Maruti च्या गाड्यांसाठी घरबसल्या लोन मिळणार, एक्सचेंज व्हॅल्यूसाठी शोरुममध्ये जाण्याची गरज नाही

देशातील सर्वात मोठी कार निर्माता कंपनी मारुती सुझुकीने (Maruti Suzuki) आता घरबसल्या कार लोनची सुविधा जाहीर केली आहे.

Maruti च्या गाड्यांसाठी घरबसल्या लोन मिळणार, एक्सचेंज व्हॅल्यूसाठी शोरुममध्ये जाण्याची गरज नाही
Maruti Suzuki
Follow us
| Updated on: Jul 09, 2021 | 11:49 PM

नवी दिल्ली : देशातील सर्वात मोठी कार निर्माता कंपनी मारुती सुझुकीने (Maruti Suzuki) आता घरबसल्या कार लोनची सुविधा जाहीर केली आहे. यासाठी, मारुती सुझुकी इंडियाने शुक्रवारी ग्राहकांना एंड-टू-एंड ऑनलाइन कार फायनान्सिंग सोल्यूशन्स प्रदान करणारा डिजिटल प्लॅटफॉर्म रोलआउट केला आहे. (Maruti Suzuki India Rollout digital platform to provide car financing solutions)

मारुतीने मर्यादित शहरांमध्ये डिसेंबर 2020 मध्ये मारुती सुझुकी स्मार्ट फायनान्सची सुविधा लाँच केली होती. कंपनीने म्हटले की, ही सुविधा आता ARENA (मास मार्केट कार रिटेल चेन) आणि NEXA (प्रीमियम कार आउटलेट) या दोन्ही ग्राहकांसाठी उपलब्ध आहे. यात एचडीएफसी बँक, आयसीआयसीआय बँक, येस बँक, अ‍ॅक्सिस बँक, स्टेट बँक ऑफ इंडिया, इंडसइंड बँक, बँक ऑफ बडोदा, महिंद्रा फायनान्स आणि सुंदरम फायनान्स यांचा समावेश आहे.

एमएसआयचे वरिष्ठ कार्यकारी संचालक (विपणन आणि विक्री) शशांक श्रीवास्तव म्हणाले की, बहुतेक संभाव्य खरेदीदार डीलरशिपला भेट देण्यापूर्वीच खरेदी प्रक्रिया ऑनलाईन सुरु करतात. ही बाब लक्षात घेऊन कंपनीने मारुती सुझुकी स्मार्ट फायनान्स नावाचा डिजिटल प्लॅटफॉर्म सुरु केला आहे. जो ग्राहकांना एंड-टू-एंड ऑनलाइन कार फायनान्स सोल्यूशन्स प्रदान करतो.

जुन्या कारची संभाव्य किंमत ऑनलाइन

कंपनीने जुन्या कारच्या देवाणघेवाणीसाठीदेखील हे फीचर सुरु केले आहे, ज्याद्वारे एक्सचेंज खरेदीच्या बाबतीत ग्राहकांना त्यांच्या विद्यमान मोटारींचे अंदाजे मूल्य मिळू शकेल. याव्यतिरिक्त, हा प्लॅटफॉर्म आता सह-अर्जदारास वित्तपुरवठा करण्याचा पर्याय देखील प्रदान करेल.

भारतीय बाजारात Maruti चा जलवा

सर्व कार उत्पादक कंपन्यांनी जून महिन्यातील त्यांच्या वाहन विक्रीची आकडेवारी जाहीर केली आहे. या महिन्यातही मारुती सुझुकीने (Maruti Suzuki) देशात अव्वल स्थान पटकावलं आहे. मारुती सुझुकी कंपनीने जूनमध्ये एकूण 147,388 मोटारींची विक्री केली आहे, तर मेमध्ये ही संख्या 57,228 इतकी होती.

जूनमध्ये सर्वाधिक विक्री होणाऱ्या गाड्यांबद्दल बोलायचे झाल्यास, मारुतीच्या 8 गाड्यांचा टॉप 10 वाहनांच्या यादीमध्ये समावेश आहे. या व्यतिरिक्त, ह्युंदायच्या क्रेटा एसयूव्ही आणि Grand i10 Nios प्रीमियम हॅचबॅक या दोन गाड्यांनी टॉप सेलिंग वाहनांच्या यादीत स्थान मिळवलं आहे. त्यामुळे ह्युंदाय ही मारुतीनंतरची देशातील दुसरी सर्वात यशस्वी वाहन कंपनी ठरली आहे.

मारुती सुझुकी वॅगन आर (Maruti Suzuki Wagon R) या कारने जून 2021 मध्ये 19,447 युनिट्सची विक्री साधली आहे. त्यामुळे ही कार देशातील सर्वाधिक विक्री होणारी कार ठरली आहे. जून 2020 मधील 6,972 युनिटच्या विक्रीच्या तुलनेत गेल्या महिन्यात वॅगन आरच्या विक्रीत मारुती सुझुकीने 179 टक्के वाढ नोंदवली आहे. विशेष म्हणजे वॅगन आरने देशातील स्विफ्ट हॅचबॅक कारला विक्रीच्या बाबतीत मागे टाकलं आहे.

इतर बातम्या

Renault कारवर मिळवा 65,000 पर्यंत सूट, त्वरा करा! फक्त 31 जुलैपर्यंत ऑफर

Mahindra Bolero Neo ची लवकरच बाजारात एंट्री, जाणून घ्या ढासू SUV ची किंमत आणि फीचर्स

भारतीय बाजारात Maruti चा जलवा, टॉप सेलिंग कार्सच्या यादीत मारुतीच्या 8 गाड्या

Non Stop LIVE Update
बटेंगे तो कटेंगेच्या वक्तव्यावरून पंकजा मुंडेंचा यू-टर्न? म्हणाल्या...
बटेंगे तो कटेंगेच्या वक्तव्यावरून पंकजा मुंडेंचा यू-टर्न? म्हणाल्या....
'पंकजाताईंनी मोठ मन केल म्हणून मी...', सभेतून धनंजय मुंडे काय म्हणाले?
'पंकजाताईंनी मोठ मन केल म्हणून मी...', सभेतून धनंजय मुंडे काय म्हणाले?.
चित्रपटात काम केलं असत.., सदा सरवणकरांच्या मुलीचा अमित ठाकरेंना टोला
चित्रपटात काम केलं असत.., सदा सरवणकरांच्या मुलीचा अमित ठाकरेंना टोला.
'रामदास कदम सरपटणारा साप, निवडणुकीनंतर...',ठाकरे गटाच्या नेत्याची टीका
'रामदास कदम सरपटणारा साप, निवडणुकीनंतर...',ठाकरे गटाच्या नेत्याची टीका.
'राणे पिता-पुत्र हे गाडग्यासारखे..', ठाकरे गटाच्या बड्या नेत्याची टीका
'राणे पिता-पुत्र हे गाडग्यासारखे..', ठाकरे गटाच्या बड्या नेत्याची टीका.
भाजपच्या किती जागा येणार?,कोण होणार CM?; विनोद तावडेंनी थेट सांगितलं..
भाजपच्या किती जागा येणार?,कोण होणार CM?; विनोद तावडेंनी थेट सांगितलं...
डोंबिवलीत भाजपचं कार्यालय फोडल, कोणी केल्ला हल्ला? घटना CCTV मध्ये कैद
डोंबिवलीत भाजपचं कार्यालय फोडल, कोणी केल्ला हल्ला? घटना CCTV मध्ये कैद.
एकनाथ शिंदेंच्या आमदारानं पैसे वाटले? विधानसभेच्या तोंडावर अडचणी वाढल्
एकनाथ शिंदेंच्या आमदारानं पैसे वाटले? विधानसभेच्या तोंडावर अडचणी वाढल्.
पंकजा मुंडेंकडून भाऊ धनंजय मुंडेंना खास गिफ्ट, सभेतून काय केली घोषणा?
पंकजा मुंडेंकडून भाऊ धनंजय मुंडेंना खास गिफ्ट, सभेतून काय केली घोषणा?.
पवार कुटुंबातील कटुता भविष्यात दूर होणार? अजित पवारांचं मोठं वक्तव्य
पवार कुटुंबातील कटुता भविष्यात दूर होणार? अजित पवारांचं मोठं वक्तव्य.