना अटक, प्रकरण काय?.
रत्नागिरीचं पालकमंत्रीपद उदय सामंत यांना मिळणार, भाजपची सहमती?
रत्नागिरीचं पालकमंत्रीपद उदय सामंत यांना मिळणार, भाजपची सहमती?.
संतोष देशमुख हत्याकाडांचा मास्टरमाईंड कोण? NCPच्या आमदारानं नावच घेतलं
संतोष देशमुख हत्याकाडांचा मास्टरमाईंड कोण? NCPच्या आमदारानं नावच घेतलं.
दादांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न? बजरंग सोनावणेंचा मोठा दावा काय?
दादांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न? बजरंग सोनावणेंचा मोठा दावा काय?.
बीड सरपंचाच्या हत्येची टीप देणाऱ्यासह 3 फरार आरोपींपैकी दोघांना बेड्या
बीड सरपंचाच्या हत्येची टीप देणाऱ्यासह 3 फरार आरोपींपैकी दोघांना बेड्या.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात एका डॉक्टरलाच अटक, त्याची भूमिका काय?
संतोष देशमुख हत्या प्रकरणात एका डॉक्टरलाच अटक, त्याची भूमिका काय?.