Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Mahindra XUV700 बाजारात, जाणून घ्या कधीपासून सुरु होणार बुकिंग्स?

महिंद्राने (Mahindra) भारतीय बाजारात अधिकृतपणे ऑल न्यू XUV700 लाँच केली आहे. कार निर्मात्या कंपनीने ऑगस्टमध्ये ऑल न्यू XUV700 ची किंमत जाहीर केली होती.

Mahindra XUV700 बाजारात, जाणून घ्या कधीपासून सुरु होणार बुकिंग्स?
Mahindra XUV700
Follow us
| Updated on: Oct 05, 2021 | 7:06 PM

मुंबई : महिंद्राने (Mahindra) भारतीय बाजारात अधिकृतपणे ऑल न्यू XUV700 लाँच केली आहे. कार निर्मात्या कंपनीने ऑगस्टमध्ये ऑल न्यू XUV700 ची किंमत जाहीर केली होती. मात्र, सर्व व्हेरिएंटच्या किंमती जाहीर करण्यात आल्या नव्हत्या. मात्र आता महिंद्राने XUV700 च्या सर्व व्हेरिएंटच्या किंमती जाहीर केल्या आहेत. ऑल न्यू Mahindra XUV700 AX आणि MX अशा दोन ग्रुप्समध्ये उपलब्ध आहे. MX सिरीज 11.99 लाख रुपयांपासून तर AdrenoX सिरीज 15.59 लाख रुपयांपासून सुरू होते. (Mahindra XUV700 launched, know when bookings will start?)

सर्वात महाग व्हेरिएंट असलेली AX7 (7-सीटर) देखील ग्राहकांच्या पसंतीस उतरेल, असा कंपनीला विश्वास आहे, या कारची किंमत 19.79 लाख रुपये आहे. महिंद्रा 1.8 लाख रुपयांच्या अतिरिक्त पेमेंटवर AX7 ऑटोमॅटिकसह लक्झरी पॅक ऑफर करेल. AX7 डिझेल ऑटोमॅटिकसह AWD व्हेरिएंट देखील उपलब्ध आहे. त्याची किंमत 1.3 लाख रुपये अधिक असेल.

7 ऑक्टोबरपासून ग्राहक नवीन महिंद्रा XUV700 बुक करू शकतात. टेस्ट ड्राइव्ह दोन टप्प्यांत सुरू होईल ज्यात वेगवेगळ्या शहरांचा समावेश असेल. टेस्ट ड्राइव्हचा पहिला टप्पा 2 ऑक्टोबरपासून सुरू झाला आहे, तर दुसऱ्या टप्प्यात टेस्ट ड्राइव्ह 7 ऑक्टोबरपासून इतर शहरांमध्ये सुरू होईल. महिंद्रा ने ऑगस्ट मध्ये XUV700 चे उत्पादन सुरू केले. तथापि, वाहन वितरणाची तारीख अद्याप उघड झालेली नाही. महिंद्रा पुढील महिन्याच्या अखेरीस डिलिव्हरी सुरू करण्याची शक्यता आहे.

फीचर्स

XUV700 चे आतील लेआउट उत्तम आहे, सॉफ्ट-टच मटेरियल आणि क्रोम अॅक्सेंटचा वापर केबिनला आणखी उत्कृष्ट बनवतो. मध्यभागी 10.25 इंचांची टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम उपलब्ध आहे. XUV700 मध्ये सोनी 3D साउंड सिस्टीम, पुश-बटन स्टार्ट/स्टॉप, केबिन एअर फिल्टर, अॅम्बियंट लायटिंग, ड्युअल-झोन ऑटोमॅटिक एसी, पॉवर्ड फ्रंट सीट, मल्टी-फंक्शन स्टीयरिंग व्हील, क्रूझ कंट्रोल आणि पॅनारोमिक सनरूफ सारखे फीचर्स यात आहेत.

एसयूव्ही कनेक्टेड कार टेक्नोलॉजी आणि अमेझॉन अलेक्सा कॉम्पॅटिबिलिटीसाठी अॅड्रेनॉक्स सूट सादर करते. जे व्हॉईस कमांड वापरून सनरूफ ऑपरेट करू शकते. XUV700 चार ड्रायव्हिंग मोडसह येते, ज्यात Zip, Zap, Zoom आणि Custom मोड्सचा समावेश आहे. XUV700 चे एक स्मार्ट वैशिष्ट्य म्हणजे एंट्रीसाठी पुढील सीट आपोआप मागे घेतली जाते.

सेफ्टी फीचर्स

XUV700 मध्ये फ्रंट आणि साइड एअरबॅग्स, ABS, EBD, हिल-होल्ड कंट्रोल, इलेक्ट्रॉनिक स्टेबिलिटी प्रोग्राम, रिव्हर्सिंग कॅमेरा, 360 डिग्री साराऊंड व्ह्यू इत्यादी सेफ्टी फीचर्स मिळतात. यासह, एसयूव्हीला ऑटो-बूस्टर हेडलॅम्प (जे ऑटोमॅटिक रुपात हेडलॅम्प्स थ्रो आणि इंटेन्सिटी वाढवतात.), ड्रायव्हर स्लीप डिटेक्शन, पर्सनल सिक्योरिटी अलर्ट सारख्या अनेक सेगमेंट-फर्स्ट सेफ्टी फीचर्स देखील यात देण्यात आले आहेत.

इंजिन

XUV700 टर्बो पेट्रोल इंजिन आणि डिझेल पॉवरप्लांटच्या निवडीसह उपलब्ध आहे. पेट्रोल युनिट 2.0 लीटर mStallion युनिट आहे, जे नवीन थार मध्ये उपलब्ध आहे. हे इंजिन 198 bhp पॉवर आणि 380 Nm टॉर्क जनरेट करते. डिझेल इंजिन mHawk इंजिन आहे जे 182 बीएचपी पॉवर आणि 450 एनएम टॉर्क जनरेट करते. ही दोन्ही इंजिन 6 स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्स आणि 6-स्पीड टॉर्क कन्व्हर्टर ऑटोमॅटिक ट्रान्समिशनच्या पर्यायासह उपलब्ध आहेत. XUV700 मध्ये 4X4 पॉवरट्रेनचा पर्याय देखील आहे.

इतर बातम्या

डुकाटीची शानदार सुपरस्पोर्ट 950 मोटारसायकल बाजारात, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स

बहुप्रतीक्षित Tata Punch भारतात लाँच, 21000 रुपये देऊन बुक करा शानदार मायक्रो एसयूव्ही

MG Astor लाँचिंगसाठी सज्ज, जाणून घ्या कसा असेल कारचा लूक, किंमत आणि फीचर्स

(Mahindra XUV700 launched, know when bookings will start?)

आमदाराच्या पीएच्या बायकोचा मंगेशकर रुग्णालयात मृत्यू, अहवालात काय?
आमदाराच्या पीएच्या बायकोचा मंगेशकर रुग्णालयात मृत्यू, अहवालात काय?.
हिंदुत्वावरून प्रफुल्ल पटेल अन संजय राऊत भिडले, रंग बदलला vs बाप बदलला
हिंदुत्वावरून प्रफुल्ल पटेल अन संजय राऊत भिडले, रंग बदलला vs बाप बदलला.
'तर बरं झालं असतं', राऊतांच्या 'त्या' टीकेवर प्रफुल्ल पटेलांचा पलटवार
'तर बरं झालं असतं', राऊतांच्या 'त्या' टीकेवर प्रफुल्ल पटेलांचा पलटवार.
पुण्यात गर्भवती महिलेचा मृत्यू, 'दीनानाथ मंगेशकर'च्या पाटीला काळं
पुण्यात गर्भवती महिलेचा मृत्यू, 'दीनानाथ मंगेशकर'च्या पाटीला काळं.
राज्यभरात अवकाळी पावसाचा हैदोस IMD कडून मुंबईसह 'या' जिल्ह्यांना अलर्ट
राज्यभरात अवकाळी पावसाचा हैदोस IMD कडून मुंबईसह 'या' जिल्ह्यांना अलर्ट.
दीनानाथ मंगेशकर रूग्णालयाबाहेर शिवसैनिक आक्रमक, घोषणाबाजीसह चिल्लर फेक
दीनानाथ मंगेशकर रूग्णालयाबाहेर शिवसैनिक आक्रमक, घोषणाबाजीसह चिल्लर फेक.
महिला मजूरांना घेऊन जाणारा ट्रॅक्टर विहिरीत अन्..नांदेडमध्ये काय घडलं?
महिला मजूरांना घेऊन जाणारा ट्रॅक्टर विहिरीत अन्..नांदेडमध्ये काय घडलं?.
'शिंदे, पवार तोंडाला पोपट बांधून फिरतात', संजय राऊत नेमकं काय म्हणाले?
'शिंदे, पवार तोंडाला पोपट बांधून फिरतात', संजय राऊत नेमकं काय म्हणाले?.
शरद पवार यांचा बाप...बापाच्याच पाठीत खंजीर; राऊतांच्या निशाण्यावर कोण?
शरद पवार यांचा बाप...बापाच्याच पाठीत खंजीर; राऊतांच्या निशाण्यावर कोण?.
'हा दलाल... माझ्या नादाला लागू नको, नाहीतर नागडा करीन मी...'- राऊत
'हा दलाल... माझ्या नादाला लागू नको, नाहीतर नागडा करीन मी...'- राऊत.