Maruti Suzuki: एक लाखाचे डाऊनपेमेंट भरा आणि घरी आणा मारुतीची ‘ही’ दमदार कार

मारुती सुझुकीने नुकतीच आपली सर्वाधिक विक्री होणारी एसयुव्ही ब्रेझा कार नवीन अवतारात सादर केली आहे. या कारचे नाव ऑन न्यू ब्रेझा असे ठेवण्यात आले आहे. नवीन ब्रेझा 2022 ची किंमत 7.99 लाख रुपयांपासून सुरू होते. ग्राहक ही कार केवळ एक लाख रुपयांचे डाऊनपेमेंट भरून घरी आणू शकतात.  

Maruti Suzuki: एक लाखाचे डाऊनपेमेंट भरा आणि घरी आणा मारुतीची ‘ही’ दमदार कार
मारुतीची ‘ही’ दमदार कारImage Credit source: Facebook
Follow us
| Updated on: Jul 14, 2022 | 3:19 PM

मारुती (Maruti) सुझुकीने आपल्या पूर्वीच्या एसयूव्ही ब्रेझाला अपग्रेड केले असून आता तिला ऑल न्यू ब्रेझाच्या स्वरुपात पुन्हा नवीन अवतारामध्ये ग्राहकांच्या समोर आणले आहे. नवीन ब्रेझा (Brezza) तिच्या हॉट आणि टेकी लूकमुळे ग्राहकांच्या आकर्षणाचा केंद्र ठरत आहे. नवीन ब्रेझा 7.99 लाख रुपयांच्या सुरुवातीच्या किमतीत लाँच करण्यात आली असून या कॉम्पॅक्ट एसयूव्हीची बंपर विक्री देखील होत आहे. जर तुम्हीही नवीन ब्रेझा खरेदी करण्याच्या विचारात असाल तर केवळ एक लाख रुपयांचे डाउनपेमेंट भरून ही एसयुव्ही घरी नेता येणार आहे. यासाठी सुलभ कर्जपुरवठा उपलब्ध असून किती रुपयांपर्यंत कर्ज मिळू शकेल, त्यासाठी किंती ईएमआय (EMI) भरावा लागेल आदींचा तपशिल या लेखातून बघणार आहोत.

किंमत आणि फीचर्स

नवीन मारुती सुझुकी ब्रेझा भारतात LXi, VXi, ZXi आणि ZXi+ या 4 ट्रिम लेव्हलमध्ये एकूण 11 प्रकारांमध्ये सादर करण्यात आली आहे. या व्हेरिएंटच्या किंमती 7.99 लाख ते 13.96 लाख एक्सशोरूम किंमतीत उपलब्ध आहेत. सब-4 मीटर एसयूव्हीला अपग्रेड इंटिरिअर आणि डॅशबोर्डसह मागील आणि पुढचा लूक, अँड्रॉइड ऑटो आणि ॲपल कार प्ले सपोर्टसह फ्री स्टँडिंग 9 इंच स्मार्टप्ले इन्फोटेनमेंट सिस्टम, वायरलेस चार्जिंग, हेडअप डिसप्ले, इलेक्ट्रिक सनरूफ, व्हॉईस कमांड, 360 डिग्री पार्किंग कॅमेरा, ABS, EBD आणि 7 एअरबॅगसह अनेक स्टँडर्ड आणि सेफ्टी फीचर्स देण्यात आले आहेत. नवीन ब्रेझा 1.5 लीटर K15C स्मार्ट हायब्रिड पेट्रोल इंजिनने सज्ज आहे. या एसयुव्हीला पॅडल शिफ्टर्स आणि 5 स्पीड मॅन्युअल ट्रान्समिशनसह 6 स्पीड ऑटोमॅटिक ट्रान्समिशन पर्याय दिला आहे.

किती मिळेल फायनान्स?

नवीन मारुती ब्रेझाचे बेस मॉडेल म्हणजेच 2022 Brezza LXI ची एक्सशोरूम किंमत 7.99 लाख रुपये आणि ऑनरोड किंमत 8.97 लाख रुपये आहे. ग्राहक केवळ 1 लाख (ऑनरोड किंमत, प्रोसेसिंग फी आणि पहिल्या महिन्याचा EMI) डाउनपेमेंट भरून या कारला फायनान्स करू शकता. कारदेखो ईएमआय कॅल्क्युलेटरनुसार, तुम्हाला 7,97,090 रुपये कर्ज मिळेल. जर त्याचा व्याजदर 9.8 टक्के राहिला तर तुम्हाला 5 वर्षांसाठी 16,857 रुपये ईएमआय भरावा लागेल. ग्राहकांना सुमारे 2.15 लाख रुपयांचे व्याज लागेल.

हे सुद्धा वाचा

नवीन मारुती ब्रेझाचे दुसरे सर्वात स्वस्त मॉडेल, Brezza VXi आहे. याची एक्सशोरूम किंमत 9.46 लाख रुपये आहे तर ऑनरोड किंमत 10,60,343 रुपये आहे. ग्राहक केवळ 1.06 लाख (ऑनरोड किंमत, प्रोसेसिंग फी आणि पहिल्या महिन्याचा ईएमआय) डाउनपेमेंट भरून या एसयुव्हीला फायनान्स करू शकता. कारदेखो ईएमआय कॅल्क्युलेटरनुसार, तुम्हाला 9,54,343 रुपये कर्ज मिळेल. जर त्याचा व्याजदर 9.8 टक्के राहिला तर ग्राहकांना 5 वर्षांसाठी 20,183 रुपये ईएमआय भरावा लागेल. यासाठी सुमारे 2.57 लाख रुपये व्याज लागेल.

'शरद पवार गटाकडून दादांना मिसकॉल येतात', NCP च्या आमदाराचा गौप्यस्फोट
'शरद पवार गटाकडून दादांना मिसकॉल येतात', NCP च्या आमदाराचा गौप्यस्फोट.
'बाप-लेकीला सोडा अन्...', शरद पवारांच्या खासदारांना कोणाचा प्रस्ताव?
'बाप-लेकीला सोडा अन्...', शरद पवारांच्या खासदारांना कोणाचा प्रस्ताव?.
दादर स्टेशनवर तरूणीचे कापले केस, काढला पळ; माथेफिरूला पोलिसांकडून अटक
दादर स्टेशनवर तरूणीचे कापले केस, काढला पळ; माथेफिरूला पोलिसांकडून अटक.
फेसबूक अन् इंस्टाग्राम वापरताय? आता होणार मोठा बदल, झुकेरबर्ग म्हणाला
फेसबूक अन् इंस्टाग्राम वापरताय? आता होणार मोठा बदल, झुकेरबर्ग म्हणाला.
मुंबईकरांची चिंता वाढली; HMPV चा शिरकाव, 6 महिन्याचं बाळ पॉझिटीव्ह
मुंबईकरांची चिंता वाढली; HMPV चा शिरकाव, 6 महिन्याचं बाळ पॉझिटीव्ह.
सव्वालाख मुंबईकरांना गंडा, मालक पसार, टोरेस फसवणूक प्रकरणात मोठी अपडेट
सव्वालाख मुंबईकरांना गंडा, मालक पसार, टोरेस फसवणूक प्रकरणात मोठी अपडेट.
महायुतीतील मनसेची युती कशी फिस्कटली? कारण देत राज ठाकरे स्पष्ट म्हणाले
महायुतीतील मनसेची युती कशी फिस्कटली? कारण देत राज ठाकरे स्पष्ट म्हणाले.
धनंजय मुंडे यांच्यावरील आरोपांवर अजित पवार कधी मौन सोडणार?
धनंजय मुंडे यांच्यावरील आरोपांवर अजित पवार कधी मौन सोडणार?.
सुरेश धस यांनी अजितदादांकडे धनंजय मुंडेंचे नेमके कोणते पुरावे दिले?
सुरेश धस यांनी अजितदादांकडे धनंजय मुंडेंचे नेमके कोणते पुरावे दिले?.
वाल्मिक कराडमागे ईडीचाही फेरा? संपत्तीवरून सुरेश धसांचे आरोप काय?
वाल्मिक कराडमागे ईडीचाही फेरा? संपत्तीवरून सुरेश धसांचे आरोप काय?.