मुंबई : भारतातील ऑटो निर्मात्या कंपन्यांनी नवीन वर्षात त्यांच्या वाहनांच्या किमती वाढवल्या आहेत. भारतातील सर्वात मोठी कार निर्माता कंपनी मारुती सुझुकी इंडियानेही या जानेवारीत किमती वाढवणार असल्याचे जाहीर केले आहे. वाहनांच्या किमतीतील वाढ कमी करण्यासाठी, इंडो-जपानी निर्मात्याने त्यांच्या वाहनांवर काही सवलतीही जाहीर केल्या आहेत. (Maruti Suzuki Car discount offer : Alto, Brezza, S-Presso, Dzire)
मारुती अल्टोच्या ‘STD’ ट्रिमवर 10,000 रुपयांचा रोख डिस्काऊंट मिळत आहे तर इतर ट्रिमवर 15,000 रुपयांची रोख सूट मिळत आहे. सोबत 15,000 रुपयांचा एक्सचेंज बोनस आणि 3,000 रुपयांची कॉर्पोरेट सूट देखील आहे. अल्टोच्या CNG व्हेरिएंटवर कोणतीही ऑफर नाही. तर कंपनीच्या S-Presso कारवर मारुती 15,000 रुपयांची रोख सूट देत आहे. सोबत 15,000 रुपयांचा एक्सचेंज बोनस आणि 3,000 रुपयांची कॉर्पोरेट सूट दिली जात आहे.
मारुती वॅगन आर वर 10,000 रुपयांची रोख सूट दिली जात आहे. याशिवाय 10,000 रुपयांचा एक्सचेंज बोनस आणि 3,000 रुपयांची कॉर्पोरेट सूट दिली जात आहे. तथापि, या ऑफर या कारच्या CNG व्हेरिएंटसाठी नाहीत.
Maruti Celerio वर, नवीन आणि जुन्या दोन्ही मॉडेल्सवर कोणतीही रोख सवलत देण्यात आलेली नाही. तथापि, 10,000 रुपयांचा एक्सचेंज बोनस आणि 3,000 रुपयांची कॉर्पोरेट सूट या कारवर उपलब्ध आहे. कंपनीची सर्वाधिक विकली जाणारी कार स्विफ्टवर 10,000 रुपयांची रोख सूट आहे. यासोबतच 10,000 रुपयांचा एक्सचेंज बोनस आणि 3,000 रुपयांची कॉर्पोरेट सूट दिली जात आहे.
मारुती डिझायरवर 10,000 रुपयांची रोख सवलत उपलब्ध आहे. 3,000 रुपयांच्या कॉर्पोरेट डिस्काउंटसह 10,000 रुपयांचा एक्सचेंज बोनसदेखील आहे. मारुतीची कॉम्पॅक्ट SUV – Vitara Brezza 5,000 रुपयांच्या रोख सवलतीसह येते. तसेच या कारवर 10,000 रुपयांचा एक्सचेंज बोनस आणि 3,000 रुपयांची कॉर्पोरेट सूट देखील आहे.
Maruti Ertiga वर सध्या कोणत्याही सवलती किंवा ऑफर नाहीत. कार निर्माती कंपनी Eeco वर 10,000 रुपयांची रोख सूट देत आहे. 3,000 रुपयांच्या कॉर्पोरेट डिस्काउंटसह 10,000 रुपयांचा एक्सचेंज बोनस देखील देत आहे.
इतर बातम्या
Maruti ते Hyundai, किफायतशीर किंमतीत ऑटोमॅटिक गियरवाल्या कार, पाहा यादी
i20 ते Cretaपर्यंत Hyundaiच्या कार महागल्या, इथे पाहा मॉडेल्स आणि त्याच्या किंमती
(Maruti Suzuki Car discount offer : Alto, Brezza, S-Presso, Dzire)