Mahindra XUV700 खरेदीचा विचार करताय? 1.5 वर्ष वाट पाहावी लागेल

Mahindra XUV700 ला भारतीय बाजारपेठेत प्रचंड मागणी आहे. त्यामुळे या कारचा प्रतीक्षा कालावधी (वेटिंग पीरियड) 1.5 वर्षांपेक्षा जास्त आहे. महिंद्राकडे सध्या 1.6 लाखांहून अधिक कारचा बॅकलॉग आहे.

Mahindra XUV700 खरेदीचा विचार करताय? 1.5 वर्ष वाट पाहावी लागेल
Mahindra XUV700
Follow us
| Updated on: Dec 21, 2021 | 9:32 PM

मुंबई : Mahindra XUV700 ला भारतीय बाजारपेठेत प्रचंड मागणी आहे. त्यामुळे या कारचा प्रतीक्षा कालावधी (वेटिंग पीरियड) 1.5 वर्षांपेक्षा जास्त आहे. महिंद्राकडे सध्या 1.6 लाखांहून अधिक कारचा बॅकलॉग आहे. व्हेरिएंट, इंजिन आणि गिअरबॉक्सवर अवलंबून प्रतीक्षा कालावधी कधी कमी होतो तर कधी वाढतो. (Mahindra XUV700 waiting period exceeds more than 1.5 years for many variants)

ऑल न्यू Mahindra XUV700 AX आणि MX अशा दोन ग्रुप्समध्ये उपलब्ध आहे. MX सिरीज 11.99 लाख रुपयांपासून तर AdrenoX सिरीज 15.59 लाख रुपयांपासून सुरू होते. सर्वात महाग व्हेरिएंट असलेली AX7 (7-सीटर) देखील ग्राहकांच्या पसंतीस उतरेल, असा कंपनीला विश्वास आहे, या कारची किंमत 19.79 लाख रुपये आहे. महिंद्रा 1.8 लाख रुपयांच्या अतिरिक्त पेमेंटवर AX7 ऑटोमॅटिकसह लक्झरी पॅक ऑफर करेल. AX7 डिझेल ऑटोमॅटिकसह AWD व्हेरिएंट देखील उपलब्ध आहे. त्याची किंमत 1.3 लाख रुपये अधिक आहे.

इतका प्रदीर्घ प्रतीक्षा कालावधी का?

सेमीकंडक्टरच्या कमतरतेमुळे कारच्या उत्पादनावर परिणाम होत आहे. दुसऱ्या बाजूला मागणी मात्र मोठी आहे, त्यामुळेच कारचा वेटिंग पीरियड अधिक आहे. हा वेटिंग पीरियड केवळ नवीन बुकिंगपुरता मर्यादित नाही, तर तो 7 ऑक्टोबर आणि 8 ऑक्टोबर रोजी केलेल्या पूर्वीच्या बुकिंगसाठी देखील लागू आहे.

महिंद्रा कंपनीसमोर 14,000 XUV700s 14 जानेवारी 2022 पर्यंत वितरित करण्याचे उद्दिष्ट आहे. कंपनीकडे सध्या XUV700 साठी 75,000 पेक्षा जास्त बुकिंग्स आहेत. परंतु मोठ्या वेटिंग पीरियडमुळे, बरेच लोक त्यांचे बुकिंग रद्द करून इतर कार निवडत आहेत. सेमीकंडक्टरच्या कमतरतेमुळे महिंद्राने आधीच 32,000 युनिट्सचे उत्पादन गमावले आहे.

शानदार फीचर्स

XUV700 चे आतील लेआउट उत्तम आहे, सॉफ्ट-टच मटेरियल आणि क्रोम अॅक्सेंटचा वापर केबिनला आणखी उत्कृष्ट बनवतो. मध्यभागी 10.25 इंचांची टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम उपलब्ध आहे. XUV700 मध्ये सोनी 3D साउंड सिस्टीम, पुश-बटन स्टार्ट/स्टॉप, केबिन एअर फिल्टर, अॅम्बियंट लायटिंग, ड्युअल-झोन ऑटोमॅटिक एसी, पॉवर्ड फ्रंट सीट, मल्टी-फंक्शन स्टीयरिंग व्हील, क्रूझ कंट्रोल आणि पॅनारोमिक सनरूफ सारखे फीचर्स यात आहेत.

एसयूव्ही कनेक्टेड कार टेक्नोलॉजी आणि अमेझॉन अलेक्सा कॉम्पॅटिबिलिटीसाठी अॅड्रेनॉक्स सूट सादर करते. जे व्हॉईस कमांड वापरून सनरूफ ऑपरेट करू शकते. XUV700 चार ड्रायव्हिंग मोडसह येते, ज्यात Zip, Zap, Zoom आणि Custom मोड्सचा समावेश आहे. XUV700 चे एक स्मार्ट वैशिष्ट्य म्हणजे एंट्रीसाठी पुढील सीट आपोआप मागे घेतली जाते.

सेफ्टी फीचर्स

XUV700 मध्ये फ्रंट आणि साइड एअरबॅग्स, ABS, EBD, हिल-होल्ड कंट्रोल, इलेक्ट्रॉनिक स्टेबिलिटी प्रोग्राम, रिव्हर्सिंग कॅमेरा, 360 डिग्री साराऊंड व्ह्यू इत्यादी सेफ्टी फीचर्स मिळतात. यासह, एसयूव्हीला ऑटो-बूस्टर हेडलॅम्प (जे ऑटोमॅटिक रुपात हेडलॅम्प्स थ्रो आणि इंटेन्सिटी वाढवतात.), ड्रायव्हर स्लीप डिटेक्शन, पर्सनल सिक्योरिटी अलर्ट सारख्या अनेक सेगमेंट-फर्स्ट सेफ्टी फीचर्स देखील यात देण्यात आले आहेत.

दमदार इंजिन

XUV700 टर्बो पेट्रोल इंजिन आणि डिझेल पॉवरप्लांटच्या निवडीसह उपलब्ध आहे. पेट्रोल युनिट 2.0 लीटर mStallion युनिट आहे, जे नवीन थार मध्ये उपलब्ध आहे. हे इंजिन 198 bhp पॉवर आणि 380 Nm टॉर्क जनरेट करते. डिझेल इंजिन mHawk इंजिन आहे जे 182 बीएचपी पॉवर आणि 450 एनएम टॉर्क जनरेट करते. ही दोन्ही इंजिन 6 स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्स आणि 6-स्पीड टॉर्क कन्व्हर्टर ऑटोमॅटिक ट्रान्समिशनच्या पर्यायासह उपलब्ध आहेत. XUV700 मध्ये 4X4 पॉवरट्रेनचा पर्याय देखील आहे.

इतर बातम्या

सिंगल चार्जवर 1000 किमी रेंज, Tesla ला टक्कर देण्यासाठी नवी इलेक्ट्रिक सेडान सज्ज

1.80 कोटी ग्राहकांच्या पसंतीस उतरलेल्या Toyota Hilux चं भारतीय रस्त्यांवर दर्शन, जानेवारी 2022 मध्ये बाजारात

5 लाखांहून कमी किंमतीत घरी आणा सेकेंड हँड SUV, Mahindra Thar सह अनेक पर्याय उपलब्ध

(Mahindra XUV700 waiting period exceeds more than 1.5 years for many variants)

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.