आणखी किती दिवस बायको, पोरांना उन्हातान्हात बाईकवरून फिरवणार? रिक्षाच्या किमतीमध्ये घरी आणा मारुतीची ही खास कार
मारुती सुझुकी आपल्या ग्रहकांना मोठं गिफ्ट देण्याच्या तयारीमध्ये आहे. आता तुम्ही अवघ्या 3 लाखांमध्ये तुमच्या नव्या कारचं स्वप्न पूर्ण करू शकणार आहात.

Maruti Suzuki Cervo : मारुती सुझुकी सर्वो ही एक अशी कार आहे, जी लवकरच भारतीय बाजारपेठेमध्ये ग्राहकांचं लक्ष आपल्याकडे वेधण्याची शक्यता आहे. छोट्या आणि किफायतशीर गाड्यांच्या किंमतीच्या श्रेणीमध्ये या कारचा समावेश होतो. कमी उत्पन्न असलेला मध्यम वर्गीय ग्राहक डोळ्यासमोर ठेवून मारुती सुझुकी या कारला भारताच्या मार्केटमध्ये आणण्याची तयारी करत आहे. या कारच्या इंजिनबाबत बोलायचं झाल्यास या कारमध्ये 658 सीसीचं पेट्रोल इंजिन मिळण्याची शक्यता आहे. ही कार एक लिटर पेट्रोलमध्ये 26 किलोमीटरचं मायलेज देऊ शकते, असा अंदाज वर्तवला जात आहे.
मारुती सुझुकी लवकरच भारतीय बाजारपेठेमध्ये ही कार आणू शकते. परवडणारी किंमत आणि चांगल्या फिचर्ससाठी ही कार ओळखी जाणार आहे. मारुती सुझुकीचं हे मॉडेल सुरुवातीला जपानमध्ये खूप लोकप्रिय होतं. आता लवकरच मारुती सुझुकी आपल्या या मॉडेलला भारतामध्ये लाँच करणार आहे. या कारला भारतामध्ये मोठा प्रतिसाद मिळू शकतो असा अंदाज वर्तवला जात आहे.
कारमध्ये काय -काय मिळणार?
मारुती सुझुकीच्या या मॉडेलमध्ये तुम्हाला 658 सीसीचं पेट्रोल इंजिन मिळणार आहे. या इंजिनची शक्ती ही 54 हॉर्सपावर इतकी असू शकते. हे एक छोटं मात्र शक्तिशाली इंजिन असणार आहे. तुम्ही जर शहरात कुठे प्रवास करणार असाल, जवळ एखादी ट्रीप काढणार असाल तर ही गाडी तुमच्यासाठी खूप फायद्याची ठरू शकते. मात्र दूरवरच्या प्रवासाठी या गाडीचा कितपत फायदा होईल हे सांगता येणार नाही. या कारला 5 स्पीड मॅन्यअल गेअरबॉक्स असणार आहेत. ही कार स्पेशली अशा लोकांसाठी लाँच करण्यात येणार आहे, ज्या लोकांना कमी किमतीमध्ये कार खरेदी करायची आहे.
या कारमध्ये अनेक खास फीचर्स मिळणार आहेत, ज्यामध्ये टचस्क्रीन इंफोटेनमेंट सिस्टीम, म्यूझिक सिस्टीम, नेव्हिगेशन मॅप, डिजिटल इंस्ट्रूमेंट क्लस्टर अशा सुविधा तुम्हाला मिळणार आहे. ही कार खूपच आरामदायी असणार आहे. विशेष म्हणजे या कारची किंमत खूपच कमी असणार आहे. 2.80 ते 3.20 लाखांमध्ये तुम्हाला ही कार मिळणार असून, या गाडीची ऑन रोड किंमत 3.50 लाखांपर्यंत जाऊ शकते.