नवीन इंजिन, 6-स्पीड AT सह Maruti Suzuki Ertiga 2022 लाँच, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स

मोठ्या प्रतीक्षेनंतर मारुती सुझुकीने (Maruti Suzuki) भारतात अधिकृतपणे त्यांच्या लोकप्रिय अर्टिगा 2022 चे (Maruti Suzuki Ertiga) फेसलिफ्ट व्हर्जन लॉन्च केलं आहे.

नवीन इंजिन, 6-स्पीड AT सह Maruti Suzuki Ertiga 2022 लाँच, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स
Maruti Suzuki Ertiga 2022 Image Credit source: Maruti Suzuki
Follow us
| Updated on: Apr 15, 2022 | 2:44 PM

मुंबई : मोठ्या प्रतीक्षेनंतर मारुती सुझुकीने (Maruti Suzuki) भारतात अधिकृतपणे त्यांच्या लोकप्रिय अर्टिगा 2022 चे (Maruti Suzuki Ertiga) फेसलिफ्ट व्हर्जन लॉन्च केलं आहे. नवीन जनरेशन अर्टिंगा (Ertiga 2022 Price) भारतात LXi व्हेरियंटसाठी 8.35 लाख रुपयांच्या सुरुवातीच्या किमतीत अनेक अपडेट्ससह लॉन्च करण्यात आली आहे. या कारच्या ZXi+ व्हेरियंटसाठी ग्राहकांना 12.79 लाख रुपये मोजावे लागतील. पहिल्यांदाच कंपनीने मारुती अर्टिगाचं टॉप-ऑफ-द-लाइन ZXi व्हर्जन CNG सह सादर केलं आहे. परंतु इतर अनेक नवीन फीचर्स आहेत जे MPV ला पुन्हा एक आकर्षक पर्याय बनवण्याचा प्रयत्न करतात.

थ्री-रो MUV Ertiga देशात पहिल्यांदा 2012 मध्ये लॉन्च करण्यात आली होती. देशातील टॉप-10 विकल्या जाणाऱ्या कारच्या यादीत अर्टिगाच्या सात लाखांहून अधिक युनिट्सची विक्री झाली आहे. कंपनीने बसवलेल्या सीएनजी पर्यायामुळे या कारची मागणी प्रचंड वाढली. मारुती सुझुकी अर्टिगा चार ट्रिम आणि 11 बोर्ड व्हेरिएंटमध्ये उपलब्ध आहे. VXi, ZXi आणि ZXi+ वर तीन ऑटोमॅटिक पर्याय उपलब्ध आहेत, तर CNG दोन व्हेरिएंटमध्ये उपलब्ध आहे.

मारुती सुझुकी अर्टिगाची किंमत

Ertiga ची किंमत LXi व्हेरिएंटसाठी 8.35 लाख रुपयांपासून सुरू होते आणि AT सह ZXi साठी 12.79 लाखांपर्यंत जाते. CNG सह VXi ची किंमत 10.44 लाख रुपये आहे तर CNG सह ZXI ची किंमत 11.54 लाख रुपये आहे.

मारुती सुझुकी अर्टिगाचं इंजिन

मारुती सुझुकी अर्टिगा 2022 मध्ये सुधारित के-सीरीज 1.5-लिटर ड्युअल VVT इंजिन देण्यात आले आहे. जे MPV ची फ्यूल कपॅसिटी आणखी वाढवण्यास मदत करते. हे इंजिन फाईव्ह-स्पीड गिअरबॉक्सशी जोडलेले आहे. तसेच या मॉडेलवर पॅडल शिफ्टर्स देखील उपलब्ध आहेत.

मारुती सुझुकी अर्टिगाचं इंटीरियर आणि एक्सटीरियर

लेटेस्ट Ertiga च्या एक्सटीरियरमध्येही बदल करण्यात आले आहेत. ही कार डुअल-टोन अलॉय व्हील डिझाइन आणि क्रोम विंग्ड फ्रंट ग्रिलसह अपडेट केली आहे. नवीन अर्टिगा 6 रंगांच्या पर्यायांमध्ये येते, ज्यात दोन नवीन रंग सिल्व्हर आणि ब्राऊन यांचा समावेश आहे.

मारुती सुझुकीची केबिन रिफ्रेश करण्यात आली आहे. यात सुझुकी कनेक्ट तंत्रज्ञानासह सात इंचाची नवीन डिस्प्ले स्क्रीन आहे. अमेझॉन अलेक्सासाठी सुझुकी कनेक्ट स्किलद्वारे कम्पेटिबल स्मार्टवॉच आणि व्हॉइस कनेक्टिव्हिटीद्वारे अर्टिगामध्ये प्रवेश केला जाऊ शकतो.

इतर बातम्या

वाहन प्रवास सुकर होणार! रस्त्यांवरील टोल आणि टॅक्सची माहिती Google Maps वर

Top 5 Electric Scooters: ओला आणि हिरोसह ‘या’ 5 इलेक्ट्रिक स्कूटर्सना भारतीय ग्राहकांची पसंती

3 लाखांहून कमी किंमतीत सेकेंड हँड कार, जाणून घ्या कुठे मिळतायत शानदार ऑफर्स

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.