प्रतीक्षा संपली! ऑक्टोबर 2021 मध्ये लाँच होणार Mahindra XUV700, कशी असेल नवी SUV?

भारतीय वाहन निर्माता कंपनी महिंद्रा अँड महिंद्राने आपली नवीन एसयूव्ही Mahindra XUV700 च्या लाँचिंगबाबत खुलासा केला आहे.

प्रतीक्षा संपली! ऑक्टोबर 2021 मध्ये लाँच होणार Mahindra XUV700, कशी असेल नवी SUV?
Mahindra Xuv700
Follow us
| Updated on: May 04, 2021 | 4:17 PM

मुंबई : भारतीय वाहन निर्माता कंपनी महिंद्रा अँड महिंद्राने (Mahindra & Mahindra) आपली नवीन एसयूव्ही महिंद्रा एक्सयूव्ही 700 (SUV Mahindra XUV700) च्या लाँचिंगबाबत खुलासा केला आहे. ही कंपनीच्या लोकप्रिय मिड-साइज एसयूव्ही एक्सयूव्ही 500 (XUV500) ची अपडेटेड आवृत्ती आहे. कंपनीने त्यांच्या वेबसाइटवर एक वेबपेज देखील तयार केले आहे. यासह कंपनीने या कारची लाँचिंग डेट देखील जाहीर केली आहे. कंपनी Mahindra XUV700 ही कार ऑक्टोबर 2021 मध्ये भारतात लाँच करणार आहे. (Mahindra XUV700 is going to launch in October 2021; know features)

आज आम्ही तुम्हाला महिंद्रा एक्सयूव्ही 700 (Mahindra XUV700) च्या काही खास गोष्टींबद्दल सांगणार आहोत, जेणेकरून तुम्हाला ही एसयूव्ही किती खास असेल याची कल्पना येऊ शकेल. या व्यतिरिक्त तुम्हाला या कारमधील सर्व वैशिष्ट्यांविषयीदेखील माहिती मिळेल. चला तर या कारबद्दल सर्व काही जाणून घेऊया…

पूर्णपणे नवं डिझाईन

महिंद्रा एक्सयूव्ही 700 (XUV700) पूर्णपणे नवीन स्टाईलसह सादर केली जाईल. तरी यामधील काही गोष्टी एक्सयूव्ही 500 (XUV500) सारख्याच असतील. या कारमध्ये एक नवीन ग्रिल, युनिक LED DRLs सह नवीन सी-शेप्ड हेडलाइट, नवीन टेललाईट, नवीन अलॉय व्हील डिझाईन आणि रिस्टाइल्ड बोनेट, बंपर्स आणि टेलगेट मिळेल. तसेच या कारच्या डोर हँडल्समध्येदेखील बदल केले जाणार आहेत. या कारमध्ये फ्लश माउंटेड लीवर्स मिळतील ज्यामुळे या कारला मॉडर्न लुक मिळतो.

शानदार फीचर्सने सुसज्ज

आपल्या कारला तिच्या सेगमेंटमध्ये सर्वाधिक पसंती मिळावी, यासाठी कंपनी त्यात अनेक कमालीचे फीचर्स देत आहे. ज्यामध्ये ड्युअल स्क्रीन लेआउट उपलब्ध असेल, ज्यामध्ये एक इन्फोटेन्मेंट आणि दुसरी इन्स्ट्रुमेंट क्लस्टरसाठी. असे फीचर्स मर्सिडीजच्या मॉडेल्समध्ये उपलब्ध आहेत. यासह, यात अँड्रॉइड ऑटो आणि Apple कार प्ले सपोर्ट, ऑटोमॅटिक क्लायमेट कंट्रोल, इलेक्ट्रॉनिक पार्किंग ब्रेक, हिल होल्ड (ऑटोमॅटिक व्हेरिएंटसाठी), वेगवेगळे ड्राइव्ह मोड्स आणि पॅनारोमिक सनरूफसारखे फीचर्स मिळतील. ही कार 6 आणि 7 सीट्सच्या दोन लेआउटमध्ये सादर केली जाईल.

या कारच्या सेफ्टी फीचर्सवषयी बोलायचे झाल्यास, यामध्ये हाय ट्रिम्समध्ये लेव्हल 2 ऑटोनॉमस ड्रायव्हिंग असिस्ट सिस्टम (ADAS) मिळेल. ही सिस्टम या कारच्या टॉप ट्रिम्समध्ये मिळेल. या सेगमेंटमधील कारमध्ये हे फीचर मिळण्याची ही पहिलीच वेळ असू शकते. तसेच ADAS मुळे तुम्हाला अ‍ॅडॉप्टिव्ह क्रूझ कंट्रोल आणि लेन-कीपिंग असिस्ट असे फीचर्स मिळतील.

Mahindra XUV500 पेक्षा मोठी असेल SUV

या कारच्या डायमेंशनबद्दल बोलायचे झाल्यास नवीन XUV700 मध्ये मोटा व्हीलबेस मिळेल. ही कार सध्याच्या XUV500 पेक्षा मोठी असेल. कंपनीने या कारच्या चेचिसवर खूप काम केलं आहे. तसेच या कारचा ड्रायव्हिंग एक्सपीरियन्स अजून चांगला होईल, याकडे लक्ष दिलं आहे. मोठा व्हीलबेस आणि रुंद बॉडी स्ट्रक्चरमुळे कारमध्ये मोठी केबिन स्पेस मिळेल. त्यामुळे सेकेंड आणि थर्ड रोमधील सीट्सवर बसणाऱ्या प्रवाशांना त्याचा फायदा मिळेल.

इतर बातम्या 

कोरोना रुग्णांसाठी Hyundai India कडून 20 कोटी रुपयांचं मदत पॅकेज, महाराष्ट्रासह पाच राज्यांना लाभ

वाहन धारकांसाठी खूशखबर! रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट ट्रान्सफर करणे झाले सोपे

(Mahindra XUV700 is going to launch in October 2021; know features)

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.