Maruti Suzuki च्या कार्स विकत घेण्याची हीच योग्य वेळ, ‘या’ 3 कार्सवर मोठी सूट, किती लाख वाचणार?

Maruti Suzuki Discount Offer : मारुति सुजुकीच्या नेक्सा डीलरशिप वर मिळणाऱ्या कार्सवर चांगले डिस्काउंट ऑफर दिले जात आहेत. हे ऑफर फक्त जून महिन्यासाठी आहे. म्हणून तुम्ही नवीन कार विकत घेण्याचा विचार करत असाल, तर त्वरा करा. 30 जूनआधी आपली आवडीची मारुती कार बुक करा.

Maruti Suzuki च्या कार्स विकत घेण्याची हीच योग्य वेळ, 'या' 3 कार्सवर मोठी सूट, किती लाख वाचणार?
Maruti suzuki grand vitara
Follow us
| Updated on: Jun 24, 2024 | 4:21 PM

मारुति सुजुकीच्या डीलर सोर्सनुसार, विक्री कमी झाल्याने कंपनीने आपल्या ग्रँड विटारा एसयूवी, फ्रोंक्स आणि XL6 एमपीवीवर डिस्काऊंट दिला आहे. त्याशिवाय मारुति बलेनो, सियाज आणि इग्निसवर सुद्धा ऑफर आहेत. तेच मारुति इन्विक्टोवर कुठलीही डिस्काऊट ऑफर नाहीय. जर, तुम्ही मारुति सुजुकीच्या कार विकत घेण्याचा विचार करताय, तर हीच योग्य वेळ आहे. फ्रोंक्स, एक्सएल6 आणि ग्रँड विटारावर मिळणाऱ्या ऑफरबद्दल जाणून घ्या.

ग्रँड विटारावर आधीपासूनच 66 हजार रुपयापेक्षा जास्त डिस्काऊंट मिळतोय. आता एकूण 74 हजार रुपयाची सवलत मिळेल. त्याशिवाय हायब्रिड वेरिएंट्सवर तीन वर्षांची एक्सटेंडेड वॉरेंटी (जवळपास 38 हजार रुपये) मिळेल. म्हणजे एकूण 1.4 लाख रुपयापर्यंतची बचत होईल. त्याच्या अल्फा वेरिएंटवर 64 हजार रुपये, Sigma CNG मॉडलवर 34 हजार रुपयांची बचत होईल. ग्रँड विटाराच्या हायब्रिड मॉडलवर 27.97kmpl मायलेज मिळतो. SUV ची किंमत 10.99 लाखापासून 19.93 लाख रुपये, एक्स-शोरूम दरम्यान आहे.

मारुति सुजुकी फ्रोंक्स वर किती डिस्काऊंट?

फ्रोंक्सवर आधीपासूनच 20 हजार रुपयापेक्षा जास्त डिस्काऊंट मिळतोय. याची वेलोसिटी एडिशन आल्यानंतर टर्बो मॉडलच्या उर्वरित स्टॉकवर 77 हजार रुपयांची सवलत मिळतेय. याच्या स्टँडर्ड पेट्रोल वर्जनवर 32,500 रुपये आणि सीएनजी वेरिंएंटवर 12 हजार रुपयांची बचत होऊ शकते. मारुति फ्रोंक्सची किंमत सध्या 7.29 लाख ते 12.88 लाख रुपये, एक्स-शोरूम दरम्यान आहे.

Maruti Suzuki XL6 वर ऑफर

मारुति एक्सएल 6 वर 15 हजार रुपयांचा एक्स्ट्रा डिस्काऊंट मिळतोय. MPV च्या पेट्रोल वेरिएंटवर एकूण 40 हजार रुपयापर्यंतचा बेनिफिट मिळतोय. तेच याच्या CNG वेरिएंट्सवर 25 हजार रुपये वाचवू शकतो. XL6 ची किंमत 11.61 लाख ते 14.61 लाख रुपया दरम्यान आहे. ही किंमत एक्स-शोरूमच्या हिशोबाने आहे.

एक गोष्ट लक्षात घ्या, डिस्काऊट ऑफर वेगवेगळी शहर आणि डीलरशिप वर अवलंबून आहे. यात थोडाफार फरक दिसू शकतो. म्हणून तुम्ही तुमच्या जवळच्या डीलरकडे जाऊन ऑफर्सची नेमकी अमाऊंट तपासून घ्या.

शिंदे गटाचा अजितदादांना सरकारमधून बाहेर काढण्याचा प्लान, कोणाचा आरोप
शिंदे गटाचा अजितदादांना सरकारमधून बाहेर काढण्याचा प्लान, कोणाचा आरोप.
जरांगेंविरोधात सगळा समाज उभा करायला वेळ लागणार, कोणी दिली उघड धमकी
जरांगेंविरोधात सगळा समाज उभा करायला वेळ लागणार, कोणी दिली उघड धमकी.
'सुरतलुटी वेळी शिवरायांनी पत्र लिहीले...,' काय म्हणाले जयंत पाटील
'सुरतलुटी वेळी शिवरायांनी पत्र लिहीले...,' काय म्हणाले जयंत पाटील.
रंगारी बदक चाळीच्या बाप्पाचं लंबोदर रुप पाहण्यासाठी भक्तांची रिघ
रंगारी बदक चाळीच्या बाप्पाचं लंबोदर रुप पाहण्यासाठी भक्तांची रिघ.
गडकरी यांच्या घरी कच्च्याबच्च्यांनी गणपती आणलाय...
गडकरी यांच्या घरी कच्च्याबच्च्यांनी गणपती आणलाय....
कास पठाराचा हंगाम सुरु, मोठ्यांसाठी आणि शाळकरी मुलांसाठी किती शुल्क ?
कास पठाराचा हंगाम सुरु, मोठ्यांसाठी आणि शाळकरी मुलांसाठी किती शुल्क ?.
मी फुंकलो असतो तरी राजे पडले असते, असं जरांगे म्हणाले, राऊत यांचा दावा
मी फुंकलो असतो तरी राजे पडले असते, असं जरांगे म्हणाले, राऊत यांचा दावा.
महाराष्ट्राच्या प्रगतीत कोणतेही अडथळे नकोत, अमृता फडणवीस यांचे साकडे
महाराष्ट्राच्या प्रगतीत कोणतेही अडथळे नकोत, अमृता फडणवीस यांचे साकडे.
गणरायाच्या आगमनाने सुखसमृद्धी येवो, एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे
गणरायाच्या आगमनाने सुखसमृद्धी येवो, एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे.
घरोघरी बाप्पाच्या आगमनाची तयारी, नैवेद्यासाठी 21 भाज्या खरेदीची घाई
घरोघरी बाप्पाच्या आगमनाची तयारी, नैवेद्यासाठी 21 भाज्या खरेदीची घाई.