Maruti CNG Car : लवकरच येतेय मारुतीची नवीन CNG कार, एक किलोग्रॅममध्ये किती किलोमीटर पळणार?
Maruti CNG Car : सीएनजी कार्सची मागणी वाढत चालली आहे. त्यामुळे कंपन्या बॅक टू बॅक आपल्या पॉपुलर मॉडल्सच CNG अवतार लॉन्च करत आहेत. पुढच्या आठवड्यात मारुती सुजुकी आपल्या पॉपुलर मॉडलच सीएनजी लॉन्च करणार आहे. या नव्या मॉडलची किंमत किती असेल? जाणून घेऊया.
Maruti Suzuki च पॉप्युलर हॅचबॅक मॉडल स्विफ्टच पेट्रोल वर्जन लॉन्च केल्यानंतर कंपनी आता Swift CNG मॉडल लॉन्च करणार आहे. मारुतीच हे हॅचबॅक सीएनजी मॉडल लॉन्च झाल्यानंतर Hyundai Grand i10 Nios आणि Tata Tiago ट्वीन-सिलेंडर सीएनजी मॉडलला टक्कर देईल. मारुती टाटा मोटर्स आणि हुंडई प्रमाणे, सीएनजी गाडी खरेदी करणाऱ्या ग्राहकांची बूट स्पेसची समस्या संपवणार का? हे लवकरच समजेल.
हुंडई ग्रँड आय 10 नियोस आणि टाटा टियागोमध्ये ग्राहकांना सीएनजी सिलेंडरसोबत फुल बूट स्पेस मिळतो. जर, असं काही मारुती सुजुकीने करुन दाखवलं, तर मारुतीची सीएनजी गाडी खरेदी करणाऱ्या ग्राहकांची मोठी अडचण दूर होईल. रिपोर्ट्सनुसार, मारुती सुजुकी स्विफ्ट सीएनजीची लॉन्च डेट 12 सप्टेंबर आहे. या गाडीबद्दल आतापर्यंत अनेक रिपोर्ट्स समोर आलेत. त्यातून बरीच माहिती मिळाली आहे. स्विफ्ट सीएनजीची किंमत किती असेल? आणि ही कार एक किलोग्रॅम सीएनजीमध्ये किती किलोमीटर मायलेज देईल?
सीएनजी मॉडल किती मायलेज देणार?
स्विफ्ट सीएनजीमध्ये 1197 सीसी Z12E नेचुरली एसपिरेटेड 3 सिलेंडर पेट्रोल इंजिन दिलं जाऊ शकतं. असं पहिल्यांदा होईल की, या इंजिनला कंपनी सीएनजी ऑप्शनसोबत युज करेल. रिपोर्ट्सनुसार, मारुती सुजुकी स्विफ्टच नवीन सीएनजी मॉडल एक किलोग्रॅममध्ये 30 ते 32 किलोमीटरपर्यंत मायलेज देईल. सध्याच पेट्रोल वेरिएंट 24.80kmpl (मॅनुअल) आणि 25.75kmpl (ऑटोमेटिक) मायलेज मिळतो.
Maruti Swift CNG Price
पेट्रोल वेरिएंटच्या तुलनेत सीएनजी वेरिएंटची किंमत 80 हजार ते 90 हजार रुपये जास्त असू शकतो. सध्याच्या 2024 स्विफ्ट मॉडलची किंमत 8.34 लाख (एक्स-शोरूम, दिल्ली) ते 13.98 लाख (एक्स-शोरूम, दिल्ली) इतकी आहे. Hyundai Grand i10 Nios CNG बोलायच झाल्यास या हॅचबॅक कारची किंमत 7.68 लाख (एक्स-शोरूम) ते 8.30 लाख (एक्स-शोरूम) आहे. टाटा टियागो सीएनजी मॉडलची किंमत 6.60 लाख (एक्स-शोरूम) ते 8.90 लाख (एक्स-शोरूम) रुपये आहे.