मारुती एका कारचं प्रोडक्शन बंद करणार, ग्राहकांसाठी नवी आकर्षक SUV आणण्याची तयारी
एका रिपोर्टनुसार, मारुती आपल्या एका कारची निर्मिती बंद करण्याच्या निर्णयापर्यंत आली आहे. त्याला रिप्लेसमेंट म्हणून मारुती नवीन एसयुव्ही बाजारात दाखल करणार आहे. मारुतीची ही अपकमिंग एसयुव्ही आकर्षक लूकमध्ये ग्राहकांच्या भेटीला येणार आहे.
मारुती सुझुकी (Maruti Suzuki) आपल्या विक्रीच्या घसरणीला सावरण्यासाठी चांगलीच कामाला लागली आहे. यासाठी कंपनी बाजारातील स्पर्धेला तोंड देण्यासाठी एकाहून एक नवीन मॉडेल मार्केटमध्ये आणण्याच्या तयारीत आहे. याच पार्श्वभूमीवर कंपनीने एक मोठा निर्णय घेतला आहे. एका रिपोर्टनुसार, मारुती आपल्या एका कारची निर्मिती बंद करण्याच्या निर्णयापर्यंत आली आहे. त्याला रिप्लेसमेंट (Replacement) म्हणून मारुती नवीन एसयुव्ही (SUV) बाजारात दाखल करणार आहे. मारुतीची ही अपकमिंग एसयुव्ही आकर्षक लूकमध्ये ग्राहकांच्या भेटीला येणार आहे. ही कार मारुती टोयोटाच्या सहकार्याने भारतात लाँच करणार असल्याची माहिती आहे.
ऑटोमोबाईल वेबसाइट Rush Lane च्या एका रिपोर्टनुसार, मारुतीने आपली कार एस-क्रॉसला बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. या कारला मारुतीने 2015 साली लाँच केले होते. आतापर्यंत मारुतीने एस-क्रॉसची 1.65 लाखांहून अधिक युनिट्ची विक्री केली आहे. मारुतीची एस-क्रॉस कंपनीची प्रीमियम डीलरशिप नेक्साची पहिली कार होती. एस-क्रॉससोबत नेक्साची सुरुवात कंपनीने 2015 मध्ये केली होती. या वर्षी ह्युंडाईने सर्वाधिक विक्री होणार्या क्रेटाचे लाँचिंग केले होते. एकीकडे क्रेटाने मार्केटमध्ये आपली हवा केली असताना दुसरीकडे एस-क्रॉसने मात्र सुमार कामगिरी केली आहे.
का घेतला बंद करण्याचा निर्णय
ह्युंडाईच्या क्रेटाशी स्पर्धा करण्यासाठी एसयुव्ही सेगमेंटमध्ये आपले नशिब आजमावण्यासाठी मारुतीने एस-क्रॉस कारची निर्मिती बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. एस-क्रॉसला केवळ क्रेटाशीच नाही तर सेल्टॉस, एमजी एस्टर, फॉक्सवेगन टाइगुन, स्कोडा कुशाक अशा अनेक कंपन्यांच्या कार्सशी चांगलाच धोबीपछाड मिळाला आहे. दरम्यार, एस-क्रॉसला बंद करण्याची अधिकृत माहिती कंपनीकडून देण्यात आलेली नाही.
नवीन जनरेशनची एस-क्रॉस
एका रिपोर्टनुसार, कंपनीने जुन्या एस-क्रॉसला बंद करण्याचा निर्णय घेतला असला तरी, कंपनी या कारची नवीन जनरेशन मॉडेल बाजारात आणणार आहे. या मॉडेलचा डेब्यू आंतरराष्ट्रीय मार्केटमध्ये काही महिने आधी करण्यात आला आहे. एसयुव्ही मार्केटमध्ये आपला दबदबा वाढविण्यासाठी मारुतीने नवीन एसयुव्ही मार्केटमध्ये आणण्याची चिन्हे आहेत. सध्या या मॉडेलला YFG हे कोडनेम देण्यात आलेले आहे. माहिनीनुसार, ही कार यंदाच्या दिवाळीपर्यंत बाजारात आणली जाणार असून तिची बुकिंगही तेव्हाच सुरु होणार आहे.